फटाका फोडल्याने एकावर गुन्हा
औरंंगाबाद : मानवी जिवीताला धोका पोहचेल अशा रितीने फटाका फोडुन १० वर्षीय मुलाच्या डोळ्यांना गंभीर ईजा पोहचविल्या प्रकरणी जखमी मुलाचे वडील रविंद्रसिंग अमरसिंग राजपुत (रा. बुढ्ढीलेन, ठाकुर वस्ती) यांनी दिलेल्या तक्रावरुन संशयीत निलेसिंग आनंदसिंग रापुत (रा. ठाकुर वस्ती, बुढ्ढीलेन) याच्या विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार ईलग करित आहेत.
-------------------------------------------------------
तरुणावर चाकुने वार; दोघांवर गुन्हा
औरंंगाबाद : तुझ्या भावाने आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का केली म्हणत तरुणाला मारहाण करुन चाकुने वार करण्यात आल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी ५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या रिक्षा पर्किंगमध्ये घडली. प्रकरणात रिक्षा चालक शेख आसिफ शेख चाँद (२२, रा. माणिक नगर, नारेगाव) याने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी शेख आसीफ शेख मुसा (२२) व शाहरुख शेख नफीस (२७, रा. नारेगाव) या दोघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार बोडले करित आहेत.

घराचे कुलूप तोडुन १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास
औरंंगाबाद : घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ४ ते १२ नोव्हेंबर दरम्यान गजाजन रेसिडेन्सी ऑडिटर सोसायटीत घडली. एन-११, मयुर नगर हडको परिसरात राहणारे दिलीप शेणफडु निकम (५०) यांचे सासरे घराला कुलूप देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घरातील ५० हजारांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात दिलीप निकम यांच्या तक्रारीवरुन हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार निळ करित आहेत.

आमिष दाखवून कामगार पुरवठादाराला दोन लाखांचा गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
औरंंगाबाद : इंव्हेटसाठी बांउनसर्स पुरविण्याचा कॉन्ट्रॅक्ट देतो तसेच इंव्हेटमध्ये भरपूर फायदा करुन देतो म्हणत मुंबईसह हिंगोलीच्या भामगट्याने कामगार पुरवठादाराला दोन लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना २० जून १७ ते २ फेबुवारी २०१८ दरम्यान घडली. नदीम अब्दुल वकील कादरी (४२, रा. औंढा नगरनाथ जि. हिंगोली) व सनि गुलशन अरोरा (३७, रा. मुंबई) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुरवठादार मोहमंद सिराज मोहमंद सुभान जहागिरदार (२६, रा. रोषणगेट, मकसुद कॉलनी) यांना संशयीत नदीम अब्दुल व सनि अरोरा या दोघांनी इंव्हेटसाठी बांउनसर्स पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतो तसेच इंव्हेट मध्ये भरपूर फायदा देखील देतो असे आमिष दाखविले. त्यासाठी दोन लाख रुपये लागतील अशी बतावणी संशयीतांनी केली. आमिषाला बळी पडुन मोहंमद सिराज यांनी दोन लाख रुपये संशयीतांच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यांनी सिराज यांना कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, त्यामुळे सिराज यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी संशयीतांनी तुला पैसे परत देत नाही, काय करायचे ते कर, आमचे हात वरपर्यंत आहेत. पोलिस देखील आमचे काही वाकडे करु शकत नाही. पुन्हा आम्हाला फोन केला तर तुझे हातपाय तोडुन कोठेही गाडुन टाकु अशी जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात मोहंमद सिराज यांच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार काळे करित आहेत.

