Saturday, August 31, 2019

*देशातील रस्ते बांधणी थांबवण्याचा आदेश*

 आर्थिक अडचणींच्या पार्श्‍वभूमीवर थेट पीएमओची सूचना
देशातील अर्थचक्र आणखी संकटात गेल्याचे संकेत

नवी दिल्ली: आर्थिक अडचणींमुळे देशातील रस्ते बांधणी थांबवण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. थेट पंतप्रधान कार्यालयातून हा आदेश देण्यात आल्याने देशापुढील आर्थिक पेचप्रसंग अधिकच बिकट झाला असल्याचे संकेत मिळत आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून नॅशनल हायवे ऍथॉरिटीला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की आपल्या विभागाने कोणतेही नियोजन न करता रस्ते बांधणीचे प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. त्याच्या खर्चाचा मोठा भार आता पेलणे अवघड झाले आहे आणि रस्त्यांसाठी जमीनींच्या खरेदीसाठीही मोठी रक्कम खर्ची घालणे आता अशक्‍य बनल्याने या ऍथॉरिटीने रस्ते बांधणीचे काम आता थांबवावे असा स्पष्ट आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे.
रस्ते उभारणीची कामे आता पुर्ण अव्यवहार्य ठरीत आहेत असेही यात नमूद करण्यात आले आहे. नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे रोड ऍसेट मॅनेजमेंट कंपनीत रूपांतर करण्याचा आदेशही पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. गेल्या वर्षात रस्ते बांधणीच्या कामावरील खर्चामुळे कर्जाचा भार सातपटीने वाढला आहे त्यामुळे ही बाब आता आवाक्‍या बाहेर गेल्याने त्यावर आठवडा भराच्या आत उत्तर द्या अशी सुचनाही पीएमओने नॅशनल हायवे ऍथॉरिटीला केली आहे.
गडकरी यांच्या या मंत्रालयाकडून देशात मोठ्या वेगाने रस्ते बांधणी सुरू करण्यात आल्याने त्याचा देशाच्या विकासातही मोठा लाभ झाल्याचा दावा खुद्द मोदींकडून करण्यात आला होता. पण आता हेच काम सरकारला डोई जड वाटू लागल्याने सरकारने थेट रस्ते बांधणीची कामेच थांबवण्याचा आदेश दिल्याने त्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात देशाची अर्थिक व्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स इतकी करण्याचा मनोदय पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा व्यक्‍त केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना बसलेला हा आणखी एक मोठा फटका मानला जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील वाढती तूट भरून काढणे सरकारला अशक्‍य होत असल्यानेच आता देशातील रस्ते बांधणीचे प्रकल्प थांबवण्याची वेळ सरकारवर आली आहे. या विषयावर पंतप्रधान कार्यालय किंवा नॅशनल हायवे ऍथॉरिटी यांच्यापैकी कोणीही प्रतिक्रीया दिलेली नाही. देशातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पांसाठी बीओटी म्हणजेच बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वाचाच पुन्हा वापर सुरू केला जावा अशी इच्छा पंतप्रधान कार्यालयाने व्यक्त केली आहे.
अन्वर खान यांच्या उपस्थितीत "महाराष्ट्र माझा" (एन. जी. ओ.) चे शिष्टमंडळाने मा. पो. आयुक्तांची भेट  घेतली व शहरातील राज्यातील ज्वलंत मुद्यांवर चर्चा केली.

औरंगाबाद. दिनांक ३१ ऑगस्ट २०१९: महाराष्ट्र माझा फौंडेशन च्या शिष्टमंडने आज पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे शहराचे मा.पोलीस आयुक्त श्री. चिंरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. एल्लोरा ग्रुप चे एम. डी. अन्वर खान याच्या नेतृत्वात मोहम्मद झिया, सय्यद अब्दुल रहमान, ऍड. जि. पी. पांडे इत्यादी या शिष्टमंडळात सामील होते. शहरात वाढत असलेले अमली पदार्थ सेवनामुळे होणारे गुन्हे, नागरी समस्यां, शहरातील वाहतुकीच्या समस्या, या प्रशांबाबत नवयुवकांमध्ये जागृती निर्माण करण्याबाबत विविध उपक्रम, अश्या विविध प्रश्नांवर मा. पो. आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. पोलिसांनी सुद्धा या उपक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा अशी विनंती देखील करण्यात आली. तसेच महाराष्ट्र माझा या एन. जी. ओ. च्या माध्यमाने येणाऱ्या गणपती उत्सव व मोहरम या मध्ये पोलीस प्रशासनाला वाहतुकीचा समस्येबाबत व इतर पोलिसांमार्फत या साठी स्वयंसेवकांनी (व्हॉलंटर) नेमून करण्याची तयारी मा. पो. आयुक्त साहेबांनी दर्शविली आहे.

Monday, August 26, 2019

मुख्यमंत्रीच्या रथ यात्रेसाठी औरंगाबाद शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्जचा घोडेबाजार
औरंगाबाद शहरातील रस्ते व रस्त्यावरील दुभाजक व चौकांमध्ये होर्डिंग चा बाजार लागल्याचे दिसते.हे कितीपत योग्य? यासंदर्भात महानगरपालिका कारवाईला पुढे येणार का? शहरांमध्ये फिरताना चोहीकडे फक्त मुख्यमंत्र्यांचे फोटो जणू शहरांमध्ये स्पर्धाच लागली आहे की मुख्यमंत्री जवळील कोणता नेता फार जवळ आहे हे दाखवण्यासाठी नेते लुडबुड करताना दिसत आहे. रस्त्यावर चालताना काही होल्डिंग दुभाजकावर अडथळा निर्माण करत आहे ह्या अडथळ्यांमुळे ट्राफिक मध्ये अडचण होत आहे परंतु याकडे पोलीस विभाग ट्राफिक यांच्याही दुर्लक्ष होत आहे आणि याकडे बघून कानाडोळा करत आहे.
अलीकडे महाराष्ट्रामध्ये सांगली,कोल्हापूर, सातारा येथे पाण्यामुळे प्रचंड हानी झाली आहे.
पूरग्रस्तांना राहण्यासाठी घर राहिले नाही कोणाचा भाऊ मेला कोणाची आई मेली कोणाचा नवरा मेला परंतु यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लक्ष घालून देऊन मदत करणे गरजेचे आहे.
आपण महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आहोत साहेब व आपले कर्तव्य जनतेला वेळोवेळी पायाभूत सुविधा पुरवणे,राज्यातील रस्ते व्यवस्थित करणे,रेल्वे येणाऱ्या अडचणी सोडविणे,अनधिकृत धंदे बंद करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षण विभागाचे बाजारीकरण थांबविणे, महाराष्ट्रात प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे हे ते भरणे, नवीन युवकांना स्पर्धा परीक्षा मार्फत शासकीय नोकरी देणे, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, मुद्रा लोणचे जाहिरातीच दिसतात लाभ मात्र कोणाला होताना दिसत नाहीये. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना मुद्रा लोन संदर्भात कित्येक वेळेस आपल्या भाषणात आव्हान केले की आपण मुद्रा लोणचे फाईली तयार करून नागरिकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा परंतु हे न होता आपण फक्त होल्डिंग आणि जाहिराती च्या मागे लागलेले दिसतात.साहेब हे कुठे ना कुठे थांबले पाहिजे असा जोरदार आवाज जनतेतून येत आहे?
*नेमके कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
असा बोचरा प्रश्न स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी युवा सामना मीडियाशी नाव न सांगता प्रकाशित करण्यासाठी विनंती केली. लोकांचे प्रश्न न सोडविता आपण खूप थाटाने महाराष्ट्रात रथ यात्रा काढली यात्रेमुळे जनतेला कितपत फायदा होईल यासंदर्भात सांगणे कठीण आहे.

