Thursday, November 14, 2019

धनादेश अनादरप्रकरणी उद्योगपतीला अटक

औरंंगाबाद : दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेले साईराम इंडस्ट्रीचे मालक सिध्दार्थ बागूल (रा.श्री.स्वामी समर्थ कॉलनी, सिडको महानगर) यांना गुरूवारी (दि.१४) गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. धनादेश अनादर प्रकरणी बागुल यांच्याविरूध्द मुंबईतील माझगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, जमादार गरड,भालेराव, बिडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------------------
यंत्रावर काम करताना अपघातात कामगाराचा मृत्यू

औरंंगाबाद : यंत्रावर काम करीत असतांना अचानकपणे यंत्राचा मार लागून सुभाष लक्ष्मण म्हस्के (वय २२, रा.धोंडखेडा) या कामगाराचा मृत्यू झाला. सुभाष म्हस्के हा गुरूवारी (दि.१४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आयसीएल या कंपनीत काम करीत होता. त्यावेळी अचानकपणे त्याच्या डोक्याला यंत्राचा जोरदार धक्का लागून तो बेशुध्द झाला. सुभाष म्हस्के याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार शेख अफसर करीत आहेत.
----------------------------------------
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंंगाबाद : गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथे राहणार्‍या शिला गोरख तिनगोटे (वय २४) या महिलेने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिला तिनगोटे हिने गुरूवारी (दि.१४) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिला तिनगोटेला उपचारासाठी घाटीत दाखल केले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
सातार्‍यात तीन दुकाने फोडून ४० हजाराचा मुद्देमाल लंपास

औरंंगाबाद/प्रतिनिधी
बीडबायपास लगत सातारा परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. एकाच रात्री तीन दुकाने फोडून जवळपास ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड बायपास रोडवरील हुसैननगरातील रहिवासी शेख अबुलखैर सलिम अहेमद उर्फ अखिल (वय ३८) यांचे हुसैननगर परिसरात किराणा सामानाचे दुकान आहे. ९ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्यांनी शेख अबुलखैर अहेमद यांचया दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील किराणा सामान, इतर जिवनावश्यक वस्तू, रोख रक्कम असा एकूण २३ हजार २३० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. तसेच त्यांच्या दुकानाजवळील सय्यद मंसुरी बापूजी यांच्या दुकानातून  ७ हजार ४२० रूपये किंमतीचा तर मोहम्म्द दानीश एकबाल अंन्सारी यांच्या दुकानाचे शटर उचकटून ८ हजार ४०० रूपये किंमतीचा असा एकूण ३९ हजार ५० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी एकाच रात्रीत एक किराणा दुकान, पानटपरी आणि डेली निड्स शॉप अशी तीन दुकाने फोडल्यामुळे सातारा परिसरातील रहिवाश्यांत खळबळ उडाली आहे. शेख अबुलखैर सलिम अहेमद उर्फ अखिल यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सानप करीत आहेत.
डेंग्यूचा धोका कायम ; पुन्हा 46 रुग्णांची भर पडल्याने महापालिकेची चिंता वाढली

औरंगाबाद / प्रतिनिधी
शहरात डेंग्यूने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे 85 रूग्ण आढळले होते. महिन्याच्या शेवटी पाच दिवस डेंग्यूच्या पॉझीटिव्ह रूग्णांचा आकडा स्थिर होता. त्यामुळे पालिकेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, या महिन्यात 11 दिवसात डेंग्यूचे 46 रुग्ण आढल्याचे सोमवारी (दि.11) समोर आले. यावरून शहरात अजूनही डेंग्यूचा धोका कायम असून परिणामी महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या साथीने चांगलाच जोर पकडला आहे. तरीही ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे केवळ 8 रूग्ण आढळले होते. संशयितांचा आकडा हा 99 इतका होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात एकदमच 22 रूग्णांचे रिपोर्ट डेंग्यू पाझीटिव्ह आले. तर सुमारे 200 रूग्ण संशयित आढळले. मात्र, मनपा आरोग्य विभागाने डेंग्यूची साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतलेल्या नव्हत्या. दरम्यान डेंग्यूचा पहिला बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली आणि आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास आरोग्य विभागाने सुरू केल्या. ऑक्टोंबर महिन्यात पंधरा दिवसांतच सात जणांचा डेंग्यूने बळी घेतला. तेव्हा पालिका आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणात शहरातील बहुतांश भागात डेंग्यू डासांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने ही साथ रोखण्यासाठी जलदतेने प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या. अ‍ॅबेटींग विशेष मोहीम सुरू केली. याअंतर्गत ऑक्टोंबर महिन्यात जोखमीच्या भागात जाऊन डोअर टू डोअर सर्वेक्षण, डास उत्पत्तीच्या स्थानांची तपासणी, पाण्याचे कंटेनर्स तपासण्यात आले. अ‍ॅबेट वाटप, कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन, औषध व धूरफ वारणी अशा विविध उपाययोजना पालिकेच्या आरोग्य विभागाने राबविल्या. मात्र यानंतरही आक्टोबर महिन्यात तब्बल 85 जणांना डेंग्यूची लागण झाली, तर 382 संशयित आढळले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून सोमवार (दि.11) पर्यत अकरा दिवसांतच डेंग्यूचे तब्बल 46 रूग्ण आढळले आहेत. संयशित रूग्णांचा आकडा मात्र या तुलनेत कमी 99 एवढा आहे. यामुळे अद्यापही डेंग्यूची साथ अटोक्यात आलेली नाही. परिणामी, महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

दहा वर्षांचे रेकॉर्ड मोडले

डेंग्यूच्या साथीची मागील दहा वर्षांतील आकडेवारीनुसार यावर्षी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्यासाथीने कहर केला आहे. 2016 मध्ये डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावर्षी डेंग्यूच्या रूग्णांची वर्षभरातील संख्या 100 होती, तर संशयित 277 रुग्ण आढळले होते. मात्र, वर्ष संपायला अजून एक महिना बाकी असताना डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण 174 तर संशयित तब्बल 791 आढळले आहे. मागील दहा वर्षांतील हा उच्चांक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई- मुकेश सारवान

औरंगाबाद/प्रतिनिधी
महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी (दि११) दिला.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी महापालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त मंजूषा मुथा, सहायक आयुक्त विक्रम दराडे, पल्लवी घाटगे, वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे, विटेकर यांच्यासह बहुजन कामगार शक्ती महासंघाचे  संजय रगडे, अशोक हिवराळे, कैलास जाधव, पंडित दाभाडे, वाल्मिक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माजी नगरसेवक संजू रिडलॉन, हुशारसिंग चव्हाण, मुकेश लव्हेरा, सामाजिक कार्यकत्र्या चंदा राजपूत आदींची उपस्थिती होती. या बैठकीत महापालिकेतील सफाई कामगारांच्या अडअडचणी जाणून घेतल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी पगार, बोनस वेळेवर मिळत नाही, अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतल्या जात नाही, अशा तक्रारी केल्या. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाड समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याची तक्रार केली. अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. काम करताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही सहकार्य केले जात नाही. अशा तक्रारीही कर्मचाऱ्यांनी केल्या.

त्यांनतर पत्रकार परिषदेत माहिती देताना मुकेश सोन सारवान म्हणाले, मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींचा व समस्यांचा आढावा घेतला. प्रशासनाने सकारात्मक भुमिका मांडली. लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन किमान १ तारखेला देण्यात यावे, हंगामी-कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, सफाई कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अहर्तानुसार पदोन्नती देण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील घरे मालकीहक्क नावे करुन देण्यात यावे, समाजमंदिरात मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना केल्या असल्याचे सारवान यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सारवान यांनी दिला. तसेच तीन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेवून प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल असे सारवान यांनी सांगितले.

व्यापारी संकुलात गाळे राखीव

सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगाराकरिता मनपाच्या व्यापारी संकुलातील एक गाळा राखीव ठेवावा असा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

सफाईच्या कामांचे कंत्राट देण्यास प्राधान्य

शहरातील सफाई कामांचे कंत्राट देण्यासाठी वाल्मिकी, मेहत्तर, सुदर्शन समाजाच्या संस्था, संघटनांना प्राधान्य देण्यात यावे, या समाजाचे जिवनमान उंचविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लागले ती मदत करावी अशा सूचना सारवान यांनी प्रशासनाला केल्या.
मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये महापालिकेचे १ कोटी ४२ लाखाचे नुकसान ; लेखा परिक्षण अहवालात प्रकार उघड

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीमधील ६० प्रकरणामध्ये चुकीच्या पध्दतीने कर वसुली करण्यात आल्यामुळे १ कोटी ४२ लाख ५५ हजार रुपयाचे महापालिकेचे नुकसान झाल्याचा प्रकार लेखा परिक्षण अहवालात समोर आला आहे. २०१७-१८ या वर्षाचे लेखा परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये हे आक्षेप नोंदवण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (दि.११) सांगितले.

महापालिकेतील मुख्य लेखा परिक्षण विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर विभागाचे लेखा परिक्षण केले. या लेखा परिक्षणामध्ये मालमत्तेचा कर वसुल करताना अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. एकूण प्रकरणांपैकी ६० प्रकरणांमध्ये आक्षेप नोंदविण्यात आले असून मालमत्ता कराची वसुली करताना व्यावसायिक कराची वसुली निवासी कर आकारुन करण्यात आली. तसेच रेडीरेकनर दरानुसार कर आकारणी करताना त्यामध्ये दराची जुळवणी होत नाही. त्यामुळे कर कमी प्रमाणात वसुल झाला आहे. एकूण कर वसुलीमध्ये १ कोटी ४२ लाख ५५ हजार ७५९ रूपये इतके नुकसान झाले असून हे नुकसान वसुल करण्यासाठी कार्यवाही करावी, रक्कमेतील हा फरक वसुल करावा अशी सूचना लेखा परिक्षणात करण्यात आली आहे. संबंधित मालमत्ताधारकांकडून कमी भरण्यात आलेला कर वसुल केला जाणार आहे.