विक्री केलेली जमीन पुन्हा विक्री; व्यापऱ्याला ११ लाखांचा गंडा
औरंंगाबाद : विक्री केलेली जमीन आपली असल्याची भासवत ती पुन्हा एका व्यापाऱ्याला विक्री करुन व्यापाऱ्याची ११ लाखांना फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. मोहम्मद अब्दुलसमीर अब्दुल साजीद व एजाज अली जैदी (रा. चेलीपुरा) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशीत आरोपी मोहम्मद अब्दुलसमीर याने त्याच्या मालकीची मौजे मिटमिटा येथील गट नं. २४ मधील जमीन २०१० मध्ये रिधिसिद्धी कोटेक्स प्रा.लि. यांना विक्री केली होती. असे असतांना देखील आरोपींनी सदरील १ हेक्टर १२ आर. जमीन स्वत: च्या मालकीची असल्याचे भासवत १८ ऑक्टोबर २०१८ रोजी व्यपारी प्रफुल्ल ब्रमवा दोघांनी नुतन कॉलनीत राहणारे व्यापारी प्रफुल्ल मुलचंद ब्रमवा यांना विक्री केली. या जमीनीपोटी ब्रमवा यांनी आरोपींना अंजठा अर्बन को. ऑ. बँकेचा ११ लाखांचा धनादेश दिला. मात्र सदरील जमीन आरोपींनी पूर्वीच कोणाला तरी विक्री केल्याचे ब्रमवा यांच्या निदर्शनास आले, त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षता येताच ब्रमवा यांनी आरोपी अब्दुल समीर यास दिलेले पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी ब्रमवा यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात ब्रमवा यांनी छावणी पोलिस ठाणे गाठुन दिलेल्यातक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ठोकळ करित आहेत.

मद्यपी पोलिसांच्या जाळ्यात
औरंंगाबाद : दारुच्या नशेत तर्रर्र होऊन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा शेख यासिन शेख करिम (रा. ता. पैठण) याला पोलिसांनी गजाआड केले. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानक चौकात घडली. प्रकरणात वाहतुक शाखेचे जमादार अनिल वानखेडे यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भदरगे करित आहेत.

क्षुल्लक कारणावरुन युवकाला बेदम मारहाण
औरंंगाबाद : पोलिसांना माझ्या मुलाची टिप का दिली म्हणत तरुणाला दोघांनी लोखंडी सळई व दगडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उस्मानपूरा परिसरात घडली. प्रकरणात जखमी आकाश शिवाजी हिवराळे (वय २३, रा. गल्ली नं.१, नागसेन नगर, उस्मानपूरा) याने दिलेल्या तक्रारीवरुन शेजारी राहणारा संशयीत आरोपी प्रदिप शेषराव धनेधर (वय ३५) व एका महिलेविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास जमादार बोडले करित आहेत.

क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण
औरंंगाबाद : अंगण झाडण्याच्या व अंगणातील कचरा उलण्याच्या कारणावरुन चौघांनी एका महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उस्मानपूरा परिसरात घडली. प्रकरणात ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी शिवा हिवराळे, तानाजी शिवा हिवराळे, देवा शिवा हिवराळे व एका महिलेविरुद्ध उस्मानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरा समोरुन दुचाकी लांबवली
औरंंगाबाद : घरासमोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेल्या दोन दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना सातारा परिसरात घडली. प्रकरणाणात आकाश देविदास झळके (वय २५, रा. वळदगाव ता.जि. औरंगाबाद) व सुहास सुधाकरराव मुळे (वय ४२, रा. शाकुंतल नगर, सातारा) यांदोघांनी अनुक्रमे आप-आपली दुचाकी (क्रं. एमएच-२०-एफएफ-१७८९), (क्रं. एमएच-२०-सीएम-५२८८) घरासमोर हॅन्डल लॉक करुन घरा समोर उभी केली असता चोरट्याने ती लंपास केली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको परिसरात महिलेचा मारहाण करुन विनयभंग
औरंंगाबाद : उसने परत घेण्यासाठी गेलेल्या महिलेला चौघांनी शिवीगाळ करुन तीचे कपडे फाडल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडली.
प्रकरणात २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली. तक्रारीनुसार पिडितेने संशयीत आरोपी अंकुश भोसले, बाळु गडवे व दोन महिलांना हात उसणे म्हणुन एक लाख रुपये दिले होते. मुदत उलटूनही पैसे परत न दिल्याने पिडिता आरोपींकडे पैशांची मागणी करत होती. मात्र आरोपी टाळाटाळ करित होते. त्यामुळे पिडिता ही आरोपींकडे उसणे दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेली असता आरोपींनी तिला कशाचे पैसे, आमच्याकडे तुझे पैसे नाहीत असे बोलून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपी अंकुश भोसले याने पिडतेचे कपडे फाडुन तीचा विनयभंग केला. प्रकरणात पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार जरारे करित आहेत.

अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविले
औरंंगाबाद : सिडको परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली.या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक जी.एम. बागवडे करित आहेत. तर दुसया घटनेत ४९ वर्षीय महिला ही कामानिमीत्त बाहेर गेली असता घरात असलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवुन नेले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक लाड करित आहेत.

अज्ञात कार चालकावर गुन्हा
औरंंगाबाद : भरधाव आलेल्या कारने सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वार गंभीर जमखी होऊन त्यांचा मृत्यु झाला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील बीएम पावर कंपनी समारे घडली. प्रकरणात मयत सिताराम सुर्यवंशी यांचा मुलगा गणेश सुर्यवंशी (वय २०, रा. हनुमान मंदीर, मुकुंदवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात कार चालकाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अन्नलदास करित आहेत.

हद्दपार आरोपी जेरबंद
औरंंगाबाद : शहरातुन हद्दपार केलेले असतांना देखील हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशरीरित्या शहरात फिरणारा आरोपी साबेर शेख गुलाम नबी (वय २२, ओहर ता.जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी पकडले असुन त्याच्याविरुद्ध हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख जहीर करित आहेत.

दुचाकीस्वारांनी मोबाईल पळविला
औरंंगाबाद : मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावुन घेत पळ काढल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वसंतराव नाईक चौकातील दिपाली हॉटेल जवळल घडली. प्रकरणात मुकुंदवाडी परिसरातील एसटी कॉलनीत राहणारा सिराज रहेमत शहा (वय २०) हा घरुन चहा पिण्यासाठी मोबाईलवर बोलत टपरीवर जात होता.वसंतराव नाईक चौकातील दिपाली हॉटेल समोर पाठीमागुन एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी सिराज याचा मोबाईल हिसकावुन घेत धुम ठोकली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शिरसाठ करित आहेत.

वाहतुकीस अडथळा; दोन वाहनचालकांवर गुन्हा
औरंंगाबाद : दौलताबाद येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रिक्षाचा (क्रं. एमएच-२०-डीसी-२९१३) चालक तोहित खान सफीराज खान (वय २४, रा. कोहीनुर कॉलनी) व छोटा हत्तीचा (क्रं. एमएच-१९-एस-८००५) चालक गणेश शामराव आढाव (वय २४) यादोघांवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार करित आहेत.

वृद्ध महिलेला मारहाण; पाच महिलांवर गुन्हा दाखल
औरंंगाबाद : गल्लीतील रस्त्यात उभी कार बाजुला घ्या म्हणुन सांगण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेला पाच महिलांनी घेरुन शिवीगाळ व माराहण केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर परिसरात घडली. ६५ वर्षीय महिलेने तीच्या मालकीची एक खोली किरायाने दिली होती. मात्र किरायदाराने ११ नोव्हेंबर रोजी ती खोली खाली केली. खोलीतील सामान त्याने छोटा हत्ती या वाहनात भरले होते. मात्र गल्लीतील रस्त्यात असलेल्या कारमुळे छोटा हत्ती बाहेर जात नव्हता. त्यामुळे ६५ वर्षीय महिलेने कार मालक अनिल साळवी यांना कार बाजुला घ्या सांगण्यासठी गेली असता, संशयीत आरोपींनी तु कोण आमची गाडी बाजुला लाव सांगणारी असे म्हणत शिवीगाळ करुन हाताचापटांनी मारहाण करुन जखमी केले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.