Saturday, August 31, 2019

अन्वर खान यांच्या उपस्थितीत "महाराष्ट्र माझा" (एन. जी. ओ.) चे शिष्टमंडळाने मा. पो. आयुक्तांची भेट  घेतली व शहरातील राज्यातील ज्वलंत मुद्यांवर चर्चा केली.

औरंगाबाद. दिनांक ३१ ऑगस्ट २०१९: महाराष्ट्र माझा फौंडेशन च्या शिष्टमंडने आज पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे शहराचे मा.पोलीस आयुक्त श्री. चिंरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. एल्लोरा ग्रुप चे एम. डी. अन्वर खान याच्या नेतृत्वात मोहम्मद झिया, सय्यद अब्दुल रहमान, ऍड. जि. पी. पांडे इत्यादी या शिष्टमंडळात सामील होते. शहरात वाढत असलेले अमली पदार्थ सेवनामुळे होणारे गुन्हे, नागरी समस्यां, शहरातील वाहतुकीच्या समस्या, या प्रशांबाबत नवयुवकांमध्ये जागृती निर्माण करण्याबाबत विविध उपक्रम, अश्या विविध प्रश्नांवर मा. पो. आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. पोलिसांनी सुद्धा या उपक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा अशी विनंती देखील करण्यात आली. तसेच महाराष्ट्र माझा या एन. जी. ओ. च्या माध्यमाने येणाऱ्या गणपती उत्सव व मोहरम या मध्ये पोलीस प्रशासनाला वाहतुकीचा समस्येबाबत व इतर पोलिसांमार्फत या साठी स्वयंसेवकांनी (व्हॉलंटर) नेमून करण्याची तयारी मा. पो. आयुक्त साहेबांनी दर्शविली आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...