Saturday, August 24, 2019

*आपण सगळे जेंव्हा काश्मीर मुद्दा,आर्टिकल 370,ट्रिपल तलाक च्या मुद्दयावर चर्चा करत होतो,तेंव्हा देशभरात काय काय घडत होत,त्यावर एक नजर टाकूयात..!*

1. जेट एअरवेज ला टाळ लागलं.
2. एअर इंडिया ही *7600* कोटी रुपयांने तोट्यात आलीय.
3. BSNL मधल्या तब्बल *54,000* कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
4. HAL (हिंदुस्तान ऐरोनोटिकस लिमिटेड) च्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर गदा आली आहे.
5. पोस्ट खात *15,000* करोड रुपयांनी तोट्यात आलं आहे.
6. *10 लाखांच्या* आसपास जॉब येत्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधून जाणार आहेत.
7. मंदीमुळे सर्व मोठ्या महानगरात मिळून *12.76* लक्ष घर अजूनही विकली गेलेली नाहीयेत.
8. एअरसेल संपली.
9. जे पी ग्रुप बंद पडली.
10. भारताची सगळ्यात नफ्यात असणारी कंपनी ONGC ही तोट्यात आली आहे.
11. देशाला चुना लावून आणि हजारो करोड बुडवून एकूण *36* उद्योगपती देश सोडून पळून गेले आहेत.
12. *2.4 लाख* करोड रुपयांची कर्ज बोटावर मोजता येईल इतक्या कॉर्पोरेट जायंट्स ना माफ करण्यात आली आहेत. *(दुसरीकडे केवळ 72 हजार कोटींचे कर्ज आहेत देशभरातील शेतकऱ्यांचे,त्यांना मात्र माफ नाही..!)*
13. पंजाब नॅशनल बँक सातत्याने तोट्यात.काही दिवसातच बँकेला टाळ लागण्याची शक्यता.
14. सर्व राष्ट्रीय बँका भयानक तोट्यात.
15. जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जात देशावर *35 लाख कोटींपर्यंतची* वाढ.
16. रेल्वे विकणे आहे.
17. जागतिक वारसा असणारा लाल किल्ला आता भाड्याने देण्यात आलाय.
18. देशातील सर्वात मोठं उत्पादन असणारी मारुती सुझुकी ने उत्पादनात कपात केली आहे.सोबतच *3000* च्या वर कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.येत्या काळात हा आकडा पाच अंकी होण्याची शक्यता देखील आहे.
19. *55,000* करोड रुपयांची उत्पादने कंपन्यात पडून आहेत.कारण,खरेदीदार नाहीत.
20. देशभरातील बिल्डर्स प्रचंड तणावात आहेत.कारण त्यांची घरे घेण्यास खरेदीदार नाहीत.नवीन प्रोजेक्ट्स पूर्णपणे ठप्प आहेत.कारण यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झालीय.(GST 18%)परिणामी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.
21. आयुध निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा खासगीकरण करण्याचा सरकारने घाट घातला आहे.परिणामी *1.5 लाख* कामगारांच्या आणि त्यांच्या परिवाराचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
22. नोटबंदीमुळे लाखो जॉब्ज गेले आहेत.
23. मागच्या *45* वर्षात देशात सर्वांत जास्ती बेरोजगारी वाढली आहे.
24. देशातील *5 विमानतळ* अडाणी ग्रुप्स ला विकण्यात आले आहेत.
25. आर्थिक मंदीमुळे सर्वात मोठा मार युवकांना.नोकऱ्यांच नाहीत.
26. जवळपास *5000* HNI (high net worth individuals) देश सोडून इतर देशात स्थायिक झाले आहेत.
27. व्हिडीओकॉन डुबली.
28. टाटा डोकॉमो गायब झाली.
29. CCD चे मालक सिद्धार्थ यांना आत्महत्या करावी लागली.
30. महिंद्रा ने नोकर कपात केली.शिवाय त्यांचे अनेक प्लांट चे उत्पादन कमी केले.

यातील किती मुद्द्यावर तुम्हाला मीडियात चर्चा दिसल्या..? किती लोकांना या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्राईम टाइम मध्ये दिसल्या..? किती मुद्द्यांवर सरकारने स्पष्टीकरण दिले..?

तुम्ही काश्मीर,370 करत बसलात.ट्रिपल तलाक चा राग आळपत बसलात.त्याकाळात या देशाला आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकारने भयानक घोडे लावले आहेत.आज तुम्हाला याची झळ कदाचित बसत नसेल.पण येणाऱ्या काळात ती नक्कीच बसणार आहे..!!
राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आठवतो आहे आता,

*लगेगी आग तो आएंगे घर कई जद में,*
*यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है*

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...