Wednesday, August 21, 2019

आजपर्यंतच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्ट्राचाराचा मलिदा चाखला : नगरसेविका वाडकर खणखणीत आरोप

मनपात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका प्रशासनातील अधिकारी एकाच विभागात ठाण मांडून वर्षानुवर्षे बसलेले आहेत. त्यामुळे विकास कामे ठप्प झाली असून आता पर्यंत आलेल्या जवळपास सर्व आयुक्तांनी भ्रष्टाचारात सामील होत अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे, असा घणाघाती आरोप नगरसेविका शिल्पराणी वाडकर यांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार नियतकालिक बदल्या करण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे.

नगरसेविका वाडकर यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मनपातील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले आहेत. यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत वेळोवेळी प्रशासनाला विचारणा केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शासकीय बदल्यांचे विनियम केले आहे.  त्यात अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणणे, पारदर्शकता जपणे, कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन गतिमान करणे यासाठी बदल्या करणे आवश्यक आहे. मात्र, आत्तापर्यंत महापालिकेत आलेले जवळपास आयुक्त यांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांनी अनेक वर्षांपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांना महत्वाच्या व भ्रष्टाचारास पोषक असलेल्या विभागातून बदल्या केलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनाही भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक संकटात सापडली आहे. मनपातील गैरकारभाराची सीआयडी मार्फत चौकशी केल्यास बहुताउंश अधिकारी- कर्मचारी जेल मध्ये दिसतील असा घणाघाती आरोप वाडकर यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, नगररचना विभागाला आर्थिक वर्षात 220 कोटी वसुलीचे उद्दिष्ठ असताना केवळ 55 कोटी वसुली झाली आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही परिश्रम घेतलेले नाहीत. मालमत्ता कर वसुलीचे 450 कोटींचे उद्दिष्ठ असताना केवळ 115 कोटी वसुली झाली. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. मनपाच्या मालमत्ताच्या भाडेपट्टा व भाड्याच्या रकमा थकीत असून करारनामे कालबाह्य आहेत. यासह अनेक आरोप करत त्यांनी अधिकारी केवळ मौजमजा करायला येतात त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नसून त्यांच्या बदल्या कराव्या अशी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. सोबत मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रत पाठविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...