*महाराष्ट्रात दुष्काळ
राज्यात कितीतरी शहरात पाणी न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहे माणसे तर सोळा जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
*म्हणे सातबारा कोरा करू केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जोरदार भाषण ठोकले. भाषणात शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करू असे आश्वासन दिले होते. आता पुरे झाले आश्वासन साहेब कुठेतरी महाराष्ट्रात लक्ष घालावा विकासाकडे महाराष्ट्र ही विनंती जनतेकडून येत आहे नाहीतर पुन्हा आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागेल. कृपया जनतेचा विश्वास याचे तरी भान कुठेतरी भामट्या नेत्यांनी ठेवावे व जनतेला न्याय द्यावा असा सूर महाराष्ट्रात सुरू आहे.
*पुण्याची अनधिकृत होर्डिंग ची घटना
दिनांक 5 ऑक्टोबर 2018 रोजी पुण्यातील घटना आपल्यासमोर आहे पुण्यामध्ये अचानक होर्डिंग कोसळून चार जण मृत्यू पावले होते व काही जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या घटने कडून आपण शिकण्या एवजी जणू होल्डिंग लावणाऱ्यांना चाप न देता नेत्यांच्या पाठिवर शब्बासकी देणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
याद राखा मुख्यमंत्रीसाहेब आपण विसरू नका जनतेने आपल्यावर फार विश्वास ठेवून आपल्याला सत्तेवर बसवले. परंतु आपण जर जनतेचा विश्वास मोडीत काढत स्वतःचाच वावा करण्यात वेळ घालवत असाल तर लवकरच जनता पुन्हा आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबाद शहराचे पूर्व चे आमदार व नवनिर्वाचित मंत्री अतुलजी सावे सुद्धा होल्डिंग लावण्यात मागे नाही. माननीय अतुल सावे यांच्याकडे उद्योग विभागाचे खाते देण्यात आले. उद्योग विभागाचे अनेक प्रश्न आजही महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. औरंगाबाद शहराचे एमआयडीसी वाळूज असो किंवा शेंद्रात खड्डेच खड्डे दिसतात. औरंगाबाद मध्ये नवीन उद्योग नवीन कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण फक्त होर्डिंग लावूनच समाधान व्यक्त करताना दिसतात. याला जनता माफ करणार की नाही हे तर येणारे निवडणूक ठरवेल.

Sunday, August 25, 2019

*प्रधानमंत्री किसान मानधन योजना......शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी  लाभदायक योजना*
          ही याेजना संपूर्ण देशात दि.9 ऑगस्ट 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत.पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्यांची नोंदणी दि.9 ऑगस्ट 2019 पासून सुरूही करण्यात आली आहे.
*चला तर मग...या योजनेची वैशिष्ट्ये स्वतः समजून घेवू या आणि गरजू  शेतकऱ्यांना समजावूनही सांगूया...*

*प्रधानमंत्री किसान मानधन योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

*ज्या शेतकऱ्यांनी वृद्धावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे,हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

*या योजनेंतर्गत सर्व पात्र व अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा रुपये 3000/- निश्चित पेन्शन देण्यात येईल.

*प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अंशदायी पेन्शन योजना आहे.

*या योजनेंतर्गत भारतीय जीवन विमा निगम द्वारा प्रवर्धित पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे.

*या योजनेंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार वय वर्ष 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत.

*या योजनेंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या दि.1ऑगस्ट 2019 रोजी च्या वयानुसार रक्कम रू.55/- ते रू.200/- प्रतिमाह मासिक हप्ता वयाच्या 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे.

*शेतकऱ्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्ते इतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्याच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे.

*अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पती-पत्नी स्वतंत्रपणेही या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात.

*त्यांच्या स्वतंत्र नोंदणी नुसार वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या दाेघांनाही स्वतंत्रपणे रुपये 3000/- प्रतिमाह मासिक पेन्शन मिळणार आहे.

*लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची सुद्धा तरतूद या योजनेत आहे.

*ज्या पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये नाेंदणी केल्यानंतर काही कारणामुळे त्यांना या योजनेतून बाहेर पडावयाचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा झालेली रक्कम व्याजासह त्यांना परत करण्यात येईल.

*या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्याचे सेवानिवृत्ती तारखेपूर्वी म्हणजेच वय वर्ष साठ वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वी आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या साठ वर्षे वयापर्यंतचे उर्वरित मासिक हप्ते पती किंवा पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात.

*सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या पती-पत्नी शेतकऱ्याचे पेन्शन खाते बंद करावयाचे असल्यास त्या पती-पत्नी शेतकऱ्याने पेन्शन फंडांमध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदार पती किंवा पत्नी शेतकऱ्यास मिळेल.

*सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्यास पती किंवा पत्नी नसल्यास या शेतकऱ्याने पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह त्याच्या वारसदारास मिळेल.

*सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकर्‍याच्या पती किंवा पत्नीस दरमहा 50 टक्के म्हणजेच रुपये 1500/- पारिवारिक मासिक पेन्शन( कुटुंब निवृत्ती वेतन) मिळेल.

*या योजनेंतर्गत नोंद नोंदणीकृत शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभार्थी असल्यास त्याच्या संमतीनुसार पी एम किसान योजनेच्या लाभातून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा हप्ता रक्कम कपात करण्यात येईल.

*या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत http//:pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

*केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये तीस प्रति शेतकरी सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार आहे.

*नोंदणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड,बँक पासबुक,मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात जाताना साेबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

*प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्रतेचे निकष:-*

*राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस कर्मचारी,राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्कीम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुविधा सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेकरिता अपात्र असतील.

*कामगार आणि रोजगार मंत्रालय द्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेकरिता अपात्र असतील.

*कामगार आणि रोजगार मंत्रालय द्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेमध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेकरिता अपात्र असतील.

*उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी लाभार्थी प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील.

*जमीन धारण करणारी संस्था, संविधानीक पद धारण करणारी/ केलेली आजी-माजी व्यक्ती, आजी-माजी मंत्री/खासदार/ आमदार/महापालिकेचे महापौर/ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष/केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी/शासन अंगीकृत संस्था/स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी-कर्मचारी/ चतुर्थ श्रेणी गट वर्ग 4चे कर्मचारी वगळून मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती/नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर/वकील/ अभियंता/सनदी लेखापाल/ वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या याेजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील.

*तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणाऱ्या या याेजनेच्या लाभाकरिता  निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी केले आहे.*

*मनोज शिवाजी सानप*
*जिल्हा माहिती अधिकारी* *उस्मानाबाद*
🙏
*या घोटाळ्याची पण ED चौकशी करा...*
१) चिक्की घोटाळा
२) प्रकाश मेहता ५००० कोटी जमीन घोटाळा
३) सुभाष देशमुख लोकमंगल घोटाळा
४) संभाजी पाटील निलंगेकर बँक घोटाळा
५)जयकुमार रावल रिसॉर्ट घोटाळा
६) गिरीश बापट १० हजार कोटींचा तूर डाळ घोटाळा
७)सुभाष देसाई, नाशिक MIDC जमीन खरेदी घोटाळा
८) प्रवीण दरेकर मुंबई बँक घोटाळा
९) चंद्रकांत पाटील पुणे जमीन घोटाळा
१०) नरेंद्र मेहता ७११- tdr, आरक्षण, भूखंड, पर्यावरण, अँटिकरप्शन घोटाळा
११) मोहित कम्बोज : बैंक व्यवहार घोटाळेबाज
११) राफेल घोटाळा इत्यादी..
🙏
*स्वत:च्या पक्षात हजारो चोरांची भरती करुन घेतली आणी चोरांचा सरदार कारवाई करतोय*
🙏 *माझं कोणाला समर्थन पण नाही किंवा कोणाला आक्षेप पण नाही.* 🙏
🙏 *पण गुन्हा हा गुन्हा आहे तो कोणीही केलातारी त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, मग तो सत्तेत असो वा नसो*🙏
*🙏मी एक स्वतंत्र भारताचा नागरिक🙏*
*RBI All Officers Leave Cancelled .....*
*Something Too BIG is Going to Happen in Short Time......*
*Be careful while spending. Heavy recession ahead.*
*There is unannounced financial crisis in India. Such crises appear to the public slowly. I consider the current situation is only first round of crisis.*
• Increasing the *NPA* of banks means. Scarcity of capital which means no fresh investment. The glorification of bankrupt law and Continuous scams in companies
• *Homes* are not being sold which means sale of steel, cement, bathroom fittings, construction declining. With this banks NPAs will grow. These NPAs go deep into individual level by making the crisis deeper.
• *Vehicle* sales are declining. At present first time in the country sale of two wheelers are showing negative growth. Maruti has cut down production by 50%. Many of the auto dealers are closing down. This means there is substantial reduction demand for steel, tyre and other accessories.
The above three things are meant to be the end of the crores of jobs and the reduction of government's tax revenues. In such a situation, the government becomes frustrated and wants to complete its loss by putting taxes on everything, The government hands over the profits in private hands and puts the deficit in the government account. In such a situation, the government properties are sold in multiples of their favorite corporate and the losses increase.
*Crisis in India will be visible around March 2020,* Most of the average Indians are unaware about this. It's time to be careful when you are not able to sell soap, shampoo and detergent.
For the past few years, even the *FMCG sector* is also in the grip of recession-. Do you remember when you have last seen Baba Ramdev's Patanjali Company's advertisement? Patanjali was most active on TV about 2 years back., but for last one year, the condition of even Patanjali which grew at the fastest pace in India's FMCG market is alarming.. Sales of Patanjali's products is shrinking. Apart from this, Patanjali Ayurveda has shown 10% Revenue Deficit in FY 2018. Not only companies such as Patanjali but Hindustan Lever also have come down in growth.
Demand for fast-selling consumer goods such as soap, toothpaste, hair oil, biscuits etc. has decreased considerably in rural areas. This has also slowed down the performance of those businesses, which are dependent on healthy rural demand. It includes FMCG, two-wheeler and auto companies that make entry-level cars.
Now come on the transport-According to the report of the Indian Foundation of Transport Research and Training, 15% drop in truck rentals has reported since November 2018. Also Fleet Utilization has dropped more than that. All 75 trunk routes, rentals have gone down substantially. Between April and June, Fleet Utilization has decreased 25% to 30% compared to the first quarter of last year. This also reduces the income of transporters by about 30%. Many operators may also come in the Fleet's EMI default in the next quarter.
There is a clear impact on the freight demand because of reduction in industrial production. Demand from the manufacturing sector, which contributes the most to truck transport, is at minimum level.
Consumers spending in cities and rural areas have reduced and transportation in agriculture has almost become sluggish after the peak demand of April. In June, the demand for fruits and vegetables by FMCG has decreased by 20%.
Due to the decrease of the freight demand, truck fleet has reduced by 30% on all major routes of the country in the first quarter.
👆🏾😔 *Important. Please read the whole content carefully and spent your hard earnings wisely and where is necessary.* 👍👍

