महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील
थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे
औरंगाबाद / प्रतिनिधी
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने बुधवार (दि.21) पासून दहा दिवसांची विशेष कर वसुली मोहीम सुरु केली आहे. मोहीमेच्या पहिल्याच दिवशी एक शाळा, महाविद्यालय व मंगल कार्यालयासह पाच मालमत्तांना थकीत कर न भरल्याने मनपाच्या प्रभाग पथकांनी टाळे ठोकले आहे. पहिल्या दिवशीच्या कारवाईत तीन लाख रूपयांपेक्षा अधिक कर देखील वसुल करण्यात आला आहे.
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने वारंवार विशेष कर वसुली मोहीम राबवित व्याज व दंडात 75 टक्क्यापर्यंत सुट दिली. मात्र, यानंतरही मालमत्ताधारक थकबाकी भरत नसल्याने पालिकेने आता कडक पाऊल उचलले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी बुधवारपासून विशेष कर वसुली मोहीम राबवित असल्याची घोषणा केली होती. या मोहीमेत आता बड्या व्यावसायिक थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत त्याप्रमाणे अधिकार्यांना आदेशित केले होते. त्यानुसार बुधवारी दि.21 पालिकेच्या प्रभाग अधिकार्यांनी मोहीमेला सुरूवात केली. प्रभाग-1 मध्ये प्रमुख अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या नेतृत्वात शारिरीक शिक्षण महाविद्यालय पीएस कॉलेज परिसरातील प्राचार्यांचा हॉल सिल करण्यात आला. तर डायमंड हॉल येथे दोन दुकाने सिल केली. पथक कारवाईसाठी गेले असता शिवेश्वर मंडप यांनी लगेच दोन लाख रूपयांच्या कराचा भरणार केला. याप्रमाणे प्रभाग-1 मध्ये सहा मालमत्तांवर कारवाई करत 3 लाख 15 हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला. प्रभाग-7 मध्ये प्रमुख अधिकारी महावीर पाटणी यांच्या नेतृत्वात डॉ. आर.पी. नाथ हायस्कूल शाळेकडे 3 लाख 30 हजार 763 थकबाकी असल्याने शाळेच्या अनुक्रमे कॉम्पुटर रूम, हेडमास्तर यांची रूम व हजेरी रूम अशा 3 खोल्यांना टाळे ठोकण्यात आले. प्रमोद किशोरीलाल जैस्वाल यांनी 50 हजार रुपयांचे दोन धनादेश पुढील 2 दिवसांचे दिले. तर जय भवानीनगर येथील खालसा मंगल कार्यालय यांच्या कडे 1 लाख 85 हजार 207 रुपये थकबाकी होती. पथक कारवाईला गेल्यानंतरही ती भरली नसल्याने मंगल कार्यालय सिल करण्यात आले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.