Monday, August 12, 2019

*कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना*
_*इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार*_

photos:-Baig Mushtak Mirza


औरंगाबाद; दिनांक १२ ऑगस्ट २०१९. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे गेल्या काही दिवसा पासून नैसर्गिग आपत्ती कोसडली असून १६ जण याचे बळी पडले आहेत तसेच १,४०,००० लोकांना तेथून स्थलांतर करण्यात आले होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च च्या वतीने आज कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थांच्या मदतीसाठी एका ऍम्ब्युलन्स मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम तसेच औषधींचा साठा रवाना करण्यात आला आहे. सादर उपक्रमाची संकल्पना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांची होती. आपलेच राज्याचे आपले भाऊ-बंधू आज निसर्गाच्या थैमानाने पीडित झाले असून त्यांची मदत करणे हीच खरी ईद साजरी करणे आहे असे हि अन्वर खान यांनी सांगितले. खासदार इम्तियाझ जलील यांनी सदर ऍम्ब्युलन्स ला हिरवा झेंडा दाखवून ऍम्ब्युलन्स ला कोल्हापूर कडे रवाना केला. या प्रसंगी डॉ. मकदूम फारुकी, डॉ. जाहेद झहीर, अब्दुल रहमान,  मौलाना अब्दुल रशीद मदनी, मुफ्ती शोएब अल कास्मी, समीर अब्दुल साजिद, मो. झियाउद्दीन, असिफ  खान, फय्याज खान, वासिम राजा, रेहान खान, रियाझ खान, झुबेर नदवी, विकार अहमद, सोहेल झकीऊद्दीन आदींची उपस्थिती होती. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी हे आश्वस्त केले कि पुरग्रस्थांना गरजे नुसार आवश्यक तो औषध उपचार पुढे हि पुरविला जाणार आहे.

For more new update
Plz subscribe like share comment on
YUVA SAMNA MEDIA GROUP

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...