Saturday, August 24, 2019

आज दुपारी सुर्य नवीन रुपात दिसला सदरील फोटो काढण्यासाठी दिवसभर युवकांनी शहरभरात गर्दी केली.हा फोटो सूर्य जणू आपल्या फारच जवळ आल्याचे दिसत होते आणि हे चित्र आपल्या मोबाईल मध्ये काढण्यासाठी युवकांनी एकूणच प्रचंड गर्दी केली होती दुपारी.
१२ ते १ च्या दरम्यान सप्तरंगाची छटा सूर्यावर आली असता याचे वेगळ्या प्रकारचे छटा काढण्यासाठी युवक आपल्या मोबाईलवर छायाचित्रे काढण्यासाठी चढाओढ सुरु होती.सोशलमिडियावर
 सुर्याचे विविध प्रकारचे छायाचित्रे व्हायरल होत आहे. फोटो काढण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. सूर्याचा सप्तरंगी आपल्याला या चित्रांमध्ये दिसत आहे.
जेष्ठ समाज सेवकांनी घेतली अधिष्ठता डॉ. कनन येळीकर यांची भेट.
Photo:-Baig Mushtak mirza, Aurangabad
शासकीय वैधकीय रुग्णालय ला लागणारी औषध, साहित्य व मदत या विषयी चर्चा.

औरंगाबाद. दिनांक २२ ऑगस्ट २०१९. शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे संपूर्ण मराठवाड्या साठी जणू काही एक वरदानच आहे. असंख्य गरीब व गरजू रुग्णांना ह्या दवाखान्यातूनच नवीन जीवन दान मिळते. शासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीने रुग्णांच्या उपचाराची काळजी घेत आहे. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आज काही समाजसेवकांनी शासकीय वैधकीय रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉ. कनन येळीकर यांची स्वइच्छा भेट घेतली.
एलोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक अन्वर खान, माविन चे संचालक सय्यद अब्दुल रहमान, हिमोफेलिया सोसायटी चे उपाध्यक्ष मोहम्मद झियाउद्दीन, औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेरे सोसायटी चे अध्यक्ष प्रा. सोहेल झकीऊद्दीन तसेच अनेक समाज सेवक हि या शिष्ठ मंडळात सामील होते. अन्वर खान यांनी अधिष्ठता डॉ. कनन येळीकर यांना आश्वासन दिले कि अपघात विभागात लागणारे व्हेंटिलेटर, अत्यावश्यक औषधींचा साठा, व्हीलचेर, स्ट्रेचर तसेच डिस्पोसीबल बेडशीट घाटी रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करतील. तसेच ह्या व्यतिरिक्त रुग्णांना लागणाऱ्या सोई सुविधा पुरविण्याकरिता शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी देखील ते तयार आहे असे त्यांनी सांगितले. वैधकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने हि या प्रसंगी उपस्थित होते.
*आपण सगळे जेंव्हा काश्मीर मुद्दा,आर्टिकल 370,ट्रिपल तलाक च्या मुद्दयावर चर्चा करत होतो,तेंव्हा देशभरात काय काय घडत होत,त्यावर एक नजर टाकूयात..!*

1. जेट एअरवेज ला टाळ लागलं.
2. एअर इंडिया ही *7600* कोटी रुपयांने तोट्यात आलीय.
3. BSNL मधल्या तब्बल *54,000* कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
4. HAL (हिंदुस्तान ऐरोनोटिकस लिमिटेड) च्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर गदा आली आहे.
5. पोस्ट खात *15,000* करोड रुपयांनी तोट्यात आलं आहे.
6. *10 लाखांच्या* आसपास जॉब येत्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधून जाणार आहेत.
7. मंदीमुळे सर्व मोठ्या महानगरात मिळून *12.76* लक्ष घर अजूनही विकली गेलेली नाहीयेत.
8. एअरसेल संपली.
9. जे पी ग्रुप बंद पडली.
10. भारताची सगळ्यात नफ्यात असणारी कंपनी ONGC ही तोट्यात आली आहे.
11. देशाला चुना लावून आणि हजारो करोड बुडवून एकूण *36* उद्योगपती देश सोडून पळून गेले आहेत.
12. *2.4 लाख* करोड रुपयांची कर्ज बोटावर मोजता येईल इतक्या कॉर्पोरेट जायंट्स ना माफ करण्यात आली आहेत. *(दुसरीकडे केवळ 72 हजार कोटींचे कर्ज आहेत देशभरातील शेतकऱ्यांचे,त्यांना मात्र माफ नाही..!)*
13. पंजाब नॅशनल बँक सातत्याने तोट्यात.काही दिवसातच बँकेला टाळ लागण्याची शक्यता.
14. सर्व राष्ट्रीय बँका भयानक तोट्यात.
15. जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जात देशावर *35 लाख कोटींपर्यंतची* वाढ.
16. रेल्वे विकणे आहे.
17. जागतिक वारसा असणारा लाल किल्ला आता भाड्याने देण्यात आलाय.
18. देशातील सर्वात मोठं उत्पादन असणारी मारुती सुझुकी ने उत्पादनात कपात केली आहे.सोबतच *3000* च्या वर कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.येत्या काळात हा आकडा पाच अंकी होण्याची शक्यता देखील आहे.
19. *55,000* करोड रुपयांची उत्पादने कंपन्यात पडून आहेत.कारण,खरेदीदार नाहीत.
20. देशभरातील बिल्डर्स प्रचंड तणावात आहेत.कारण त्यांची घरे घेण्यास खरेदीदार नाहीत.नवीन प्रोजेक्ट्स पूर्णपणे ठप्प आहेत.कारण यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झालीय.(GST 18%)परिणामी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.
21. आयुध निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा खासगीकरण करण्याचा सरकारने घाट घातला आहे.परिणामी *1.5 लाख* कामगारांच्या आणि त्यांच्या परिवाराचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
22. नोटबंदीमुळे लाखो जॉब्ज गेले आहेत.
23. मागच्या *45* वर्षात देशात सर्वांत जास्ती बेरोजगारी वाढली आहे.
24. देशातील *5 विमानतळ* अडाणी ग्रुप्स ला विकण्यात आले आहेत.
25. आर्थिक मंदीमुळे सर्वात मोठा मार युवकांना.नोकऱ्यांच नाहीत.
26. जवळपास *5000* HNI (high net worth individuals) देश सोडून इतर देशात स्थायिक झाले आहेत.
27. व्हिडीओकॉन डुबली.
28. टाटा डोकॉमो गायब झाली.
29. CCD चे मालक सिद्धार्थ यांना आत्महत्या करावी लागली.
30. महिंद्रा ने नोकर कपात केली.शिवाय त्यांचे अनेक प्लांट चे उत्पादन कमी केले.