१८ हजार मालमत्ताच्या दुबार नोंदी

मालमत्तांचे नामांतर करतांना वॉर्ड कार्यालयात फस्ट पार्टी ते थर्ड पार्टी अशी नोंद करण्यात आल्यामुळे दुसऱ्या पार्टीचे नाव नसल्यामुळे मनपाचे उत्पन्न बुडाले आहे. अशा १८ हजार मालमत्ताधारकांची दुबार नावांची नोंद असल्याचे लेखा परिक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे आता टॅक्स पावती एकच देण्यासाठी आणि दुबार नावे टाळण्याकरिता स्वतंत्र अ‍ॅप तयार केले जाणार आहे.

सर्व विभागाचे ऑडीट होणार

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालय, उद्यान, जलतरण, जाहिरात, वटले न गेलेले धनादेश, बॅकेतील ठेवी, यांत्रिकी, जुनी वाहने यासह प्रत्येक विभागाचे लेखा परिक्षण केले जाणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.
देगाव येथे चोदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार....
गटविकास अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यास टाळाटाळ

नायगाव ता.प्रतिनिधी - तालुक्यातील देगाव येथील सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामे बोगस व कागदोपत्री दाखवून निधी तर हडपलाच पण बोगस लाभार्थ्यांच्या नावावर लाखो रुपये शौचालयाचे अनुदानही लाटल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण ग्रामसेवक हे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या गुडबुक यादीतील असल्याने सदरच्या अर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
       नायगाव तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतला मागच्या चार वर्षात तब्बल ५० लाखाची रक्कम १४ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाली आहे. पण सरपंच पद लिलावात घेतलेल्या सरपंच सौ. जयश्री सुरेश मोरे व ग्रामसेवक सुर्यकांत बोंडले यांनी संगणमताने निधीची विल्हेवाट लावली आहे. प्राप्त निधीतून सौरदिवे, रेती, गिट्टी, ढबर, बारकी गिट्टी, सिमेंट, मजूरी यावरच मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला मात्र प्रत्यक्षात कुठलेच काम करण्यात आले नाही. गरोदर माता पोषण आहार, पाणी पुरवठा साहित्य खरेदी,संगणक खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी अदिंच्या बनावट पावत्या जोडण्यात आल्या. अपंगासाठी १३४००० एवढा निधी खर्च केल्याचे दाखवण्यात आले पण अपंगाच्या पदरात काहीच पडले नाही. मागासवर्गीय वस्तीतील स्मशानभूमीत बांधकाम, डब्ल्यू बी एम करणे, सीसी रोड, दगड, सोलींग, शाळेला वाल कंपाऊड बांधल्याच्या कामाच्या बोगस मोजमाप पुस्तीका बनवण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंगणवाडीत दिड लाखाचे साहित्य खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे पण प्रत्यक्षात तिथे काहीच नाही.
      देगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दि. ३ सप्टेंबर २०१८ रोजी २ लाख २४ हजार ५४० रुपये खर्चून आर ओ बसवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे पण तिथे सध्या परिस्थिती साधे पाणी सुध्दा उपलब्ध नाही. त्याचबरोबर २९ मार्च २०१९ रोजी ३ लक्ष ८३ हजार ६०० रुपये खर्चून गावात विद्युतीकरण करण्यात आले आहे. मात्र संध्याकाळी गावात रस्ता शोधाव लागतो. याती अनेक कामे बोगस तर करण्यात आलीच आहेत पण काही कामे फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली. अशाप्रकारे सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने शासनाचा निधी हडप केल्याने गावची अवस्था भकास झालेली आहे.
     त्याचबरोबर गावातील बोगस लाभार्थ्यांच्या नावावर संगणमताने शौचालय अनुदानाचे लाखो रुपये हडपण्यात आले आहेत. १४ व्या वित्त आयोगासह शौचालय अनुदानाची रक्कम हडप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करुन तक्रारदारा़च्या उपस्थितीत सर्व प्रकरणाची चौकशी करुन दोषी सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख आरिफ व माधव बैलकवाड यांनी २१ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली होती. पण देगावचा ग्रामसेवक हा गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या गुडबूक यादीतील असल्याने चौकशीच्या मागणीला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
दीड वर्ष लोटले तरी कचरा प्रकल्पाचे काम उरकेना ; पडेगाव प्रकल्पात जानेवारीत प्रक्रिया

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात अभूतपूर्व कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर शासनाने मनपा प्रशासनाला भरघोस निधी दिला. पालिकेने शहराच्या चार कोपऱ्यात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित केले. यातील आजघडीला केवळ चिकलठाणा प्रकल्प सुरू करण्यात पालिकेला यश आले. तर अन्य प्रकल्पपैकी प्रगतिपथावर असलेल्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राला जानेवारी उजाडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नारेगाव येथील नागरिकांनी दीड वर्षपूर्वी कचरा डेपोत कचरा टाकण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपाला प्रारंभी 90 कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केला होता. नंतर या डीपीआरची रक्कम वाढतच गेली. पहिल्या टप्प्यात मनपाला यातील 26 कोटी रुपये मिळाले होते. यातून चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यातील चिकलठाणा येथील दीडशे टन क्षमता असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला. तर कांचनवाडी व पडेगाव या केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा स्थायी समितीने फेटाळल्याने. फेर निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे काम वेगाने होत आहे. डिसेंबर मध्येच हा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याच्या उद्घाटनाचे मुहूर्त देखील पदाधिकाऱ्यांकडून शोधले जात आहेत. दुसरीकडे डिसेंबर अखेर येथे यंत्रणा उभी राहील. परंतु प्रत्यक्षात प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया सुरु होण्याकरिता जानेवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या चौघाविरूध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद/प्रतिनिधी
बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची फसवणूक करणार्‍या टोळीचा मुसक्या गेल्या आठवड्यात गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. या टोळीला अटक केल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली असून या टोळीने केलेले गुन्हे आता एका मागून एक उघडकीस येत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेलया टोळीने आतापर्यंत किती गुन्हे राज्यात केले याची माहिती पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद उर्फ सोनु लक्ष्मण कांबळे, प्रियंका राजू कांबळे (दोघे रा. इंदिरानगर) कचरु जयराम खिल्लारे व जयकर गडवे (दोघे रा. गल्ली नं. २, रमानगर) यांनी न्यायालयात बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, एैपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी) आदी कागदपत्रे  न्यायालयात ७ एप्रिल २०१७ ते २६ ऑक्टोबर २०१८ या काळात सादर केली होती. तसेच सादर केलेली सर्व कागदपत्रे खरी असल्याचे न्यायालयास भासवून न्यायालयाची दिशाभुल केली होती. दरम्यान, विनोद उर्फ सोनू कांबळे, प्रियंका कांबळे, कचरू खिल्लारे, जयकर गढवे यांनी न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी शिवकुमार हिरालाल कावळे (वय ४१, रा.गवळीपुरा, छावणी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाची फसवणूक करणार्‍या चौघाविरूध्द वेदांतननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भदरगे करीत आहेत.
गंगापूर तहसिल आढावा बैठकीत उपस्थित मुद्दे*

दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ दौरा केल्यानंतर गंगापूर तहसिल कार्यालयात संबंधित सर्व वैजापूर, गंगापूर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये खालील मुद्यांवर संबंधीत सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आणि अधिकांऱ्यांना शेतकऱ्यांच्या आणि गावांतील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले.

१) गावातील शेतकऱ्यांच्या पीकांचे लवकरात लवकर पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकीट नुकसान भरपाई देण्यात यावी असे मा.खासदारांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
२) नविन बनविण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीची सर्व जिम्मेदारी ही रस्ता पुर्ण झालेल्या दिनांकापासून पूढे दोन वर्षासाठी संबंधित ठेकेदाराची असते. गावातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यां संबंधित ठेकेदारावर व त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. तसेच गावातील सरपंचांनी सर्वाच्या समंतीने नविन रस्त्यांचे ठराव घेवून संबंधित अधिकाऱ्यांना लिखित द्यावे जेणे करुन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन द्यावा. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन रस्त्यांचे काम लवकर शुरु करण्यासाठी शासनाकडे निधीसाठी त्वरीत पाठपुरावा करण्यात येईल.
३) गावात पोलीस भरतीसाठी हेल्थक्लब व स्टडीरुम, अंगणवाडी, शाळेच्या नविन खोल्या किंवा दुरुस्ती, स्मशानभुमी, कब्रस्थान, सामाजिक सभागृह, मंगल कार्यालय, शादीखाने बनविण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा खासदार निधीतुन आणि शासनाच्या विविध योजनेतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
४) गंगापूर तालुक्यातील सर्व गावपातळीवर नशामुक्ती करण्यात यावी आणि लोकवस्तीत असलेल्या देशी दारुंच्या दुकानावर कार्यवाही करण्यात यावी. जेणे करुन तेथे असलेल्या मुलांना व महिलांना होणारा त्रास टाळता येवु शकतो.
५) दलित समाजाच्या स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्यावी आणि जेथे स्माशान भुमी आहे त्याकडे जाण्यासाठी नविन रस्ता बांधण्यात यावा. दलित वस्ती सुधारणा निधी आणि खासदार निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
६) आजपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयात गावांच्या विकासासाठी जे जे प्रस्ताव आलेले आहे त्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. 
७) गावात असलेल्या प्रत्येक शाळेची पाहणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा तसेच नविन अंगणवाडी, शाळा दुरुस्ती व नविन शाळा इमारती उभारणीसाठी खासदार निधीतुन आणि कंपनीच्या सीएसआर निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच खासदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना स्पष्ट निर्देश दिले कि माझ्या कार्यकाळात कोणताही विद्यार्थी हा बाहेर बसुन शिकतांना किंवा कोणतीही शाळा व अंगणवाडीत टिनशेड मध्ये दिसता कामा नये. 
८) वाळुज, एमआयडीसी, चिकलठाणा मधील कंपन्यांनी सुध्दा त्यांचा सीएसआर निधी गावात विकासकामासाठी, शिक्षणासाठी वापरावा कारण कंपनी जागा, पाणी, लाईट, कर्मचारी  येथून घेते तर त्यांचा सीएसआर निधी सुध्दा स्थानिक गावातील विकासासाठीच वापरावे.
९) औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांच्या विकासा संबंधीची शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांसोबत त्वरीत बैठक घेण्यात येईल जेणेकरुन गावांचा लवकरात लवकर सर्वांगिण विकास करणे शक्य होईल.
आयुक्त डॉ. विनायकांच्या सुट्यांमुळे आजची सर्वसाधारण सभा रद्द ; महापालिका आकृतिबंधाचा तिढा कायम

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आकृतिबंध व सेवा भरतीच्या नियमांबाबत 2017 चा प्रस्ताव विखंडीत झालेला नसताना प्रशासनाने नवीन प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेच चर्चा करुन सोडविण्यासाठी बुधवारी (दि.13) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मनपा आयुक्तच दिवाळीपासून सुट्टीवर असल्याने ऐनवेळी ही सभा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे आकृतिबंधाचा प्रस्ताव पुन्हा लटकला आहे.

