Wednesday, August 14, 2019

*ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) एस. एम. मुश्रीफ यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय *ब्राम्हण महासंघाने* विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला होता.

*हु किल्ड करकरे* हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचे नवीन पुस्तक  *ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. नागरिकांना कार्यक्रमाला पाण्याची बाटली घेऊन जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन सचिन गोडांबे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...