Wednesday, August 14, 2019

जंभाळा गावानजीक ट्र - कारचा भीषण अपघात दोन जन जागिच ठार तर एक गंभीर जखमी .
 Photos-Baig Mushtak Mirza

प्रतिनिधी।औरंगाबाद
जंभाळा  गावानजीक आज दूपारी ३ः४५ वाजे दरम्यान औरंगाबादकडून - नाशिककडे जात असतांना स्विप्ट कार क्र.एम एच २० सी एस ४९२३ व ट्रक जी.जे.१० एक्स ७१५७  यांच्यात  औरंगाबादहून नाशिककडे जांतांना स्विप्ट डिझायर  कार चालत्या ट्रकवर मागच्या बाजूने जोरात आदळून अपघात झाला.अपघाताचा आवाज खूप मोठा झाला यामूळे शेतात काम करणारे शेतकरी  व गावकरी धावत आले परंतु तो पर्यंत कारमधील दोघेजण जागीच गतप्राण झाले होते तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यांचे मृतदेह कारच्या पत्र्यात अडकले होते त्यामूळे कारला ट्रक खालून काढतांना मोठी कसरत करावी लागली. सदर धूळे - सोलापूर महामार्गाचे चौपदरी करणाचे काम येथे चालू आहे त्यामूळे काही ठिकाणी दूपदरी तर काही ठिकाणी एकपदरी रस्ता आहे त्यामूळे चालू ट्रकचा एकपदरी रस्त्ता आल्यामूळे वेगकमी झाला व मागून जोरात येणारी स्विप्ट ट्रकखाली घूसली यामूळे हा अपघात झाला.  या कारला व ट्रकला जेसीबीद्वारे वेगळे करण्यात  आले.


घटणास्थळी बघ्यांची गर्दि जमली होती. घटणेची माहिती कळताच दौलताबाद पोलिस स्टेशनचे कर्मचारी टु मोबाईल व्हँन घेवून पोहचले होते. दोन वेगवेगळ्या  १०८ अँबुलन्सद्वारे सदर मृतदेह व एका जखमीना घाटी दवाखान्यात हलवण्यात आले.अशी घटणा झाल्याची माहीती येथिल सरपंचानी दिली. सदर स्विप्ट कार मधील व्यक्ती औरंगाबाद चे असल्याचे बोलले जात होते. या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे,कर्मचारी पगारे,घुसळे,वाणी व छावणी वाहतूक पोलीस निरीक्षक शरद इंगळे,उपनिरीक्षक बनसोडे,गणेश गायकवाड,मारुती गुंजाळ,संदीप पवार,एच यू पठाडे,पी एस वाघ, के एस जाधव,एस एम पवार,महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगीर ,प्रकाश जाधव एस टी भांगडे घटना स्थळी पोहचले एका जे सि बी च्या मदतीने कार ट्रॅक मधून बाहेर काढले यात स्थानिक ग्रामस्थ विकास गेहलोत,गणेश शेलार ,संतोष आम्ले,सुधाकर दाणे,गणेश बारगळ आदिंनी मोठी मदत केली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...