राज्य शासनाने पालिकेला वारंवार निर्देश देऊन आकृतिंबंध अंतिम करण्यास सांगितले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आकृतिबंधाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे कामकाज चालवण्यासाठी मनुष्यबळ नसल्याची कायम ओरड करणारे पदाधिकारी, प्रशासनाकडूनच आकृतिबंधासंदर्भात चालढकल सुरु आहे. तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी 18 जुलै 2017 च्या सर्वसाधारण सभेत पालिकेतील कर्मचारी भरतीच्या आकृतिबंधाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावेळी 36 दुरुस्त्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, पालिकेच्या आस्थापना विभागाने दोन वर्षात या प्रस्तावावर कुठलाही निर्णय न घेता नवीनच प्रस्ताव तयार करून तो 18 जुलै 2019 च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर आणि पालिका अधिकारी संघटनेने आक्षेप घेत जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तेव्हापासून आकृतीबंध वादग्रस्त ठरला.  त्यामुळे चर्चा करुन हा तिढा सोडविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.13)  विशेष सभा बोलावली होती. मात्र, दिवाळीपासून सुट्टीवर गेलेल्या मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांनी अचानक दहा दिवसांची सुट्टी वाढून घेतली. त्यामुळे महापौरांना आकृतीबंधासाठी बोलावलेली विशेष सभा रद्द करावी लागली आहे.


आयुक्त डॉ. निपुण यांच्या सुट्यांमुळे कारभार ठप्प

महापालिका आयुक्त डॉ. विनायक यांच्या वारंवार सुट्टीवर जाण्याने प्रशासनाची शिस्त बिघडली आहे. दिवाळीपासून रजेवर असलेल्या आयुक्तांनी आणखी आठ दिवसांची रजा वाढवून घेतल्याने विकास कामे आणि प्रशासनाचे कामकाज ठप्प पडले आहे. दुसरीकडे निवडणुकीला अवघे चार-पाच महिने उरले असल्याने पदाधिकारी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यात प्रभारी आयुक्त पालिकेत फिरकत नसल्याने अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विशेष म्हणजे बुधवारी (दि.१३) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे.
*औरंगाबाद रेल्वे स्टेशनची खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांनी पाहणी केली*

औरंगाबाद (13 नोव्हेंबर) : आज सकाळी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद रेल्वे स्टेशनची पाहणी केली. रेल्वेने दररोज हजारो नागरिक प्रवास करतात यात्रेकरुणा प्रवासा दरम्यान कोण कोणत्या अडी-अडचणीना सामोरे जावे लागते त्या संबंधी प्रवास करणाऱ्या यात्रेकरू सोबत खासदार साहेबांनी चर्चा केली व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कि त्यांनी सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून यात्रेकरूनचा प्रवास सुखकर होईल.
          तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनला अधिक अद्यावत करण्यासाठी अजून कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या या विषयी अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली.
रेल्वे स्टेशनच्या नवीन प्रवेश द्वाराची उभारणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी खासदार साहेबांनी दिली. तात्काळ टिकिटसाठी जास्तीचे बुकिंग काउंटर, ट्रेकची व्यवस्था, प्रवाशांना थांबण्यासाठी नवीन जनरल आणि एसी हॉल, शुद्ध पाण्याची नवीन व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना व आजारी यात्रे करूसाठी व्हील चेरअर ची आणि लिफ्ट ची व्यवस्था तसेच यात्रेकरू साठी सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधांची व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली,  तसेच नवीन बांधकामाचे काही प्रस्ताव असल्यास त्या बनवून द्यावा त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांना चर्च दरम्यान खासदार साहेबांनी सूचना दिल्या. रेल्वेने प्रवासासाठी  येणाऱ्या यात्रेकरूंना पार्किंगची सुविधा,  बस आणि ऑटो रिक्षाची व्यवस्था विषयी लवकरच वाहतूक पोलीस, एस.टी. महामंडळ,  महानगर पालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल असे खासदार साहेबांनी प्रतिपादन केले.
        औरंगाबाद रेल्वेस्टेशन पाहणी दरम्यान खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबा सोबत रेल्वेचे सेशन सुप्रिटेन्डेन जाखडे साहेब, असिस्टंट इंजिनीर  विजय कुमार खोबरे, सलीम अहेमद खान, नगरसेवक अबुल हसन हाश्मी आणि रेल्वे विभागाचे इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्तीथी होती.
जागतिक  मधुमेह दिनानिमित्त उद्या
'उडान' तर्फे मधुमेही बालकांची पदयात्रा

औरंगाबाद दि. १२ - बाल मधुमेहींसाठी कार्यरत 'उडान' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी बाल मधुमेही आणि त्यांच्या पालकांचा सहभाग असलेल्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये बाल मधुमेहींसह संपूर्ण उडान परिवार सहभागी होणार आहे.
इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशन या संयुक्त राष्ट्राच्या मधुमेहाशी संबंधित संघटनेच्या वतीने जगभरातील १७६ देशांमध्ये जगतिक मधुमेह दिनानिमित्त या आजारासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम होत आहे. त्याअंतर्गत औरंगाबादमध्ये या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक संघटनेच्या वतीने दरवर्षी या संदर्भात एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि यंदाचे घोषवाक्य हे 'मधुमेह आणि परिवार' असे आहे.
या पदयात्रेत लहान मुले, त्यांचे पालक सहभागी होतील. यात ढोल-ताशा यांच्या बरोबरच बाल मधुमेही मुले-मुली लेझीम खेळणार आहेत. बाल मधुमेहींसाठी, त्यांच्या उपचारासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन करणारे 'मला वाचवा' असे फलक मुलांच्या हातात असतील.
जालना रोडवरील आकाशवाणी चौक येथून सकाळी सव्वासात वाजता या पदयात्रेला प्रारंभ होईल. ही पदयात्रा मोंढा नाका मार्गे क्रांती चौक आणि परत आकाशवाणी अशी असेल. आकाशवाणी चौकात पदयात्रेचा समारोप होईल.
डॉ. अर्चना आणि डॉ. संपत सारडा यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांपूर्वी साकारलेल्या ;उडान'च्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या माध्यमातून सातशेवर  टाईप वन मधुमेही मुलांवर मोफत उपचार केले जातात, त्यांना स्वावलंबी जीवन जगायला शिकविले जाते, त्यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समाजानेही त्यांना मधुमेहासह स्वीकारावे, ते सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आहेत हे दर्शविण्याकरिता  'उडान' सातत्याने विविध उपक्रमआयोजित करत असते. मधुमेही बालकांच्या पालकांनाही त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. अनेक समाजोपयोगी उपक्रम या मुलांच्या माध्यमातून राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहजपणे सामावून घेतले जावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात तसेच यामुळे या मुलांचा आत्मविश्वास यामुळे वाढतो आणि ते यशस्वी जीवन जगण्यासाठी सज्ज होतात. अशी अनेक मुले आज समाजामध्ये कार्यरत आहेत.
महापौर सोडत
 • मुंबई- ओपन
 • पुणे - ओपन
 • नागपूर - ओपन
 • ठाणे- ओपन
 • नाशिक - ओपन
 • नवी मुंबई - ओपन महिला
 • पिंपरी चिंचवड - ओपन महिला
 • औरंगाबाद- ओपन महिला
 • कल्याण डोंबिवली - ओपन
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर - ओपन महिला
 • अमरावती- बीसीसी
 • पनवेल- ओपन महिला
 • नांदेड-बीसीसी महिला
 • अकोला - ओपन महिला
 • भिवंडी- खुला महिला
 • उल्हासनगर- ओपन
 • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला)
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर - बीसीसी सर्वसाधारण
 • सांगली- ओपन
 • सोलापूर-बीसीसी महिला
 • कोल्हापूर-बीसीसी महिला
 • धुळे - बीसीसी सर्वसाधारण
 • मालेगाव - बीसीसी महिला
 • जळगाव खुला महिला
औरंगाबाद महापालिकेत महापौरपदी महिला विराजमान होणार

राज्यातील महापालिकेचे आरक्षण जाहिर

औरंगाबाद/प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज बुधवारी जाहिर झालेल्या आरक्षणात औरंगाबादचे महापौरपद हे सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील महिलासाठी जाहिर झाले आहे. त्यामुळे आता महिला महापौरपदी विराजमान होणार आहे. मुंबई येथे मंत्रालयात महापौरपदाकरिता बुधवारी (दि.१३) आरक्षण सोडत काढण्यात आली.
राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापौरपदाकरिता आरक्षण सोडत काढण्यासाठी बुधवारी मंत्रालयात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाकरिता आरक्षण जाहिर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एप्रिलमध्ये महापौरांचा कार्यकाळ संपणार

सध्या महापौरपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले असल्यामुळे महापौरपदावर नंदकुमार घोडेले हे विराजमान आहेत. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांची महापौरपदी निवड झाली होती. अडीच वर्षाचा कार्यकाळ असल्यामुळे त्यांची मुदत २९ एप्रिल २०२० रोजी संपत आहे. त्याचबरोबर मनपाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे.