यातील किती मुद्द्यावर तुम्हाला मीडियात चर्चा दिसल्या..? किती लोकांना या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्राईम टाइम मध्ये दिसल्या..? किती मुद्द्यांवर सरकारने स्पष्टीकरण दिले..?

तुम्ही काश्मीर,370 करत बसलात.ट्रिपल तलाक चा राग आळपत बसलात.त्याकाळात या देशाला आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकारने भयानक घोडे लावले आहेत.आज तुम्हाला याची झळ कदाचित बसत नसेल.पण येणाऱ्या काळात ती नक्कीच बसणार आहे..!!
राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आठवतो आहे आता,

*लगेगी आग तो आएंगे घर कई जद में,*
*यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है*
माजी केंद्रीय अर्थ मंत्री जेष्ठ नेते
  श्री. अरुणजी जेटली यांचे अल्पशा आजाराने एम्स मद्धे निधन
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
           देशाने अजून एक तारा गमावला
   ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
     💐💐💐💐💐💐💐

*YUVA SAMNA MEDIA GROUP Online | Current News Update*
*देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन*
नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Thursday, August 22, 2019

तब्बल साडेआठ तास राज ठाकरे ईडी समोरच*

-----------------------------------
मुंबई : कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहारप्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीच्या कार्यालयात गेले सुमारे साडे आठ तास चौकशी सुरु आहे. ११.३० च्या दरम्यान राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. तब्बल साडेआठ तासाहून अधिक वेळ लोटला तरी अजून ही चौकशी सुरुच आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. या कारवाईविरोधात बंद आणि इतर पद्धतीने निषेध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र राज ठाकरेंनी शांतता बाळगण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलंय. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नसली तरी ऐनवेळी विरोध प्रदर्शन केला जाण्याची शक्यता आहे.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काहीही करू नका नाही तर कारवाई केली जाईल अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. बुधवारी दुपारपासूनच पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तसंच राज ठाकरे यांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 
अति महत्वाच्या बातम्या
*07:15 AM* राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे; टोकाचे पाऊल उचलू नका, कार्यकर्त्यांना आवाहन

*07:22 AM* आणखी चार व्यवहारात चिदम्बरम यांच्यावर संशयाची सुई

*07:40 AM* जीएसटी पोर्टल सतत होत आहे हॅँग, रिटर्न फाईल करण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढविण्याची मागणी

*08:04 AM* राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

*08:07 AM* मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात.

*09:18 AM* मुंबई : सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचं 'EDiot Hitler' लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे.

*09:37 AM* ठाणे : मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

*09:41 AM* 'औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था' निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे 418 मतांनी विजयी.

*09:50 AM* P. Chidambaram Arrested Live : चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करणार

*10:08 AM* चिदंबरम कायद्याचे जाणकार आहेत, कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी असे वर्तन करायला नको होते - सत्यपाल सिंह

*10:23 AM* मुंबई : राज ठाकरे सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

*10:32 AM* ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव याना देखील नौपाडा पोलिसांच्या ताब्यात

*10:32 AM* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि सुपुत्र अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात जाणार.

*10:37 AM* मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे रवाना

*10:47 AM* राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील - अविनाश जाधव

*11:02 AM* मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे ठप्प, कळवा येथे लेव्हल क्रॉसिंग गेट अधिक वेळ सुरू राहिल्याने ठाणे-कल्याण मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक बंद

*11:31 AM* मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहोचले

*11:38 AM* मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

*12:07 PM* भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण

*12:27 PM* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

*12:33 PM* औरंगाबाद : सलीम अली तलावात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; सिटी चौक पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला.

*12:42 PM* Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प

*01:11 PM* खामगाव बसस्थानकावर पोलिसाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

*01:22 PM* नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मखमलाबाद गावात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे 31 लाख 75 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

*01:40 PM* गुन्हा केला नसेल तर चौकशीला बेडरपणे सामोरे जावे - संजय राऊत

*01:41 PM* नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नेत्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची जंतर मंतरवर निदर्शने

*02:12 PM* मुंबई - ईडीकडून राज ठाकरेंची आजची चौकशी सात वाजेपर्यंत चालणार :तिघा अधिकाऱ्यांकडून राज यांच्याकडे सविस्तर विचारणा, सूत्रांची माहिती

*02:24 PM* नवी दिल्ली - चिदंबरम यांना झालेली अटक हे सुडाचे राजकारण, डीएमकेचे नेते स्टॅलिन यांचा आरोप

*02:31 PM* अकोला - मूर्तिजापूर एमआयडीसी परिसरातील ऑईल मिलला भीषण आग, लाखोंचे नुकसान

*02:43 PM* नाशिक : एका नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास आणि 1 हजाराचा दंड, 2011 साली घडली होती घटना

*02:53 PM* सचिन तेंडुलकरचा एक विक्रम विराट कोहली कधीच मोडू शकत नाही, वीरूचा दावा

*02:56 PM* उरण - खळबळजनक घटना; पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

*03:04 PM* उरण - पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या, उरणमध्ये खळबळ

*03:23 PM* मुंबई - बीसीसीआयच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल प्राप्त; एटीएसकडून तपास सुरु

*03:41 PM* कल्याण - राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी सुरू झाल्यानंतर कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील दुकाने बंद

*03:53 PM* महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाः अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण यांच्याविरोधात पाच दिवसांत गुन्हे दाखल कराः उच्च न्यायालयाचे आदेश

*05:25 PM* सोलापूर : रस्त्यावर थांबलेल्या वृद्धेस एसटी बसची धडक, 75 वर्षीय वृद्ध जागीच ठार, बार्शी तालुक्यातील वैराग येथील घटना

*05:44 PM* बुलडाणा: तालुक्यातील धाड येथे अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा बलात्कार; तीन आरोपी अटक, दोघे फरार

*05:59 PM* मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड

*06:01 PM* लंडन - नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

*06:05 PM* यवतमाळ : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. यवतमाळ सत्र न्यायालयाचा निर्णय

*06:06 PM* विवाहबाह्य संबंधातून पत्नीने केली पतीची चाकू भोसकून हत्या

*06:09 PM* नवी दिल्ली - चिदंबरम यांची ईडीविरोधातील याचिकेवर 27 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर सीबीआयविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी होणार

*06:20 PM* सोलापूर : शहर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची नांदेड पोलीस अधीक्षकपदी बदली

*07:18 PM* West Indies v/s India Test Match: वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

*07:49 PM* गोव्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

*07:53 PM* दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी विक्रम भावेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास पुणे सत्र न्यायालयाकडून सीबीआयला ९० दिवसांची मुदतवाढ

*07:54 PM* पुणे - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर
सलीम अली सरोवरात महिलेचा मृतदेह आढळला

औरंंगाबाद/प्रतिनिधी
टीव्ही सेंटर रोडवरील सलीम अली सरोवरात एका ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गुरूवारी (दि.२२) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मयत महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविला. मयत महिलेच्या अंगावर केशरी रंगाची साडी असून हातात बेन्टेक्सची बांगडी आहे. गळ्यात काळ्या मण्याची पोत आणि तुळशीमाळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत मयत महिलेची ओळख पटली नसल्याचे सिटीचौक पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला याचा तपासही पोलिस करीत आहेत.
सिल्लोड येथे आनंदोत्सव साजरा, अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले आणि दानवे विजय झाले.


औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अंबादास दानवे  विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सिल्लोड येथील अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थकांनी सिल्लोड शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यलयासमोर व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अंबादास दानवे यांच्या विजयाचे फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी युवा नेते अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे,नगरसेवक विठ्ठल सपकाळ,सलीम हुसेन,शंकरराव खांडवे,सत्तार हुसेन,सुधाकर पाटील,मनोज झंवर,राजेंद्र गौर,प्रशांत क्षीरसागर,जितेंद्र आरके,सतीश ताठे,सुशील गोसावी,फहिम पठाण,राजरत्न निकम,शेख वसीम व इतर

Wednesday, August 21, 2019

*अंबादास दाणवे 524 मते घेऊन पहिल्या फेरीतच विजयी*

शिवसेना-भाजपा युतीचे अंबादास दानवे यांना ५२४ मते पहील्या फेरीत मिळाली. तर कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. अपक्ष शहानवाज खान यांना ३ मतांवर समाधान मानावे लागले. युतीकडे ३३० मते होती दानवेंना यापैकी १०७ मते जास्त मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. एमआयएमची २८ मते घेण्याची किमया अंबादास दानवे यांनी या निवडणुकीत करून दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आघाडीकडे २५० मते होती तरी कुलकर्णी यांना यापैकी १०६ मते मिळाली आहे. यावरून कॉंग्रेसने बळजबरी उमेदवार लादल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. एमआयएम, आरपीआय, बसपा, अपक्ष मिळून ७७ मते होती. एकूण ६५७ मते होती ६४७ मतदान झाले होते त्यापैकी ६३३ मते वैध ठरली. कोटा ३१७ मतांचा होता. १० वाजून १७ मिनटांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी ५२४ मते घेतलेले अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून जल्लोष केला. महीला कार्यकर्त्यांनी सुध्दा जल्लोषात सहभाग घेवून आनंद व्यक्त केला. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यावर आता शिवसेनेचे अंबादास दानवे यांचे वर्चस्व राहणार असून आगामी निवडणुकीत दानवे यांना आपली किमया दाखवणे आता सहज शक्य होणार आहे. 

