Saturday, August 24, 2019

जेष्ठ समाज सेवकांनी घेतली अधिष्ठता डॉ. कनन येळीकर यांची भेट.
Photo:-Baig Mushtak mirza, Aurangabad
शासकीय वैधकीय रुग्णालय ला लागणारी औषध, साहित्य व मदत या विषयी चर्चा.

औरंगाबाद. दिनांक २२ ऑगस्ट २०१९. शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे संपूर्ण मराठवाड्या साठी जणू काही एक वरदानच आहे. असंख्य गरीब व गरजू रुग्णांना ह्या दवाखान्यातूनच नवीन जीवन दान मिळते. शासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीने रुग्णांच्या उपचाराची काळजी घेत आहे. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आज काही समाजसेवकांनी शासकीय वैधकीय रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉ. कनन येळीकर यांची स्वइच्छा भेट घेतली.
एलोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक अन्वर खान, माविन चे संचालक सय्यद अब्दुल रहमान, हिमोफेलिया सोसायटी चे उपाध्यक्ष मोहम्मद झियाउद्दीन, औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेरे सोसायटी चे अध्यक्ष प्रा. सोहेल झकीऊद्दीन तसेच अनेक समाज सेवक हि या शिष्ठ मंडळात सामील होते. अन्वर खान यांनी अधिष्ठता डॉ. कनन येळीकर यांना आश्वासन दिले कि अपघात विभागात लागणारे व्हेंटिलेटर, अत्यावश्यक औषधींचा साठा, व्हीलचेर, स्ट्रेचर तसेच डिस्पोसीबल बेडशीट घाटी रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करतील. तसेच ह्या व्यतिरिक्त रुग्णांना लागणाऱ्या सोई सुविधा पुरविण्याकरिता शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी देखील ते तयार आहे असे त्यांनी सांगितले. वैधकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने हि या प्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...