प्रभाग पध्दतीने पहिलीच निवडणूक

महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभागरचना वॉर्ड पध्दतीने पहिल्यांदाच २०२० मध्ये होणार आहे. प्रभागपध्दतीने निवडणूक घेण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम युध्दपातळीवर केले जात असून चार वॉर्डांचा एक प्रभाग तयार होणार आहे. त्यामुळे ५७ वॉर्ड महिलांसाठी राखीव असणार आहे. प्रभागरचना करतांना भौगोलिक रचनेनुसार वॉर्ड एकमेकांना न जोडता वॉर्ड क्रमांकानुसार जोडले जात असल्यामुळे इच्छुकांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.

खुल्या प्रवर्गातील महिलेला पाचव्यांदा मिळणार मान

महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी यापूर्वी चारवेळेस राखीव झाले होते. १९९५ मध्ये सुनंदा कोल्हे या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये रुख्मीणी शिंदे, २००७ मध्ये विजया रहाटकर, २०१२ मध्ये कला ओझा यांची महापौरपदावर निवड झाली होती. २०२० मध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौरपदी विराजमान होणार असून पाचव्यांदा हा मान महिलेला मिळणार आहे.
फटाका फोडल्याने एकावर गुन्हा

औरंंगाबाद : मानवी जिवीताला धोका पोहचेल अशा रितीने फटाका फोडुन १० वर्षीय मुलाच्या डोळ्यांना गंभीर ईजा पोहचविल्या प्रकरणी जखमी मुलाचे वडील रविंद्रसिंग अमरसिंग राजपुत (रा. बुढ्ढीलेन, ठाकुर वस्ती) यांनी दिलेल्या तक्रावरुन संशयीत निलेसिंग आनंदसिंग रापुत (रा. ठाकुर वस्ती, बुढ्ढीलेन) याच्या विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार ईलग करित आहेत.
-------------------------------------------------------
तरुणावर चाकुने वार; दोघांवर गुन्हा

औरंंगाबाद : तुझ्या भावाने आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का केली म्हणत तरुणाला मारहाण करुन चाकुने वार करण्यात आल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी ५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या रिक्षा पर्किंगमध्ये घडली. प्रकरणात रिक्षा चालक शेख आसिफ शेख चाँद (२२, रा. माणिक नगर, नारेगाव) याने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी शेख आसीफ शेख मुसा (२२) व शाहरुख शेख नफीस (२७, रा. नारेगाव) या दोघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार बोडले करित आहेत.
-------------------------------------------------------
घराचे कुलूप तोडुन १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास

औरंंगाबाद : घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ४ ते १२ नोव्हेंबर दरम्यान गजाजन रेसिडेन्सी ऑडिटर सोसायटीत घडली. एन-११, मयुर नगर हडको परिसरात राहणारे दिलीप शेणफडु निकम (५०) यांचे सासरे घराला कुलूप देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घरातील ५० हजारांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात दिलीप निकम यांच्या तक्रारीवरुन हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार निळ करित आहेत.
-------------------------------------------------------
आमिष दाखवून कामगार पुरवठादाराला दोन लाखांचा गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंंगाबाद : इंव्हेटसाठी बांउनसर्स पुरविण्याचा कॉन्ट्रॅक्ट देतो तसेच इंव्हेटमध्ये भरपूर फायदा करुन देतो म्हणत मुंबईसह हिंगोलीच्या भामगट्याने कामगार पुरवठादाराला दोन लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना २० जून १७ ते २ फेबुवारी २०१८ दरम्यान घडली. नदीम अब्दुल वकील कादरी (४२, रा. औंढा नगरनाथ जि. हिंगोली) व सनि गुलशन अरोरा (३७, रा. मुंबई) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुरवठादार मोहमंद सिराज मोहमंद सुभान जहागिरदार (२६, रा. रोषणगेट, मकसुद कॉलनी) यांना संशयीत नदीम अब्दुल व सनि अरोरा  या दोघांनी इंव्हेटसाठी बांउनसर्स पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतो तसेच इंव्हेट मध्ये भरपूर फायदा देखील देतो असे आमिष दाखविले. त्यासाठी दोन लाख रुपये लागतील अशी बतावणी संशयीतांनी केली. आमिषाला बळी पडुन मोहंमद सिराज यांनी दोन लाख रुपये संशयीतांच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यांनी सिराज यांना कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, त्यामुळे सिराज यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी संशयीतांनी तुला पैसे परत देत नाही, काय करायचे ते कर, आमचे हात वरपर्यंत आहेत. पोलिस देखील आमचे काही वाकडे करु शकत नाही. पुन्हा आम्हाला फोन केला तर तुझे हातपाय तोडुन कोठेही गाडुन टाकु अशी जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात मोहंमद सिराज यांच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार काळे करित आहेत.
-------------------------------------------------------
विक्री केलेली जमीन पुन्हा विक्री; व्यापऱ्याला ११ लाखांचा गंडा

औरंंगाबाद : विक्री केलेली जमीन आपली असल्याची भासवत ती पुन्हा एका व्यापाऱ्याला विक्री करुन व्यापाऱ्याची ११ लाखांना फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. मोहम्मद अब्दुलसमीर अब्दुल साजीद व एजाज अली जैदी (रा. चेलीपुरा) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशीत आरोपी मोहम्मद अब्दुलसमीर याने त्याच्या मालकीची मौजे मिटमिटा येथील गट नं. २४ मधील जमीन २०१० मध्ये रिधिसिद्धी कोटेक्स प्रा.लि. यांना विक्री केली होती. असे असतांना देखील आरोपींनी सदरील १ हेक्टर १२ आर. जमीन स्वत: च्या मालकीची असल्याचे भासवत १८ ऑक्टोबर २०१८ रोजी व्यपारी प्रफुल्ल ब्रमवा दोघांनी नुतन कॉलनीत राहणारे व्यापारी प्रफुल्ल मुलचंद ब्रमवा यांना विक्री केली. या जमीनीपोटी ब्रमवा यांनी आरोपींना अंजठा अर्बन को. ऑ. बँकेचा ११ लाखांचा धनादेश दिला.  मात्र सदरील जमीन आरोपींनी पूर्वीच कोणाला तरी विक्री केल्याचे ब्रमवा यांच्या निदर्शनास आले, त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षता येताच ब्रमवा यांनी आरोपी अब्दुल समीर यास दिलेले पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी ब्रमवा यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात ब्रमवा यांनी छावणी पोलिस ठाणे गाठुन दिलेल्यातक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ठोकळ करित आहेत.
-------------------------------------------------------
मद्यपी पोलिसांच्या जाळ्यात

औरंंगाबाद : दारुच्या नशेत तर्रर्र होऊन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा शेख यासिन शेख करिम (रा. ता. पैठण) याला पोलिसांनी गजाआड केले. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानक चौकात घडली. प्रकरणात वाहतुक शाखेचे जमादार अनिल वानखेडे यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भदरगे करित आहेत.
-------------------------------------------------------
क्षुल्लक कारणावरुन युवकाला बेदम मारहाण

औरंंगाबाद : पोलिसांना माझ्या मुलाची टिप का दिली म्हणत तरुणाला दोघांनी लोखंडी सळई व दगडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उस्मानपूरा परिसरात घडली. प्रकरणात जखमी आकाश शिवाजी हिवराळे (वय २३, रा. गल्ली नं.१, नागसेन नगर, उस्मानपूरा) याने दिलेल्या तक्रारीवरुन शेजारी राहणारा संशयीत आरोपी प्रदिप शेषराव धनेधर (वय ३५) व एका महिलेविरुद्ध  उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास जमादार बोडले करित आहेत.
-------------------------------------------------------
क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण

औरंंगाबाद : अंगण झाडण्याच्या व अंगणातील कचरा उलण्याच्या कारणावरुन चौघांनी एका महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उस्मानपूरा परिसरात घडली. प्रकरणात ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी शिवा हिवराळे, तानाजी शिवा हिवराळे, देवा शिवा हिवराळे व एका महिलेविरुद्ध उस्मानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------
घरा समोरुन दुचाकी लांबवली

औरंंगाबाद : घरासमोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेल्या दोन दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना सातारा परिसरात घडली. प्रकरणाणात आकाश देविदास झळके (वय २५, रा. वळदगाव ता.जि. औरंगाबाद) व सुहास सुधाकरराव मुळे (वय ४२, रा. शाकुंतल नगर, सातारा) यांदोघांनी अनुक्रमे आप-आपली दुचाकी (क्रं. एमएच-२०-एफएफ-१७८९), (क्रं. एमएच-२०-सीएम-५२८८) घरासमोर हॅन्डल लॉक करुन घरा समोर उभी केली असता चोरट्याने ती लंपास केली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------
सिडको परिसरात महिलेचा मारहाण करुन विनयभंग

औरंंगाबाद : उसने परत घेण्यासाठी गेलेल्या महिलेला चौघांनी शिवीगाळ करुन तीचे कपडे फाडल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडली.
प्रकरणात २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली. तक्रारीनुसार पिडितेने संशयीत आरोपी अंकुश भोसले, बाळु गडवे व दोन महिलांना हात उसणे म्हणुन एक लाख रुपये दिले होते. मुदत उलटूनही पैसे परत न दिल्याने पिडिता आरोपींकडे पैशांची मागणी करत होती. मात्र आरोपी टाळाटाळ करित होते. त्यामुळे पिडिता ही आरोपींकडे उसणे दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेली असता आरोपींनी तिला कशाचे पैसे, आमच्याकडे तुझे पैसे नाहीत असे बोलून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपी अंकुश भोसले याने पिडतेचे कपडे फाडुन तीचा विनयभंग केला. प्रकरणात पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार जरारे करित आहेत.
-------------------------------------------------------
अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविले

औरंंगाबाद : सिडको परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली.या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक जी.एम. बागवडे करित आहेत. तर दुसया घटनेत ४९ वर्षीय महिला ही कामानिमीत्त बाहेर गेली असता घरात असलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवुन नेले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक लाड करित आहेत.
-------------------------------------------------------
अज्ञात कार चालकावर गुन्हा