*Ambadas Danve Won the election in first round by getting 525 votes*
-OVM
: Ambadas danve 524
Kulkarni 106
Shahnavaz 3
Invalid Votes 14
-OVM




युवा सामना मिडियाचा दावा ठरला खरा.

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज संस्थेतअंबादास दानवे यांचा विजय निश्चित होणार. युवा सामना मिडियाचा दावा.निकाल-२२ आगसट २०१९ रोजी निश्चिती.
महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील

थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे



औरंगाबाद / प्रतिनिधी
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने बुधवार (दि.21) पासून दहा दिवसांची विशेष कर वसुली मोहीम सुरु केली आहे. मोहीमेच्या पहिल्याच दिवशी एक शाळा, महाविद्यालय व मंगल कार्यालयासह पाच मालमत्तांना थकीत कर न भरल्याने मनपाच्या प्रभाग पथकांनी टाळे ठोकले आहे. पहिल्या दिवशीच्या कारवाईत तीन लाख रूपयांपेक्षा अधिक कर देखील वसुल करण्यात आला आहे.

थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने वारंवार विशेष कर वसुली मोहीम राबवित व्याज व दंडात 75 टक्क्यापर्यंत सुट दिली. मात्र, यानंतरही मालमत्ताधारक थकबाकी भरत नसल्याने पालिकेने आता कडक पाऊल उचलले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी बुधवारपासून विशेष कर वसुली मोहीम राबवित असल्याची घोषणा केली होती. या मोहीमेत आता बड्या व्यावसायिक थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत त्याप्रमाणे अधिकार्‍यांना आदेशित केले होते. त्यानुसार बुधवारी दि.21 पालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी मोहीमेला सुरूवात केली. प्रभाग-1 मध्ये प्रमुख अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या नेतृत्वात शारिरीक शिक्षण महाविद्यालय पीएस कॉलेज परिसरातील प्राचार्यांचा हॉल सिल करण्यात आला. तर डायमंड हॉल येथे दोन दुकाने सिल केली. पथक कारवाईसाठी गेले असता शिवेश्वर मंडप यांनी लगेच दोन लाख रूपयांच्या कराचा भरणार केला. याप्रमाणे प्रभाग-1 मध्ये सहा मालमत्तांवर कारवाई करत 3 लाख 15 हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला. प्रभाग-7 मध्ये प्रमुख अधिकारी महावीर पाटणी यांच्या नेतृत्वात डॉ. आर.पी. नाथ हायस्कूल शाळेकडे 3 लाख 30 हजार 763 थकबाकी असल्याने शाळेच्या अनुक्रमे कॉम्पुटर रूम, हेडमास्तर यांची रूम व हजेरी रूम अशा 3 खोल्यांना टाळे ठोकण्यात आले. प्रमोद किशोरीलाल जैस्वाल यांनी 50 हजार रुपयांचे दोन धनादेश पुढील 2 दिवसांचे दिले. तर जय भवानीनगर येथील खालसा मंगल कार्यालय यांच्या कडे 1 लाख 85 हजार 207 रुपये थकबाकी होती. पथक कारवाईला गेल्यानंतरही ती भरली नसल्याने मंगल कार्यालय सिल करण्यात आले.
परप्रांतीय भामट्याने ठेकेदाराला ५६ लाखाला गंडविले, यंत्रसामुग्री केली गायब

औरंंगाबाद/प्रतिनिधी 
शासकीय ठेकेदाराला राजस्थानी भामट्याने गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. राजस्थानी भामट्याने पुलाच्या बांधकामासाठी नेलेली ५६ लाख रूपये किंमतीची यंत्रसामुग्री गायब केली आहे. शरद दादीज कैलास दादीज (वय ४०, रा. नलका नाल्याजवळ, प्लॉट नंबर ७/८, शिवाजीनगर, बागन, राजस्थान) अशी फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे.

अहिंसानगर येथील रहिवासी विश्वनाथ शामराव घुगे (वय ६५) हे शासकीय ठेकेदार असून ते महाराष्ट्र, राजस्थान आणि गोवा राज्यात पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारी कामे करतात. २०१५ साली त्यांना राजस्थान येथील बेनगंगा नदीवर पुल उभारण्याचे काम मिळाले होते. त्या कामावर देखरेख करण्यासाठी विश्वनाथ घुगे यांनी शरद दादीज कैलासचंद्र दादीज याला सुपरवायझर म्हणून नेमले होते. तसेच बांधकामासाठी ट्रक क्रमांक (एमएच-२०-एटी-२३९७), जीप क्रमांक (एमएच-२०-डीव्ही-६५९७), स्वीसींगसीटर प्लॉट, जनरेटर, २ क्राँक्रीट मिक्सर, सेंट्रीग प्लेट, जॅक असा एकूण ५६ लाख रूपये किंमतीची यंत्रसामुग्री १ फेब्रुवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान शरद दादीज यांच्या ताब्यात दिली होती.
दरम्यान, शरद दादीज याने काम पुर्ण झाल्यावर स्थानिक गुंडाच्या मदतीने विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा महेश घुगे यांना यंत्रसामुग्री परत नेण्यास विरोध केला. त्यानंतर दादीज याने घुगे यांच्या मालकीची यंत्रसामुग्री इतरत्र भाड्याने देवून भाड्यापोटी मिळालेल्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी महेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद दादीज याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते करीत आहेत.
एटीएम कार्डाची अदलाबदली करून ६० हजार लांबविले

औरंंगाबाद/प्रतिनिधी
नवीन मिळालेले एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी एटीएम सेंटर येथे गेलेल्या महिलेच्या एटीएम कार्डासोबत अदलाबदली करून दोन भामट्यांनी तिच्या बँक खात्यावरून ६० हजार रूपये लंपास केले. ही घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
गारखेडा परिसरातील सारंग हौसींग सोसायटी येथे राहणाऱ्या रेणुका सचिन राजे (वय ४२) यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांना नुकतेच बँकेने एटीएम कार्ड दिले होते. नवीन कार्ड सुरू करण्यासाठी रेणुका राजे या २० ऑगस्ट रोजी पटीयाला कॉर्नर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर येथे गेल्या होत्या. राजे या एटीएमचा पासवर्ड लॉग इन करीत असतांना एटीएममध्ये आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन जणांनी तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकत असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड घेवून त्याच्या बदलीत दुसरेच कार्ड राजे यांच्या हातात देवून निघुन गेले.
दरम्यान, भामट्यांनी रेणूका राजे यांच्या एटीएम कार्डाच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून एकदा २० हजार तर एकदा ४० असे एकूण ६० हजार रूपये काढले. याप्रकरणी रेणूका राजे यांच्या तक्रारीवरून एटीएम कार्डाची अदलाबदली करून ६० हजार रूपये लांबविणाऱ्या दोघाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.
आजपर्यंतच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्ट्राचाराचा मलिदा चाखला : नगरसेविका वाडकर खणखणीत आरोप

मनपात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका प्रशासनातील अधिकारी एकाच विभागात ठाण मांडून वर्षानुवर्षे बसलेले आहेत. त्यामुळे विकास कामे ठप्प झाली असून आता पर्यंत आलेल्या जवळपास सर्व आयुक्तांनी भ्रष्टाचारात सामील होत अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे, असा घणाघाती आरोप नगरसेविका शिल्पराणी वाडकर यांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार नियतकालिक बदल्या करण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे.

