भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात ;
एक जण ठार दोन जण जखमी
औरंंगाबाद/प्रतिनिधी
समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जखमी झाले. हा अपघात गुरूवारी (दि.१३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चिकलठाणा गावाजवळ घडला. या अपघातात कुख्यात गुन्हेगार रईस बोक्या हा देखील जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण नामदेव चव्हाण (वय २५,रा. म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना) असे मयत तरूणाचे नाव आहे. संजय शिवाजी चव्हाण (वय ३०,रा.म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना), शेख रईस उर्फ बोक्या (रा.गरमपाणी परिसर, औरंगाबाद) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. श्रावण चव्हाण व संजय चव्हाण हे दोघे पडेगाव परिसरात राहणार्या बहिणीला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी आले होते. बहिणीला भेटून श्रावण चव्हाण, संजय चव्हाण हे दोघे परतुरला जात असतांना, त्यांना शेख रईस उर्फ बोक्या हा भेटला. त्यानंतर तिघेही दुचाकीवर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने परतुरकडे जात होते.
दरम्यान, चिकलठाणा गावाजवळील पुलावर समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी चालविणार्या श्रावण चव्हाण याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला जावून आदळली. या अपघातात तिघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावण चव्हाण, संजय चव्हाण यांना उपचारासाठी घाटीत हलविले असता डॉक्टरांनी श्रावण चव्हाण याला तपासून मयत घोषीत केले. हा अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शेख रईस उर्फ बोक्या याने घटनास्थळावरून धुम ठोकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------------------

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.