औरंंगाबाद : भरधाव आलेल्या कारने सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वार गंभीर जमखी होऊन त्यांचा मृत्यु झाला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील बीएम पावर कंपनी समारे घडली. प्रकरणात मयत सिताराम सुर्यवंशी यांचा मुलगा गणेश सुर्यवंशी (वय २०, रा. हनुमान मंदीर, मुकुंदवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात कार चालकाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अन्नलदास करित आहेत.
-------------------------------------------------------
हद्दपार आरोपी जेरबंद

औरंंगाबाद : शहरातुन हद्दपार केलेले असतांना देखील हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशरीरित्या शहरात फिरणारा आरोपी साबेर शेख गुलाम नबी (वय २२, ओहर ता.जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी पकडले असुन त्याच्याविरुद्ध हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख जहीर करित आहेत.
-------------------------------------------------------
दुचाकीस्वारांनी मोबाईल पळविला

औरंंगाबाद : मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावुन घेत पळ काढल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वसंतराव नाईक चौकातील दिपाली हॉटेल जवळल घडली. प्रकरणात मुकुंदवाडी परिसरातील एसटी कॉलनीत राहणारा सिराज रहेमत शहा (वय २०) हा घरुन चहा पिण्यासाठी मोबाईलवर बोलत टपरीवर जात होता.वसंतराव नाईक चौकातील दिपाली हॉटेल समोर पाठीमागुन एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी सिराज याचा मोबाईल हिसकावुन घेत धुम ठोकली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शिरसाठ करित आहेत.
-------------------------------------------------------
वाहतुकीस अडथळा; दोन वाहनचालकांवर गुन्हा

औरंंगाबाद : दौलताबाद येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रिक्षाचा (क्रं. एमएच-२०-डीसी-२९१३) चालक तोहित खान सफीराज खान (वय २४, रा. कोहीनुर कॉलनी) व छोटा हत्तीचा (क्रं. एमएच-१९-एस-८००५) चालक गणेश शामराव आढाव (वय २४) यादोघांवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार करित आहेत.
-------------------------------------------------------
वृद्ध महिलेला मारहाण; पाच महिलांवर गुन्हा दाखल

औरंंगाबाद : गल्लीतील रस्त्यात उभी कार बाजुला घ्या म्हणुन सांगण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेला पाच महिलांनी घेरुन शिवीगाळ व माराहण केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर परिसरात घडली. ६५ वर्षीय महिलेने तीच्या मालकीची एक खोली किरायाने दिली होती. मात्र किरायदाराने ११ नोव्हेंबर रोजी ती खोली खाली केली. खोलीतील सामान त्याने छोटा हत्ती या वाहनात भरले होते. मात्र गल्लीतील रस्त्यात असलेल्या कारमुळे छोटा हत्ती बाहेर जात नव्हता. त्यामुळे ६५ वर्षीय महिलेने कार मालक अनिल साळवी यांना कार बाजुला घ्या सांगण्यासठी गेली असता, संशयीत आरोपींनी तु कोण आमची गाडी बाजुला लाव सांगणारी असे म्हणत शिवीगाळ करुन हाताचापटांनी मारहाण करुन जखमी केले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------
बालदिन विशेष बातमी

दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एजीपी पब्लिक स्कुल अग्रेसर

औरंगाबाद/प्रतिनिधी

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आपला पाल्य उच्चदर्जाचे शिक्षण घेऊन या स्पर्धेच्या युगात यशस्वीपणे मार्गक्रमण करावा असे प्रत्येक पालकाला वाटते. मराठवाड्याच्या भूमीत मेट्रो सिटीच्या तोडीसतोड शिक्षणव्यवस्था औरंगाबाद शहरात देण्याचे कार्य बीडबायपास रोडवर असलेली एजीपी पब्लिक स्कुल सुमारे 10 वर्षांपासून करीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री. गोवर्धन पवार यांनी शाळेची मुहूर्तमेढ रोवली. शाळेचे संपूर्ण कारभार सौ. अनिता गोवर्धन पवार या पाहतात. विद्यार्थांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे देता येईल याकडे पवार दाम्पत्यांचे बारकाईने लक्ष असते. यासोबतच कालानुरूप शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलाला स्वीकारून त्यानुसार मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा देण्यासाठी कायम प्रयत्नाहिल असतात.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालागुणासह अद्यावत तंत्रज्ञानाचेही बाळकडू शाळेपासूनच देण्यात येते. आजघडीला सुमारे 300 विदयार्थी एजीपी पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेत आहेत. यासाठी संस्थेत विविध विषयांचे 40 तज्ञ शिक्षक कार्यरत आहेत. प्ले ग्रुप ते इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग शाळेत भरतात. विस्तीर्ण परिसरात शाळेची भव्य इमारत उभी आहे. यामध्ये प्रशस्त क्लासरूम, इ-लर्निंग, संगणक लॅब, सायन्स लॅब, मॅथस लॅब यासह भव्य ग्रंथालय आहे. ज्यामध्ये सुमारे 3 हजार पुस्तके आहेत. यात जनरल नॉलेज, गिनीज बुक रेकॉर्ड्स,  मॅगेझीन, विविध भाषेतील वर्तमानपत्रे विद्यार्थांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे स्वतंत्र ग्रंथपाल शाळेने नियुक्त केला असून ते मुलांना वर्गात जाऊन त्यांच्या आवडीनुसार पुस्तके देतात. यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ज्ञानात भर पडते. त्याचप्रमाणे आज संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थांना प्राथमिक वर्गापासूनच संगणक विषय शिकवण्यात येतो. एजीपी पब्लिक स्कुलमध्ये मुलांना खेळण्यासाठी भव्य मैदान उपलब्ध असून याचा पुरेपूर वापर केला जातो. क्रिकेट, फूटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन, थ्रो बॉल, कबड्डी, खो-खो, कराटे, या मैदानी खेळासोबतच चेस, कॅरम, टेबल टेनिस यासारख्या क्रीडाप्रकारातून मुले स्थानिक पातळीपासून देशपातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शाळेचे नाव उज्वल करीत आहेत. विद्यार्थांच्या शिक्षणासह त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम, स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक उपक्रमात मुलांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांची चांगली तयारी करून घेण्यात येते. शाळेचा निकाल गतवर्षी 100 टक्के लागला असून 96 टक्के गुण घेऊन विद्यार्थी प्रथम आली आहे. दर्जेदार शिक्षण देण्याकडे शाळेचा कल अधिक राहिला आहे. त्यामुळे एजीपी पब्लिक स्कुल म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत विश्वसनीय नाव बनले आहे.

विविध स्पर्धेत विदयार्थी चमकले

एजीपी पब्लिक स्कुलमध्ये शिक्षणसोबतच मुलांच्या कलागुणांकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांची आवड कशात आहे त्यानुसार त्यांना त्यात्या विषयात सक्षम बनवण्यासाठी शाळेतच विविध उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात आवर्जून उल्लेख करावा अशी स्पर्धा परीक्षा शाळेत घेतली जाते. होमीभाभा, एमपीएससी, हिंदी, ऑलिम्पियाड यासारख्या संस्थेशी संलग्न राहून पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. यात अनेक विद्यार्थांनी झोनल रँक, गोल्ड मेडल पटकाविले आहेत. चित्रकला, क्रीडा यासह बौद्धिक परीक्षांमध्ये चिमुकले हिरीरीने सहभागी होतात.

विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार

यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव, होळी असे उत्सव विद्यार्थांना इकोफ्रेंडली पद्धतीने साजरे करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जेणेकरून पर्यावरणाचे महत्व त्यांना पटेल. विशेषतः मुले स्वतः माती पासून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करतात. शाळेत सर्व सण-समारंभाला विद्यार्थी रंगबिरंगी कपडे घालून येतात. 26 जानेवारी दरम्यान शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो. यात दरवर्षी वेगवेगळे भारतीय संस्कृतीशी संबंधित विषय हाताळून त्यानुसार मुले कार्यक्रम सादर करतात. नामवंत मान्यवरांना निमंत्रित करून विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येते. विशेष म्हणजे विदयार्थी-पालकासाठी जाहिरात स्पर्धा शाळेने आयोजित केली होती. यात दोघांनी मिळून जाहिरात तयार करून सादर करायची असते. तर विद्यार्थ्यांच्या आजी- आजोबाना शाळेत निमंत्रित करून त्यांच्यावर विद्यार्थांनी कविता, गाणे तयार करून सादर केले. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.
या सोबतच राज्यासह परराज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते.

शाळेच्या भिंती मुलांच्या कालाविष्काराने सजल्या

एजीपी पब्लिक स्कुलच्या भव्य इमारतीत प्रवेश करताच भिंतींनावर मुलांनी काढलेले चित्र, पोस्टर, लक्ष वेधून घेतात. विविध सामाजिक संदेश देणारे पोस्टर, चिमुकल्या हातांनी रेखाटलेले चित्रं मन प्रफुल्लित करतात. जिकडे पाहावे तिकडे मुलांच्या कलाविष्कारांची उधळण झालेली पाहायला मिळते.

आरोग्यसह स्वयंरक्षणाचे धडे

शाळेतील विद्यार्थांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सर्व सोयीसुविधा शाळेने उपलब्ध केलेल्या आहेत. तर वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबिर आयोजित करून सर्व विद्यार्थांची तपासणी केली जाते. यासोबतच मुलींना स्वयंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी कराटे प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

1.
शाळेत आम्हाला खूप छान शिकवले जाते. मला सायन्सचा अभ्यास करायला आवडतो आणि खेळायला, डान्स करायला आणि चित्र काढायला आवडतात. मी मोठी होऊन डॉक्टर बनणार आहे.