नगरसेविका वाडकर यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मनपातील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले आहेत. यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत वेळोवेळी प्रशासनाला विचारणा केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शासकीय बदल्यांचे विनियम केले आहे.  त्यात अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणणे, पारदर्शकता जपणे, कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन गतिमान करणे यासाठी बदल्या करणे आवश्यक आहे. मात्र, आत्तापर्यंत महापालिकेत आलेले जवळपास आयुक्त यांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांनी अनेक वर्षांपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांना महत्वाच्या व भ्रष्टाचारास पोषक असलेल्या विभागातून बदल्या केलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनाही भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक संकटात सापडली आहे. मनपातील गैरकारभाराची सीआयडी मार्फत चौकशी केल्यास बहुताउंश अधिकारी- कर्मचारी जेल मध्ये दिसतील असा घणाघाती आरोप वाडकर यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, नगररचना विभागाला आर्थिक वर्षात 220 कोटी वसुलीचे उद्दिष्ठ असताना केवळ 55 कोटी वसुली झाली आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही परिश्रम घेतलेले नाहीत. मालमत्ता कर वसुलीचे 450 कोटींचे उद्दिष्ठ असताना केवळ 115 कोटी वसुली झाली. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. मनपाच्या मालमत्ताच्या भाडेपट्टा व भाड्याच्या रकमा थकीत असून करारनामे कालबाह्य आहेत. यासह अनेक आरोप करत त्यांनी अधिकारी केवळ मौजमजा करायला येतात त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नसून त्यांच्या बदल्या कराव्या अशी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. सोबत मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रत पाठविण्यात आली आहे.

Monday, August 19, 2019

कैलासनगर भागात ठेकेदाराचा भरदिवसा भोसकून खून

दोघे जण पोलिसांच्या ताब्यात

औरंंगाबाद/प्रतिनिधी 
व्यावसायीक आर्थिक देवाण-घेवणीच्या वादातून ३२ वर्षीय ठेकेदार युवकाचा तीन जणांनी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे खून केला. ही घटना सोमवारी (दि.१९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कैलासनगर भागातील गल्ली नंबर १ येथे घडली. फेरोज खान अनिस खान (वय ३२, रा.दादा कॉलनी, कैलासनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हुसेन खान इब्राहीम खान उर्फ बाली (वय ३८, रा.दादा कॉलनी) आणि उस्मान खान या दोघांना ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरोज खान अनिस खान हा युवक ठेकेदारीचा आणि वाळुचा व्यवसाय करीत होता. गेल्या काही दिवसापासून दादा कॉलनीत राहणाऱ्या हुसेन खान उर्फ बाली याच्यासोबत फेरोज खान याचा आर्थिक देवाण-घेवणीच्या कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री फेरोज खान व हुसेन बाली यांच्यात देवाण-घेवाणीच्या कारणावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फेरोज खान हा आपल्या घरी असतांना हुसेन बाली याने त्याला बोलावून घेत गल्ली नंबर १ येथील सामाजिक सभागृहाजवळ नेले. त्या ठिकाणी हुसेन खान उर्फ बाली याने आपला पुतण्या उस्मान खान, मुलगा इम्रान खान हुसेन खान यांनी फेरोज खान याच्यासोबत वाद घातला. आम्हाला वाळुचा हप्ता का देत नाही असे म्हणत हुसेन खान उर्फ बाली याने धारदार शस्त्राने फेरोज खान याच्यावर हल्ला केला. त्यानंतर उस्मान खान, इम्रान खान यांनी देखील फेरोज खान याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे फेरोज खान हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, हुसेन बाली याने फेरोज खान याला बोलावून त्याचा घात केला असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर फेरोज खान याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फेरोज खान यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना दुपारी दिड वाजेच्या सुमारास फेरोज खान यांचा मृत्यू झाला. फेरोज खान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नातेवाईकांनी घाटी रूग्णालयात धाव घेतली. त्यामुळे अपघात विभागासह शवविच्छेदनगृहा समोर मोठा जमाव जमला होता. घाटीत जमाव जमला असल्याची माहिती मिळाल्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक्की आदींच्या पथकाने घाटी रूग्णालयात धाव घेवून संतप्त नातेवाईकांची समजूत काढली.


नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर गोंधळ

फेरोज खान याच्या मारेकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करीत फेरोज खान याच्या संतप्त नातेवाईकांनी जिन्सी पोलिस ठाण्यासमोर गोंधळ घातला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संतप्त जमावाची समजूत काढुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.

फेरोज खान याच्यावर १४ वार

हुसेन खान उर्फ बाली, उस्मान खान, इम्रान खान यांनी फेरोज खान यांच्यावर धारदार शस्त्राने १४ वार केले होते. त्यातील काही वार शरीराच्या अंतरभागात खोलपर्यंत लागल्याने फेरोज खान हे गंभीर जखमी झाले होते.

फेरोज खान यांची हत्या, वय 35, राहणार दादा कॉलनी, कैलास नगर याच्या वर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली, आर्थिक देवाणघेवाण मधून खून झाला ची माहिती पोलिसांकडून कळाली आहे.
हत्या करणारा हाच तो आरोपी नाव हुसेन बाली



 सदरील घटनेची चौकशी करताना पोलीस विभाग औरंगाबाद दिसत आहे ही घटना कशी घडली व का घडली या मागचे कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण आर्थिक.
देवाण-घेवाण करताना शहरात प्रत्येकाने सजग राहणे फार गरजेचे आहे कारण कोण तुम्हाला कधी धोका देणार यासंदर्भात सांगणे कठीण आहे त्याकरिता आपण कोणाशी व्यवहार करताना जाणीवपूर्वक विचार करूनच व्यवहार करावा.


मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा - अन्वर खान
*औरंगाबाद शहरात कार्यरत ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार*
Photo- Baig Mushtak mirza

औरंगाबाद: दिनांक १९ ऑगस्ट २०१९. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी च्या वतीने औरंगाबाद शहरात समाजकार्य करणाऱ्या ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार करण्यात आले. सत्कार समारंभ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात औरंगाबाद शहरातील सु-प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता व एल्लोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक अन्वर खान यांची मुख्य उपस्थिती होती. जी. एस. टी. आयकर विभाग चे सहायक आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, माविन चे संचालक सय्यद अब्दुल रेहमान, कावीश फॉउंडेशन चे संचालक शोएब सिद्दीकी व डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वूमन चे प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष सोहेल झकीऊद्दीन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रशेखर बोर्डे यांनी स्वयंसेवी संस्थेसाठी शासनाच्या विविध योजनेचे उल्लेख करून सदर योजनेपासून जनसामान्यांसाठी कार्य करण्यासाठी स्वयंसेवीसंथांना आव्हान केले. सय्यद अब्दुल रेहमान यांनी स्वयंसेवी संस्था चालवणारे वक्ती हेच खरे नायक असल्याचे सांगितले. शोएब सिद्दीकी यांनी सांगितले कि स्वयंसेवी संस्था चालकांनी नवीन पिढीतील मुलांना स्पर्धा परीक्षे साठी प्रोत्साहित केले पाहिजे. औरंगाबाद ने खूप डॉक्टर्स आणि इंजिनिर्स दिले आहेत, आता तेहसीलदार, कलेक्टर, कमिशनर ची गरज आहे. डॉ. मकदूम फारुकी यांनी संस्थाचालकांना आपले रेकॉर्डस्, ऑडिट तसेच सर्व कागदपत्रे अपडेट ठेवण्याचे आव्हान केले. अन्वर खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 'मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असल्याचे सांगितले. या प्रसंगी श्रीमती फर्रुक जमाल (फैझ ए आम ट्रस्ट), डॉ. अर्चना सारडा (उडाण), मसिउद्दिन सिद्दीकी (सिद्दीकी वेलफेयर सोसायटी), रझी अहमद खान (अल-फरहान मेडिकल फॉउंडेशन), मोहम्मद झियाउद्दीन, मोहिद हशर (मजलिस तामीर ए मिल्लत),  अड. फैझ सय्यद (इस्लामिक रिसर्च सेंटर), प्रभुराम जाधव (हिमोफेलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र), फय्याज शेख (हैप्पी क्लब ग्रुप), सलीम सिद्दीकी (शोबा ए किदमत ए कल्क), तौसिफउल्लाह खान (जमात ए इस्लाम ए हिंद), डॉ. दिलशाद झैदी (अल हसन चेरिटेबलें ट्रस्ट), दीपक दौड (श्री. कृष्णा मेडिकल), जुनेद फारुकी (ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत), अनिस पटेल (पटेल फॉउंडेशन), दीपक आर्या (ओरफन फ्री इंडिया), नासेर शेख (एस. आई. ओ.), हाफिज अकील (के. के. ग्रुप), जफर पटेल (ग्लोबल मेडिकल फॉउंडेशन), शोएब सिद्दीकी (कावीश फॉउंडेशन), फारूक पटेल (जीवन जागृती सोसायटी), जावेद शेख (फेथ एजुकेशन अँड वेलफेयर सोसायटी), नाझीश सिद्दीकी (अजल फॉउंडेशन), देविदास उंचे (शिवम मेडिकल सोसायटी), वासिम खान (अल अजीज फॉउंडेशन), मुझफ्फर सिद्दीकी (अल्तमश वेलफेयर सोसायटी), मोहसीन मोहिउद्दीन (ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टीस), इफ्तेकार शेक (रिअल ड्रॉप), मोहम्मद रिझवान (अल-खैर फॉउंडेशन), माधव दराडे (माधव सोशल ग्रुप), अनिल लुमिया, काझी मो. शारिकउद्दीन (हेल्प टू ह्युमॅनिटी), शफिक भाई, रफिक भाई (तदफीन कमिटी), बिस्मिल्ला खान (अल-हक मेडिकल फॉउंडेशन), साजिद शेख (अल-अमान कमिटी), इम्रान शेक (तेहरीक-ए-सदा-ए-हक), मो. जफर (फ्रेंड्स ग्रुप), फिरदोस फातेमा (काफील एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), नईम खान (कॅन्डीड एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), मनोज गायके, मुबीन टोपीवाला, रफीउद्दीन रफिक (शैक्षणिक सल्लागार), शेक झिया (प्राईम वेलफेयर सोसायटी), डॉ. अबूबकर बावझीर (मायनॉरिटी ऍडवाईझरी फोरम), खान मुझम्मिल (शासकीय वैधकीय रुग्णालय), फारूक पटेल (हर्सूल), हशम हैदर (हैदर फाऊंडेशन), इम्रान खान (बेइंग अँजेल) या स्वयंसेवी संस्थेचा या प्रसंगी पुष्पगुछ, शाल, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्राचे सूत्रसंचालन मिर्झा दाऊद आझाद व मासिउद्दिन सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुस्लिम युथ फोरम व ग्लोबल मेडिकल फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, August 14, 2019

