तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक
औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.
उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली. संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.