-शांभवी प्रसाद नागपुरे, इयत्ता दुसरी

2.
मला डान्स, सिंगिंग आवडते, ड्रॉईंग काढायला आवडतात. मॅथ विषय मला खूप आवडतो. मला आयपीएस होऊन पोलीस ऑफिस बनायचे आहे आणि चोरांना पकडायचे आहे.
-आक्षिता अखिलेश सिंग, इयत्ता पहिली

3.
मला सायन्स विषय खूप आवडतो. ऑलिम्पियाड मध्ये मला झोनल रँकचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मला डान्स, ड्रॉईंग, स्पोर्ट आवडतात. मला सायंटिस्ट बनायचे आहे.
-खुशी प्रवीण अग्रवाल, इयत्ता दुसरी

4.
मला फुटबॉल खेळायला आवडतो. मी मोठा होऊन इंजिनियर बनणार आहे.
-वेदांत गणेश साखरे, इयत्ता दुसरी

5.
मला स्पोर्ट्स आणि ड्रॉईंग काढायला आवडतात. सायन्स आणि इंग्लिश विषय मला आवडतो. मला क्रिकेटर बनायचे आहे.
विठ्ठल विश्वनाथ इक्कर, इयत्ता दुसरी
शहरात डेंग्यूचे थैमान, आतापर्यंत ११ जणांचा घेतला बळी

४६ पॉझिटिव्ह तर १११ संशयीत रुग्ण

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात डेंग्यूच्या साथीने चांगलेच हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. मंगळवारी दोघांचा मृत्यु झाल्यामुळे डेंग्यूच्या बळींची संख्या ११ वर गेली आहे. डेंग्यूची साथ वाढत असताना मनपाकडून मात्र प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.१३) तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

शहरात ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूची साथ सुरु झाली असलीतरी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यात पाच जणांचा बळी गेला. त्यांनतरही डेंग्यूची साथ अटोक्यात आली नाही. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात देखील चार जणांचा बळी गेला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह ४६ तर संशयीत १११ रुग्ण आढळून आले आहे. त्यातच मंगळवारी दोंघाचा मृत्यु झाला. घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात नारेगाव येथील सात वर्षीय बालकास दाखल करण्यात आले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्या बालकाचा मृत्यु झाला. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश कॉलनीतील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या बळीची संख्या ११ वर पोहचली आहे. डेंग्यूने संपूर्ण शहराला विळखा घातला असून घराघरात साथरोगाचे रुग्ण आढळून येत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अडीच महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सूरू आहे. परंतु आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष

डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे दिसून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या संपर्क अधिकाऱ्यांनी आठ दिवस मोहिम राबवण्यास सहकार्य केले. त्यानंतर संपर्क अधिकारी झोन कार्यालयाकडे फिरकले देखील नाही. आयुक्तांनी आदेश देवूनही संपर्क अधिकाऱ्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले नाही.

अ‍ॅबेटिंगची मोहिम कागदावरच

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आकडेवारी पाहिल्यास आठ तासात एवढया घरांमध्ये ही मोहिम राबवली जाणे शक्य नाही. तरीदेखील घराघरात जावून अ‍ॅबेटिग केल्याचे कागदोपत्रीच दाखवले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यां धरले धारेवर

शहरात डेंग्यूने दोघांचा बळी घेतल्याचे कळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डेंग्यूची साथ सुरु असतांनाही प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जात नाही. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे  डेंग्यूची साथीचा प्रकोप वाढतच चालला आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाही का? असा सवाल महापौरांनी केला. खासगी रुग्णालयातील संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसलेतर त्या रुग्णांचा परवाना निलंबित करा, डेंग्यूची साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, त्याचा दररोजचा अहवाल सादर करावा असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले.

भिमनगर, भावसिंगपूरा, ज्योतीनगर रेड झोनमध्ये

डेंग्यूची साथ नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी सुरु केली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक धोका असलेल्या भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोनमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. या भागात वारंवार डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. 
जागतिक मधुमेह दीना निम्मित
N8 बोटॅनिकल गार्डन मध्ये
मोफत शुगर checkup
व आरोग्य तपासणी.
N8 बोटॅनिकल भारतीय योगा व हेडगेवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ( 14 नोव्हेंबर) सकाळी 6 ते  8 या वेळेत मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेे. 
 या शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर विकास रत्नपारखी हे मधुमेहींची तपासणी करून मार्गदर्शन केले,    Kailash जाधव यांचे भारतीय योग संस्थां ,   अमित जाजू यांचे जयहिंद ग्रुप,  सिडको , N- 8 , बॉटनिकल गार्डन , डॉ. अरविंद गुजराथी यांचे योगासन ग्रुप, व परिसरातील सर्व नागरिक उपस्तीत होते.
रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलन बंद

एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
एमआयएमच्या स्विकृत नगरसेवकाने कचरा संकलक रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.१४) शहरातील कचरा संकलनाचे व वाहतूकीचे काम बंद करुन कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, कचरा संकलनासाठी वाहनांना पालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. बुधवारी आमखास मैदानाजवळ छोटया वाहनातून मोठया वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयएमचे स्विकृत नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी परिसरात कचरा पडत असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यानंतर क्षेत्रीय अधिकारी इरफान व युनूस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाश्मी यांनी या अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक कचरा संकलन बंद केले. रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारीही कचरा संकलनाचे काम बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. सकाळपासूनच सर्व प्रभागातील कचरा संकलन वाहतूकीचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे शहरात कचऱ्यांचे ढीग साचले होते. कर्मचारी एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा यासाठी बेगमपूरा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनतर मनपा मुख्यालयात येवून कर्मचाऱ्यांनी वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात नाही, तोपर्यंत कचरा संकलन केले जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, महापालिका प्रशासन कचरा संकलन व वाहतूकीचे काम सुरु करण्यासाठी रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्कात होते. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात विचारणा केली असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  
*सदस्य औद्योगिक न्यायालय अभय लाहोटी यांचे मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशन  तर्फे स्वागत*

औरंगाबाद दि.१४ नवंबर-जळगाव येथील औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांचे औरंगाबादत कँम्प औद्योगिक न्यायालय म्हणून रूजू झाल्याबद्दल मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले.

याबाबत असे की औरंगाबाद येथे अतिरिक्त औद्योगिक न्यायालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशनची होती. ती मागणी मजूंर होऊन अतिरिक्त न्यायालयाचा कक्ष गेल्या काही महिन्यांपासून सज्ज होता. पूर्णवेळ न्यायाधीशांची नेमणूक होईपर्यंत जळगाव येथील सदस्य औद्योगिक न्यायालय श्री अभय लाहोटी यांना महिन्याच्या पहिल्या व तिसरा आठवड्यात औरंगाबाद येथे कॅम्प औद्योगिक न्यायालय म्हणून जबाबदारी मिळाली व त्यांनी औरंगाबादेत न्यायादानाचे कार्य सुरूही केले.मराठवाडा लेबर प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या परंपरे प्रमाणे नविन आलेल्या न्यायाधीश श्री अभय लाहोटी यांचे स्वागत व सत्कार असोसिएशनच्या कार्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.रविंद्र शिरसाठ हे होते. कार्यक्रमाच्या सूरूवातीस कँम्प औद्योगिक न्यायालय श्री अभय लाहोटी यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रविंद्र सिरसाठ यांनी केले. सदस्य औद्योगिक न्यायालय श्री आर.आर.काकाणी यांचे स्वागत असोसिएशनचे सचिव अॅड सागरदास मोरे यांनी, कामगार न्यायालय श्री डी व्ही जोशी यांचे स्वागत अॅड राजेश खंडेलवाल यांनी ,तर कामगार न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांचे स्वागत अॅड अशोक मोरे यांनी केले. यावेळी वकीलांच्या वतीने अॅड अभय टाकसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कॅम्प न्यायालय श्री अभय लाहोटी यांना जलद गतीने निकाल देण्यासाठी वकीलातर्फे पुर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन देत न्यायाधीशांकडून पक्षकारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. उच्च व सर्वोच्च न्यायालयात चागंला वकील द्यायचा असल्यास किमंत मोजावी लागते ती कामगारांची ऐपत नसल्याने खालच्या न्यायालयात काम मिळालाच पाहिजे ही जबाबदारी वकील आणि न्यायाधीशांची असते असे प्रतिपादनही अॅड अभय टाकसाळ यांनी केले. यावेळी संचलन व प्रास्ताविक अॅड सचिन गंडले यांनी केले तर आभार प्रदर्शन असोसिएशन चे सेक्रेटरी अॅड सागर दास मोरे, यांनी केले. अॅड रविंद्र सिरसाठ यांनी अध्यक्षीय समारोप करताना असोसिएशन ला जागेची कमतरता आहे त्याबद्दल सदस्य औद्योगिक न्यायालय यांनी योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी विनंतीही केली .यावेळी चहापानाचा कार्यक्रम ही झाला बार व बेंच यांचे चांगले संबंध हे न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान करीत असतात ही परंपरा औरंगाबादला अबाधित असल्याचेही सिरसाठ म्हणाले. सर्व वकीलांनी नूतन न्यायाधीशांना स्वताःचा परिचय करून दिला यावेळी अॅड एम पी टाकसाळ, अॅड जे एस भोवते, अॅड सिटी एल मुळावेकर, अॅड भगवान भोजने,अॅड रविंद्र सिरसाठ, अॅड एस के वाघचौरे, अशोक मोरे, अॅड सागरदास मोरे, अॅड आर के ढगे पाटील,अॅड अनिल सुरवसे,अॅड राजेश खंडेलवाल, अॅड बाबासाहेब वावळकर,अॅड आनंद कांबळे, अॅड सपना तांगडे, अॅड. एस एल नामेवार,अॅड इ एम रामटेके अॅड अभय टाकसाळ, अॅड सचिन गंडले यांच्यासह मोठया संख्येने वकील बंधू भगिनीं उपस्थित होते.
आैरंगाबादेत डेंग्यूसाठी हायअलर्ट

अकरा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग

आैरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात आतापर्यंत अकरा जणांचे बळी घेऊन थैमान घातलेल्या डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी अबेटिंग व फुर फवरणीची मोहीम प्रभावीवणे राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाला महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी दिले आहेत. अतिजोखमीच्या भागात आराेग्याबाबतची आणीबाणीही (हायअलर्ट) लागू करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

आैरंगाबाद शहरात मागील दाेन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून डेंग्यूमुळे आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले आहेत. त्याचे पडसाद गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. नगरसेवकांनी डेंग्यूबाबत महापालिका काय उपाययाेजना करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेनंतर महापाैरांच्या दालनात मलेरिया विभागाच्या अतिरिक्त अधिकारी डाॅ. अर्चना राणे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. शहरात आतापर्यंत १३६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बुधवारी एका दिवसात वाढ झालेल्या २५ रुग्णांचाही समावेश आहे. त्यातील ४६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे डाॅ. राणे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी आराेग्य प्रमुख अधिकारी डाॅ. भटकर यांच्याशी फाेनवरून संपर्क साधत कर्मचारी वाढवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या. तर डाॅ. भटकर यांनी ३६ कर्मचारी देण्यात येतील, असे महापाैरांनी सांगितले.