जंभाळा गावानजीक ट्र - कारचा भीषण अपघात दोन जन जागिच ठार तर एक गंभीर जखमी .
 Photos-Baig Mushtak Mirza

प्रतिनिधी।औरंगाबाद
जंभाळा  गावानजीक आज दूपारी ३ः४५ वाजे दरम्यान औरंगाबादकडून - नाशिककडे जात असतांना स्विप्ट कार क्र.एम एच २० सी एस ४९२३ व ट्रक जी.जे.१० एक्स ७१५७  यांच्यात  औरंगाबादहून नाशिककडे जांतांना स्विप्ट डिझायर  कार चालत्या ट्रकवर मागच्या बाजूने जोरात आदळून अपघात झाला.अपघाताचा आवाज खूप मोठा झाला यामूळे शेतात काम करणारे शेतकरी  व गावकरी धावत आले परंतु तो पर्यंत कारमधील दोघेजण जागीच गतप्राण झाले होते तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यांचे मृतदेह कारच्या पत्र्यात अडकले होते त्यामूळे कारला ट्रक खालून काढतांना मोठी कसरत करावी लागली. सदर धूळे - सोलापूर महामार्गाचे चौपदरी करणाचे काम येथे चालू आहे त्यामूळे काही ठिकाणी दूपदरी तर काही ठिकाणी एकपदरी रस्ता आहे त्यामूळे चालू ट्रकचा एकपदरी रस्त्ता आल्यामूळे वेगकमी झाला व मागून जोरात येणारी स्विप्ट ट्रकखाली घूसली यामूळे हा अपघात झाला.  या कारला व ट्रकला जेसीबीद्वारे वेगळे करण्यात  आले.


घटणास्थळी बघ्यांची गर्दि जमली होती. घटणेची माहिती कळताच दौलताबाद पोलिस स्टेशनचे कर्मचारी टु मोबाईल व्हँन घेवून पोहचले होते. दोन वेगवेगळ्या  १०८ अँबुलन्सद्वारे सदर मृतदेह व एका जखमीना घाटी दवाखान्यात हलवण्यात आले.अशी घटणा झाल्याची माहीती येथिल सरपंचानी दिली. सदर स्विप्ट कार मधील व्यक्ती औरंगाबाद चे असल्याचे बोलले जात होते. या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे,कर्मचारी पगारे,घुसळे,वाणी व छावणी वाहतूक पोलीस निरीक्षक शरद इंगळे,उपनिरीक्षक बनसोडे,गणेश गायकवाड,मारुती गुंजाळ,संदीप पवार,एच यू पठाडे,पी एस वाघ, के एस जाधव,एस एम पवार,महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगीर ,प्रकाश जाधव एस टी भांगडे घटना स्थळी पोहचले एका जे सि बी च्या मदतीने कार ट्रॅक मधून बाहेर काढले यात स्थानिक ग्रामस्थ विकास गेहलोत,गणेश शेलार ,संतोष आम्ले,सुधाकर दाणे,गणेश बारगळ आदिंनी मोठी मदत केली.
*ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) एस. एम. मुश्रीफ यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय *ब्राम्हण महासंघाने* विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला होता.

*हु किल्ड करकरे* हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचे नवीन पुस्तक  *ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. नागरिकांना कार्यक्रमाला पाण्याची बाटली घेऊन जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन सचिन गोडांबे यांनी केले.
संघ की शाखाओं का Placement देखकर
Cambridge, Harvard, Oxford, IIM, IIT, BIT, NIT और पूरी दुनिया हैरान.........

राष्ट्रपति,,,,
प्रधानमंत्री,,,,
गृहमंत्री,,,
उपराष्ट्रपति,,,
लोकसभा सभापती

और

18 मुख्यमंत्री,,,,
29 राज्यपाल,,,,
1 लाख शाखाएं,,,,
15 करोड़ स्वयंसेवक,,,,
2 लाख सरस्वती विद्यामंदिर,,,,
5 लाख आचार्य,,,,
एक करोड़ विद्यार्थी,,,,
2 करोड़ भारतीय मजदूर संघ के सदस्य,,,,
1 करोड़ ABVP के कार्यकर्ता,,,,
15 करोड़ बीजेपी सदस्य,,,,
1200 प्रकाशन समूह,,,,
9 हजार पूर्णकालिक एवं,,,,
7 लाख पूर्व सैनिक परिषद,,,,
1 करोड़ विश्व हिन्दू परिषद् सदस्य (पूरे विश्व में),,,,
30 लाख बजरंग दल के हिन्दुत्व सेवक,,,,
1.5 लाख सेवाकार्य,,,,,
18 राज्यों में सरकारें,,,,
283 लोकसभा सांसद,,,,
58 राज्यसभा सांसद,,,,
1460 विधायक,,,,         

वनवासी कल्याण आश्रम,
वनबंधु परिषद,
संस्कार भारती,
विज्ञान भारती,
लघु उद्योग भारती,
सेवा सहयोग,
सेवा इंटरनॅशनल,
राष्ट्रीय सेविका समिती,
आरोग्य भारती,
दुर्गा वाहिनी,
सामाजिक समरसता मंच,
ऑर्गनाजर,
पांच्यजन्य,
श्रीरामजन्म भूमी मंदिर निर्माण न्यास,
दीनदयाळ शोध संस्थान,
भारतीय विचार साधना,
संस्कृत भारती,
भारत विकास परिषद,
जम्मूकाश्मीर स्टडी सर्कल,
दृष्टी संस्थान,
हिंदू हेल्पलाईन,
हिंदू स्वयंवसेवक संघ,
हिंदू मुन्नानी,
अखिल भारतीय साहित्य परिषद,
भारतीय किसान संघ,
विवेकानंद केंद्र,
तरुण भारत,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
हिंदुस्थान समाचार,
विश्व संवाद केंद्र,
जनकल्याण रक्तपेढी,
इतिहास संकलन समिती,
स्त्री शक्ती जागरण,
एकल विद्यालय,
धर्म जागरण,
भारत भारती,
सावरकर अध्यासन,
शिवाजी अध्यासन,
पतित पावन संघटना,
हिंदू एकता
और ऐसी कई अनेक

बस इतना सा है RSS बाबू जी...!!!

ये कांग्रेस या कम्युनिस्ट पार्टी नहीं है जो इतनी जल्दी इसकी जड़े हिल जाएँगी,,,, बड़े बड़े सूरमा RSS मुक्त भारत के सपने देखते देखते दुनिया से ही चले गए...। 92 साल का आरएसएस आने वाले हजारो साल तक भारतवर्ष की सेवा करेगा।

परम: वैभवम ने तुम्हे तत्व राष्ट्रम:।

It's only for our information.
Info collect By-Yuva Samna media group,India.

