सफाई कर्मचाऱ्यांच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई- मुकेश सारवान
औरंगाबाद/प्रतिनिधी
महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी (दि११) दिला.
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी महापालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त मंजूषा मुथा, सहायक आयुक्त विक्रम दराडे, पल्लवी घाटगे, वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे, विटेकर यांच्यासह बहुजन कामगार शक्ती महासंघाचे संजय रगडे, अशोक हिवराळे, कैलास जाधव, पंडित दाभाडे, वाल्मिक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माजी नगरसेवक संजू रिडलॉन, हुशारसिंग चव्हाण, मुकेश लव्हेरा, सामाजिक कार्यकत्र्या चंदा राजपूत आदींची उपस्थिती होती. या बैठकीत महापालिकेतील सफाई कामगारांच्या अडअडचणी जाणून घेतल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी पगार, बोनस वेळेवर मिळत नाही, अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतल्या जात नाही, अशा तक्रारी केल्या. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाड समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याची तक्रार केली. अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. काम करताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही सहकार्य केले जात नाही. अशा तक्रारीही कर्मचाऱ्यांनी केल्या.
त्यांनतर पत्रकार परिषदेत माहिती देताना मुकेश सोन सारवान म्हणाले, मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींचा व समस्यांचा आढावा घेतला. प्रशासनाने सकारात्मक भुमिका मांडली. लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन किमान १ तारखेला देण्यात यावे, हंगामी-कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, सफाई कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अहर्तानुसार पदोन्नती देण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील घरे मालकीहक्क नावे करुन देण्यात यावे, समाजमंदिरात मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना केल्या असल्याचे सारवान यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सारवान यांनी दिला. तसेच तीन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेवून प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल असे सारवान यांनी सांगितले.
व्यापारी संकुलात गाळे राखीव
सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगाराकरिता मनपाच्या व्यापारी संकुलातील एक गाळा राखीव ठेवावा असा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
सफाईच्या कामांचे कंत्राट देण्यास प्राधान्य
शहरातील सफाई कामांचे कंत्राट देण्यासाठी वाल्मिकी, मेहत्तर, सुदर्शन समाजाच्या संस्था, संघटनांना प्राधान्य देण्यात यावे, या समाजाचे जिवनमान उंचविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लागले ती मदत करावी अशा सूचना सारवान यांनी प्रशासनाला केल्या.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.