डाॅ. अर्चना राणे यांनी महापाैरांपुढे उपलब्ध कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. त्यात सध्या १५० कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र आकृतीबंधानुसार आराेग्य विभागाकडे २०४ कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मनपाचे ८४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात मलेरिया शास्त्रज्ञ हे पद रिक्त आहे. प्रत्येक वाॅर्डसाठी प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. धूरफवारणीसह गप्पी मासे साेडण्यासाठी २ कर्मचारी असल्याची माहिती डाॅ. राणे यांनी महापाैरांना दिली. आतापर्यंत अबेटिंग गाेळ्यांचे वाटप शहरातील ४ लाख घरांपर्यंत झालेले असून आणखी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचण्याची व्यवस्था करण्याची सूचना महापाैरांनी केली. डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी प्रसंगी शहरात आराेग्य आणीबाणीही जाहीर करण्याची तयारी मनपाने केली असल्याचे महापाैर घाेडेले यांनी सांगितले.

आयुक्त सुट्टीवर ; महापौर घोडेलेंची एकतर्फी लढाई

शहरात डेंग्यूने हाहाकार माजलेला आहे. आतापर्यंत ११ बळी गेलेत. या परिस्थितीला महापौर नंदकुमार घोडेले आणि आरोग्य विभाग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, प्रशासनाचे प्रमुख मनपा आयुक्त निपुण विनायक यांना याचे काहीएक देणेघेणे नसल्याचे अधोरेखित होत आहे. दिवाळीपासून रजेवर गेलेले आयुक्त अद्यापही शहरात परत आलेले नाहीत. विशेष म्हणजे पूर्णवेळ आयुक्त द्या असे पत्रच महापौरांनी राज्यपालांना दिले आहे. महापौर नंदकुमार घोडेले आरोग्य विभागाच्या आढावा बैठका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. मात्र, प्रशासनाचा प्रमुख शहराला वाऱ्यावर सोडून सुट्टीवर गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आयुक्ताविना महापालिका ; जिल्हाधिकाऱ्यांनाही आदेश मिळेना

मनपा आयुक्त कोण ? महापौर घोडेले यांचा संतप्त सवाल

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दिवाळीपासून सुट्टीवर गेल्याने काही दिवस जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला होता. मात्र, विनायक यांनी पुन्हा परस्पर रजा वाढवल्याने सध्या त्यांचा पदभार कोणाकडे सुपुर्द करण्यात आला याची माहिती मनपाला देण्यात आलेली नाही, एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सुधारित आदेश प्राप्त नसल्याचे सांगितल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त कोण? असा संतप्त सवाल महापौर घोडेले यांनी केला.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दिवाळीनिमित्त दहा दिवसाच्या सुटीवर गेले. आयुक्त सुटीवर गेल्यामुळे त्यांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांनी पुन्हा आठ दिवसाची सुटी वाढवली. या वाढवलेल्या कालावधीसाठी आयुक्तांचा प्रभारी पदभार देण्याचे कोणतेही आदेश काढण्यात आले नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत समोर आले. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार असल्याने महापौरांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्र पाठवले. सकाळी दहा वाजता बैठक सुरु होण्यापूर्वी महापौर घोडेले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांना बैठकीला यावे अशी सूचना केली. त्यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, आयुक्तांनी वाढविलेल्या सुटीच्या काळातील प्रभारी पदभार स्विकारण्यासंदर्भात कोणतेही आदेश   प्राप्त झालेले नाही, असे महापौरांना सांगितले. त्यांनतर महापौर घोडेले यांनी राज्याचे मुख्यसचिव अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी फोनव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या दोघांनीही फोन घेतला नाही. त्यामुळे महापौर घोडेले संतप्त झाले. मनपाचे आयुक्त कोण? असा सवाल त्यांनी केला.

प्रशासकीय प्रमुखही महापौरच ?

शहरातील रखडलेल्या कामांसाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या दालनात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस उपायुक्तांसह विभागप्रमुख उपस्थित होते. शंभर कोटीच्या रस्ता कामांचा आढावा घेतला. सिटीचौक ते सादिया टॉकीज पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला आठ दिवसात सूरूवात होणार आहे. रस्त्यांची कामे करण्यासाठी चारही ठेकेदारांनी लॅब सुरु केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारांची जमा असलेल्या अनामत रकमेतून प्रत्येकाचे अडीच लाख रूपये घेवून दहा लाख रूपयात लॅब उघडणार असल्याचे महापौरांनी सांगितले. विशेष म्हणजे ही बैठक आयुक्ताविनाच पार पडली.


महापालिकेचा प्रशासकीय कारभार ठप्प

आयुक्तांच्या कार्यालयात प्रशासकीय मान्यतेसाठी अनेक महत्त्वाच्या संचिका पडून आहेत.  स्मार्ट सिटीतून होणारी स्मार्ट वॉटर, हेल्थ, ऐतिहासिक दरवाजे, रस्ते, शाळा या कामांच्या निविदा प्रक्रिया ठप्प आहे. घनकचरा प्रकल्पाचा सुधारित १४३ कोटीचा आराखडयास शासनाने मंजूरी दिली. त्याला मनपाची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. मात्र, अजूनही आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. हर्सुलची नव्याने निविदा काढण्यात आलेली नाही. उपभोक्ता कर लावण्याची निविदा काढण्यात आली नाही. मालमत्तांचे सर्वेक्षण करुन नव्याने कर लावला गेला नाही. मालमत्ता आणि घनकचरा विभागाचे अधिकारी बैठकीस नसल्याने मनपाच्या प्रशासनाची घडी विस्कळीत झाल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 
भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात ;
एक जण ठार दोन जण जखमी

औरंंगाबाद/प्रतिनिधी
समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जखमी झाले. हा अपघात गुरूवारी (दि.१३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चिकलठाणा गावाजवळ घडला. या अपघातात कुख्यात गुन्हेगार रईस बोक्या हा देखील जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण नामदेव चव्हाण (वय २५,रा. म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना) असे मयत तरूणाचे नाव आहे. संजय शिवाजी चव्हाण (वय ३०,रा.म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना), शेख रईस उर्फ बोक्या (रा.गरमपाणी परिसर, औरंगाबाद) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. श्रावण चव्हाण व संजय चव्हाण हे दोघे पडेगाव परिसरात राहणार्‍या बहिणीला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी आले होते. बहिणीला भेटून श्रावण चव्हाण, संजय चव्हाण हे दोघे परतुरला जात असतांना, त्यांना शेख रईस उर्फ बोक्या हा भेटला. त्यानंतर तिघेही दुचाकीवर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने परतुरकडे जात होते.
दरम्यान, चिकलठाणा गावाजवळील पुलावर समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी चालविणार्‍या श्रावण चव्हाण याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला जावून आदळली. या अपघातात तिघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावण चव्हाण, संजय चव्हाण यांना उपचारासाठी घाटीत हलविले असता डॉक्टरांनी श्रावण चव्हाण याला तपासून मयत घोषीत केले. हा अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शेख रईस उर्फ बोक्या याने घटनास्थळावरून धुम ठोकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------------------
महिलेला चाकूने मारहाण; तीघांवर गुन्हा

औरंंगाबाद :  बचत गटाचे हप्ते भर सांगितल्याच्या कारणारुन दोन महिलांसह एका पुरुषाने ३५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करुन चाकुने मारहाण केली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जिन्सी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला व आरोपी महिला या एकाच बचत गटात आहेत. तक्रारदार महिलेने आरोपी महिलेला बचत गटातुन घेतलेल्या कर्जाचे थकलेले हप्ते भरण्यास सांगितले. त्यारुन महिला आरोपीने बचत गटातील फिर्यादीसह इतर महिलांना शिवीगाळ केली. तसेच दोन आरोपी महिलांसह आरोपी शेख मेहराज याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करित तीच्या तोंडावर भाजी कापण्याच्या चाकुने वार करुन जखमी केले. तसेच यापूढे पैसे मागण्यासाठी आमच्या घरी कोणी आले तर त्यांना जीवे मारु अशी धमकी देखील दिली. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार नजन करित आहेत.
----------------------------------------
रस्त्यात अडथळा निर्माण करणार्‍या वाहन धारकांवर कारवाई
विविध पोलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल

औरंंगाबाद : रस्यात वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनधारक व हाथगाडी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध पोलिस ठाण्यात २५ जणांवर वाहतूकीस अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलीक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक अमोल विष्णु आहेरकर, सुनिल प्रेमसिंग राठोड, सोनु मोहण भगुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक दिलीप लक्ष्मण पवार (२७, रा. मयुरपार्क), रोहन दिलीप नवगीरे (१९, रा. न्यायनगर, पुंडलीक नगर), अहेमद खान अब्दुल्ला खान (३६, रा. बारी कॉलनी), सय्यद खलील सय्यद हबीब (२१, रा. शरिफ कॉलनी, कटकटगेट), शेख साजीद शेख आमीर (३०, रा. नारेगाव) यांच्यावर, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळाची गाडा चालविणारे मझर खान समशेद खान (२८, रा. बेरीबाग, हर्सुल), जाव्ोद बनेमिया बागवान (२४), शेख नय्यर शेख इलियास (२२, दोघे रा. चिश्तीया कॉलनी, एन-६, सिडको), एजाज खान सुभान खान (३८, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्यावर तर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक प्रविण परमेश्वर शेडगे (रा. शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर नगर), किशोर साहेबराव राठोड (२२, रा. संयजनगर, मुकुंदवाडी) या दोघांवर तसेच उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळगाड्या लावणार्‍या अब्दुल अन्वर अब्दुल हमीद (५०), अक्तर अब्दुल करीम बागवान (५२, रा. दोघे रा. सब्जीमंडी, पैठणगेट), सर्जेराव किसन त्रिभुवन (६०, रा. मिलींदनगर) व रिक्षा चालक विजय देविदास दाभाडे (२७, रा. कोकणवाडी) यांच्यावर तर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक विठ्ठल उत्तमराव हिरे (३८, रा. नारळीबाग), मुक्तार मलिक जाफर मलिक (४५, रा. गणेश कॉलनी), जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालक भरत रेतीलाल पाटील (२४, रा. नळठाणा ता. सिंद्दखेड जि. धुळे), सलीम खान अब्दुल रहेमान (२५, रा. रहीमनगर, आझाद चौक), लोडींग वाहन चालक शेख अब्दुल समद शेख अब्दुल गफुर (२४, रा. नाहीद नगर, हत्तेसिंगपुरा, कटकटगेट) तसेच जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक योगेश बबनराव रत्नपारखी (३५, रा. कैलास नगर) व अकबर खान वजीर खान पठाण (४०, रा. सादतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------
विवाहितेचा विनयभंग
औरंगाबाद : बसैय्ये नगर येथील मैदानाजवळील रस्त्याने पायी जाणार्‍या ३८ वर्षीय तक्रारदार विवाहीतेची छेड काढुन शेख फारख शेख हबीब (वय ४०, रा.बायजीपुरा) याने विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शेख फारुख याच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करित आहेत.
----------------------------------------
विभक्त राहणार्‍या महिलेवर लैंगिक अत्याचार

औरंंगाबाद : पतीपासून विभक्त राहणार्‍या ४२ वर्षीय महिलेवर देविदास रामचंद्र चव्हाण (वय ६०, रा.सुरेगाव, ता.येवला, जि.नाशिक) याने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिला एमआयडीसी वाळुज परिसरातील रहिवासी असून तिची ओळख देविदास चव्हाण याच्यासोबत २०१२ साली औरंगाबाद ते नाशिक प्रवासादरम्यान झाली होती. त्यानंतर देविदास चव्हाण याने पीडितेस लग्न करण्याचे तसेच तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून २०१२ ते ऑगस्ट २०१९ या काळात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून देविदास चव्हाण याच्याविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.
----------------------------------------
भाडेकरूची माहिती न देणार्‍या घरमालकावर गुन्हा
औरंगाबाद : भाडेकरुची माहिती न देणार्‍या घर मालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई बुधवारी (दि. १३) करण्यात आली. शहरात काही अनुचित घटना घडु नये या करीता सर्व घर मालकांना किरायाने राहणार्‍या व्यक्तीची माहिती पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक केले असतांना देखील किरायदारांची माहिती न देणार्‍या घर मालका विरुध्द कारवाई करणे सुरु आहे. त्यानुसार मुकुंदवाडी गावातील सदाशिव भिका फरकाडे (६०) यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार मनगटे करित आहेत.
----------------------------------------
अल्पवयीन मुलाचे अपहरण
औरंगाबाद : हर्सुल येथील छत्रपती नगरात एका १७ वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्यची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. प्रकरणात अपह्त मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन हुर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भागिले करित आहेत.
----------------------------------------
विविध भागातून दुचाकी चोरीला
औरंगाबद : घरा समोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीजे-०२८२) चोरट्याने लंपास केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी बीड बायपास येथील सहारा कॉलनीत घडली. प्रकरणात साहेब खान नसिर खान (३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राठोड करित आहेत. तर
दुसऱ्या घटनेत टिव्ही सेंटर येथील जिजाऊ चौकात उभी केलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएफ-२८४३) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणात विश्वभंर दिंगबर काथार (वय ४८, रा. सुरेवाडी, जाधववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार जाधव करित आहेत.
----------------------------------------
चोराने रिक्षा लांबविली
औरंगाबाद : घरा समोरुन हॅन्डल लॉक करुन ठेवलेली रिक्षा क्रमांक (एमएच-२०-एए-५७७९) चोरट्याने चोरुन नेली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. प्रकरणात आनंदराव वामनराव देशमुख (वय ५२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख शकील करित आहेत.
----------------------------------------
हॉटेल मध्ये वीज चोरी
औरंगाबाद : महावितरण कंपनीची तब्बल २ लख ४७ हजार ८५३ रुपयांची वीज चोरी करुन तडजोडीची रक्क न भरल्याने रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल ग्रेट न्यु पंजाबच्या अनुपम रॉय याच्यासह तीन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पप्पू नवनाथ गोरे (२६, रा. गणेश नगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजेची चोरी करणार्‍या अनुपम रॉय यांच्यासह तीन महिलांवर विजचोरी केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वारे करित आहेत.
----------------------------------------
संशयीत फिरणारा गजाआड
औरंगाबाद : चोरी करण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेत लपुन बसलेल्या अरबाज खान करीम खान (वय २२, रा. गरम पाणी, भोईवाडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानकावजळ करण्यात आली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नसीम खान करित आहेत.
तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
लेखापरिक्षण अहवालातील आक्षेपांवर वर्षभरानंतरही अधिकारी खुलासे देईनात

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत प्रकार उघडकीस

औरंगाबाद /प्रतिनिधी

महापालिकेच्या वर्षभरातील जमा-खर्च याचे लेखा परीक्षण करण्यात येते. यात आर्थिक नुकसान आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे अहवालात उघड होतात. मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी वर्षभरापूर्वी अहवाल प्रशासनाकडे सादर केलेला आहे. त्यात अनेक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही यासंबंधी कुठलीच कारवाई झाली नसल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१४) पार पडलेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. यासंबंधी कारवाई का झाली नाही ? असा सवाल सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी लेखापरीक्षण संबंधी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी उपलब्ध संचिकापैकी बहुतांश संचिकांचे परीक्षण करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर वाडकर यांनी महत्त्वाचा संचिका लेखापरीक्षणला उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे सांगत, महापालिकेचे झालेले नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? मनपाचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ कसे करायचे ? असा सवाल उपस्थित केला. यावर देवतराज यांनी अहवाल सादर करून एक वर्ष झाले. त्यावर आयुक्त निर्णय घेतील असा खुलासा केला. त्यानंतर आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी सध्या खुलासे घेण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा बैठकीत केला. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी दिले.
उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायमास लाईट बंद असून मनपा चे दुर्लक्ष.

हेच ते उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायलाईट बंद आहे व मनपा चे ह्याकडे दुर्लक्ष.

नुकताचगुजयंती साजरी झाली,आम दिवसात तर सोडाच गुरुनानक जयंतीत सुद्धा नगरसेवकाने काम केले नाही व महानगरपालिकेचे अधिकार्‍यांना जाग आली नाही.




Sunday, November 10, 2019

*राशेन व दुकान चालकावर होणार गुन्हा दाखल*
बर्‍याच ठिकाणी आसे होत आहे की राशन दुकान चालक कानाला कान लावून शासनाची दिशाभूल करून गोर गरीब जनतेला गहू,तांदुळ,दाळ,साखर,ईत्यादी वस्तु शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त दराने विक्री करत आहे.प्रत्येक गावातील राजकारण,दबाव,टाकून हमी भावाविरूध्द आवाज करणाऱ्या माणसाला डवचण्याचा प्रयत्न काही दुकानदार करीत आहेत,त्यामुळे प्रहार जन शक्ती संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला ञास झाला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत,यानंतर गोपनीय माहिती नुसार अधिकारी गावात येऊन प्रत्येक जनमानसाला हमी भावाविषयी माहीती विचारून पावती पेक्षा जास्त पैसे जर दुकान चालक घेत आसेल तर त्या दुकान चालकाविरुद्ध व शासनाने नेमलेल्या सचिवाविरूध्द गुन्हा दाखल होईल.तसेच दुकान चालक किती पैसे मागतात याची रेकॉर्ड करा तुमची माहीत खोपीनीय ठेवण्यात येईल. विनंती आहे प्रत्येक राशेन दुकान चालकाने दक्षता घ्यावी.

Saturday, November 9, 2019

११ वा  वृक्षारोपण कार्यक्रम वाळूज पोलीस स्टेशन समोर संपन्न झाला
Photos:-Baig Mushtak Mirza,Waluj, Aurangabad.


दि. ०६/११/२०१९ रोजी मेटॅलमन ऑटो प्रा.ली  कंपनीने १०१ झाडे वाळूज एम आय डी सी  पोलीस स्टेशन दुभाजकावर लावण्याचा कार्यक्रम श्री  बिक्रमजीत बेंबी (चेअरमन ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.




या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.  श्रीकांतजी मुंदडा (सी ओ ओ ), श्री प्रभाकर मते पाटील ( भारतीय कामगार सेना -चिटणीस ), श्री विजय साळवे (एच आर मॅनेजर ), श्री वाघ साहेब ( पोलीस निरीक्षक -वाळूज पोलीस स्टेशन ), श्री  अनिलकुमार डहाळे ( जी एम ) व श्री. कल्याण पिंप्रतीवर ( युनिट अध्यक्ष -भारतीय कामगार सेना) हे होते.


 मेटॅलमन ऑटो कंपनीने आतापर्यन्त वाळूज परिसरात ३५०० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत
या कार्यक्रमात  कंपनीतील  अधिकारी श्री. प्रकाश येखांडे ,सूर्यकांत शानबाग ,आनंद गलगली ,प्रवीण जोशी ,विक्रम पटवर्धन ,गजेंद्र  दकते ,अथिया युसूफ यांनी विविध प्रकारची झाडे लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुमित पाटील व आभार प्रदर्शन श्री. सचिन घोडके यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीतील श्री. अवधूत शिंदे, सुशील देवळे, विनोद वानखेडे ,रविकांत चिखले ,नारायण निकम ,गुरुदास पराते व बाळासाहेब नाटकर यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमात कंपनीतील कामगार व कर्मचारी उपस्थित होते.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...