और खौम अब भी  सो ही रही है.........बाबु

Tuesday, August 13, 2019

आज समाजसेवक अनवर खान बिस्मिल्लाह खान यांचा युवाशक्ती पत्रकार संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.
   फोटो-बेग मुस्ताक मिर्झा, युवा सामना मिडिया, औरंगाबाद

विशेष प्रतिनिधी-दिनांक 14 ऑगस्ट 2019
कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना करण्यात आले.इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार. चांगले काम केल्याबद्दल आज अनवर खान यांचे सत्कार केले आहे.जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी औरंगाबाद शहरामध्ये मध्य येथे निवडणुकीची सुरस वाढत आहे.शहरात प्रत्येक वर्गातून अन्वर खान यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे एमआयएम लवकरच अन्वर खान यांना निवडणुकीचा तिकीट देऊ शकते असा दाट शक्यता यांचे असंख्य समर्थकांकडून व्यक्त होत आहे. औरंगाबाद शहरात विकासाच्या वाट्यात अन्वर खान यांचे मोलाचे योगदान शहराला लाभले आहे त्याचे जिवंत उदाहरण मौलाना आझाद रिसर्च सेंटर सेशन कोर्ट ची बिल्डिंग महानगरपालिका ची बिल्डिंग, शासकीय रुग्णालय औरंगाबाद (घाटी)व चिकलठाणा येथे एअरपोर्ट समोर भव्य नवीन घाटी रुग्णालय ,शिवाजी वस्तुसंग्रहालय असे असंख्य शासकीय इमारती अन्वर खान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात उभे आहे त्यांच्या ह्याच मोलाचे काम व प्रत्येक क्षेत्राचा दाट अनुभव आणि परिश्रम यामुळे सर्व वर्गांचा अन्वर खान यांना समर्थन मिळत आहे.
सत्कार समारंभात अब्दुल कय्यूम,अलीम बेग, सय्यद साबेर, मुसा खान, हफीज अली,शफीक शेख,शेख अमजद, शेख ऐजाज,ऐजाज बेग, साजीद पटेल, ईलियास सिद्दीकी,
फोटोग्राफर अनिस रामपुरे, आरेफ देशमुख, आदींची उपस्थिती होती.

Monday, August 12, 2019

*Medical Aid provided to flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara.*
_*Anwar Khan Director of Indian Institute of Science and Research initiated the Drive.*_
  PHOTOS-BAIG MUSHTAK MIRZA


Aurangabad; 12th August 2019. Anwar Khan Bismilla Khan, a philanthropist and Director of Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, took the initiative to provide Medical Aid to the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara today. Anwar Khan stated that today on occasion of Eid, in our happiness, we can’t forget our brothers and sisters affected by this natural calamity, in their time of grief. 16 people have lost their lives in Maharashtra as heavy rains and overflowing rivers swamped five districts which includes the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara, displacing more than 1,40,000 people in last few days. Fully equipped Ambulance with medicines and team of expert doctors from Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, has left for Kolhapur today. Member of Parliament Imtiaz Jaleel flagged off the ambulance today at 5:30 pm. Prominent personalities of the city, Dr. Maqdoom Farooqui, Dr. Zahed Zaheer, Abdul Rehman, Maulana Abdul Rasheed Madni, Mufti Shoeb Al Qasmi, Sameer Abdul Sajid, Mohd. Ziyauddin, Asif Khan, Fayyaz Khan, Wasim Raja, Rehan Khan, Riyaz Khan, Zubair Nadwi, Wiqar Ahmed, Sohail Zakiuddin and others displayed their support to this cause by being present for this occasion. Anwar Khan also assured that as per the requirement they will be sending more relief aids to the flood affected areas soon.
*कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना*
_*इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार*_

photos:-Baig Mushtak Mirza


औरंगाबाद; दिनांक १२ ऑगस्ट २०१९. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे गेल्या काही दिवसा पासून नैसर्गिग आपत्ती कोसडली असून १६ जण याचे बळी पडले आहेत तसेच १,४०,००० लोकांना तेथून स्थलांतर करण्यात आले होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च च्या वतीने आज कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थांच्या मदतीसाठी एका ऍम्ब्युलन्स मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम तसेच औषधींचा साठा रवाना करण्यात आला आहे. सादर उपक्रमाची संकल्पना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांची होती. आपलेच राज्याचे आपले भाऊ-बंधू आज निसर्गाच्या थैमानाने पीडित झाले असून त्यांची मदत करणे हीच खरी ईद साजरी करणे आहे असे हि अन्वर खान यांनी सांगितले. खासदार इम्तियाझ जलील यांनी सदर ऍम्ब्युलन्स ला हिरवा झेंडा दाखवून ऍम्ब्युलन्स ला कोल्हापूर कडे रवाना केला. या प्रसंगी डॉ. मकदूम फारुकी, डॉ. जाहेद झहीर, अब्दुल रहमान,  मौलाना अब्दुल रशीद मदनी, मुफ्ती शोएब अल कास्मी, समीर अब्दुल साजिद, मो. झियाउद्दीन, असिफ  खान, फय्याज खान, वासिम राजा, रेहान खान, रियाझ खान, झुबेर नदवी, विकार अहमद, सोहेल झकीऊद्दीन आदींची उपस्थिती होती. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी हे आश्वस्त केले कि पुरग्रस्थांना गरजे नुसार आवश्यक तो औषध उपचार पुढे हि पुरविला जाणार आहे.

For more new update
Plz subscribe like share comment on
YUVA SAMNA MEDIA GROUP

Friday, August 9, 2019

वाळूज एमआयडीसीत उद्योग संकल्प दिन साजरा

       Photos-Baig Mushtak Mirza,Aurangabad

 एम.एन.बेग
वाळूज/ प्रतिनिधी
 वाळूज एमआयडीसीत आज ९ आॅगस्टला औद्योगिक संघटनाच्यावतीने ‘उद्योग संकल्प दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व प्रलंबीत प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.
येथील मराठवाडा आॅटो क्लस्टर मध्ये आयोजित कार्यक्रमाला उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद
, उद्योजक राम भोगले,  पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल,
उपायुक्त निकेश खाटमोडे, एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गतवर्षी ९ आॅगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला वाळूज उद्योगनगरीत झालेल्या तोडफोडीच्या घटनेला उजाळा देण्यात आल्या. उद्योगनगरीत भविष्यात अशा घटना घडु नये, यासाठी उद्योजकांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.

यावेळी उद्योजक सुनिल किर्दक यांनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते तयार करणे, प्रत्येक सेक्टरमध्ये स्वच्छतागृह उभारणे, सिमेन्स कॉर्नर, कामगार चौक आदी ठिकाणी उड्डाणपुल उभारणे आदींची मागणी केली. विलास चौधरी यांनी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखण्याची मागणी केली. उद्योजक राम भोगले यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मनोगत व्यक्त करीत गतवर्षी औद्योगिक क्षेत्रात तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने उद्योजकांना चांगल्या प्रकारे मदत केल्याचे सांगितले. या प्रसंगी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी औद्योगिक क्षेत्रातील स्वतंत्र पोलिस स्टेशन संदर्भात वरिष्ठाकडे पाठपुरावा सुरु असून तात्काळ या ठिकाणी शेड उभारुन पोलिस चौकी सुरु करुन अधिकारी व कर्मचाºयांची नेमणुक करणार असल्याचे सांगितले. औद्योगिक परिसरात ठिक-ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अतुल सावे यांनी उद्योजकांनी सुरक्षेसाठी पोलिस व एमआयडीसी प्रशासनावर अवलंबुन न राहता स्वत:हून सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षेसाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या संदर्भात मुंबईत पुढील आठवड्यात चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष जाजु व सूत्रसंचालन शिवप्रसाद जाजु यांनी मानले. कार्यक्रमाला एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, विलास चौधरी, दीपक मॅथ्यु, प्रसाद कोकीळ, संजय मोदक, लक्ष्मीकांत कदम, अशोक गवारे, रोहित पाटील, सुदर्शन सांगळे, हेमंत निकम, रोहित दाशरथी, अनंत आढाव आदीसह सीएमआयए, सीआयआय, मसिआ, लघु उद्योग भारती, डब्ल्यआयए, आयसा, एजेव्हीएम व बिमटा आदी संघटनाचे पदाधिकारी व अनेक कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाºयांची उपस्थिती होती.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...