Friday, January 25, 2019

70 वा प्रजसत्ताक दिन आज आपण साजरा करीत आहोत.
आपल्या इतिहासातला हा सुवर्ण क्षण गेल्या 70 वर्षात आपण अनेक विक्रम केलेत वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत महत्व पूर्ण कामगिरी करत, देशाचे नाव उंच केले हा सत्तर वर्षाचा इतिहास आपली क्षमता, विद्वत्ता आणि कार्यक्षमता दर्शवितो. पण कुठे तरी काही तरी कमी राहिली असं सतत अपल्याला वाटत राहतं !
आजचा काळ पार बदलत आहे. लोकांची मानसिकता बदलली आहे. 26 जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झाला. आरामात उठायचं, खायचं ,प्यायचं आणि मजेत वेळ घालावायचा आणि या वेळेस तर शनिवार, रविवार दोन दिवस सतत सुट्टी मिळणार लॊकांचे आधिच सगळं प्लॅनिंग झालं असणार. मग 26 जानेवारी साजरा कोण करणार? शाळा, महाविद्यालये,  सरकारी ऑफिस, कर्मचारी ते ही येणं अनिवार्य केलेले आहे म्हणून स्वतःच्या इच्छेने प्रजासत्ताक साजरा करणारे किती असतील? 
हा एक प्रश्नच आहे बर जर कुणाला आपण विचारलं
'प्रजासत्ताक दिन का साजरा होतो?'
त्याच उत्तर एकच मिळेल,
'26 जानेवारी 1950 पासून देशात संविधान लागू झालं, म्हणून आपण हा दिवस साजरा करतो या याव्यातिरिक्त कुणाला जास्त काही सांगता येणार नाही.'
अगदी शाळेत जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं तरी तो हेच उत्तर देईल.
'India became republic on this day, so we celebrate Republic Day'
Republic हा शब्द लॅटिन भाषेतून घेतला आहे. Republica(Republic)- Res म्हणजे Thing-public -the public thing असा अर्थ निघतो. जेंव्हा भारत हा प्रजासत्ताक देश आहे असे म्हणतो, तेंव्हा याचा अर्थ हा होतो की,
'भारत हा घटना प्रधान देश आहे ,जिथे लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि अशा प्रतिनिधी द्वारे सरकार स्थापित होतो, जो पक्ष आपले बहुमत मिळवतो, त्याला सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळतो'
दर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु होते. खर पाहता या प्रजासत्ताक किंवा लोकतंत्रात आपण खरं तर खूप महत्त्वाचा धागा आहोत. या देशाचे भवितव्य आपण ठरवणार.
2019 निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, पुन्हा एकदा आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे, की चांगले लोक निवडून जावेत. जेणेकरून चांगल्या लोकांचे सरकार स्थापन होऊन ,आपला देश सुरक्षित लोकांच्या हाती जाईल. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये, आपण हेच बघतो की लोक पक्ष बघून मतदान करतात लोक बघून नव्हे.

जर पहिलेपासून आपण लोक बघून मतदान केले असते तर आज राजकारणात चांगले इमानदार मेहनत करणारे देशासाठी झटणारे अनेक लोक दिसले असते. आपण चुकलो, लोक बघून नव्हे तर पक्ष बघून मतदान करतो इथे. पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो त्यासाठी पक्ष जीवाचं रान करतात.इथे पक्षाचा विजय महत्वाचा असतो.त्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात या ना त्या मार्गाचा अवलंब केला जातो आणि हे पक्ष सत्ते पर्यंत जाऊन पोहोचत.
 नुकत्याच पाच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले उमेदवारांवर अनेक आरोप असतात, कधी कधी गुन्हा दाखल झालेला असतो, हा नेता काही करणार नाही हे माहीत असतं. तरीसुद्धा ती व्यक्ती निवडून येते आणि मग आपण ओरडत राहतो 'देशात भ्रष्टाचार वाढत आहे.'

 या सत्तर वर्षात आपली मानसिकताच राहील बदलली नाही आपण फक्त पक्ष, जात आणि धर्म यातच अडकून पडलो. त्यामुळे राजकारणात देशहितापेक्षा जात- धर्म आणि पक्षाला महत्त्व मिळत गेले. डोळे बंद करून, उमेदवार आपल्या जाती धर्माचा आहे म्हणून आपण मतदान करायला लागलो. या राजकारणातल्या लोकांनी याचा पुरेपूर फायदा उचलला, म्हणूनच आजही लोक आपल्यात त्यांच्याच नावावर दुफळी निर्माण करतात.एकविसाव्या शतकात असतानाही देशाला यातून आम्ही मुक्त करू शकलो नाही यासारखे दुर्दैव कोणते?
मी, माझा समाज, माझी जात, माझा धर्म ह्या पेक्षा श्रेष्ठ माझा देश आहे, ही भावना आमच्या अंतर्मनात झिरपली नाही रक्तात भिनली नाही आणि आता DNAमध्ये सापडण कठीण आहे मग खर्‍या अर्थाने आपण 'लोकतांत्र' आहोत का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा  आहे.
म्हणूनच आजही देश विचारत आहे
घोळक्या चा आवाज
झाला का बुलंद
'लोकतांत्र' का झाले
असे जिरेबंद ....
मूठभर लोकांनी
ताळेबंद केले आमचे नशीब
सोन्याचा घास त्यांना
बाकी राहिले गरीब...
जात धर्माने देशाला
असा विळखा घातला
आपल्याच हातांनी
राष्ट्रधर्माचा गळा कापला...
शत्रूंचा इथे काय
चालावा जोर?
हितशत्रू जागोजागी
लावला देशाला घोर...
असा प्रश्न वारंवार आपला देश विचारत आहे. या सगळ्या प्रश्नांना कोण व कसं उत्तर द्यावे?
-वर्षा परगट

सिंख समाजांचा लोहरी फेस्टिव्हल उत्साहात साजरा

औरंगाबाद।प्रतिनिधी
 बेग एम.एन.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पंजाबी समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  पंजाबी कल्चरल असोसिएशन व लॉयन्स क्लब औरंगाबाद सिडको यांच्या वतीने, शुक्रवार दि. 25 रोजी गुरुद्वारा येथे पंजाबी समाजातील 1 जानेवारीच्या नंतर नवीन लग्न झालेले तसेच नवीन जन्मलेल्या अशासाठी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता.त्याच बरोबर याठिकाणी विविध पंजाबी गीते देखील सादर करण्यात आली.

चलती जवानी किधर जा रही है ,ये दुनिया मतलब खुरादी, नवी नवीन कर्जा अश्या विविध प्रकारची पंजाबी गाणी गायली गेली. त्याच प्रमाणे पंजाबी सांस्कृतितील "लोडी" जाळून या अग्नीची पूजा करण्यात आली. पुढे या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे विभागीय प्रमुख संदीप मारुजी, लायन्स क्लब औरंगाबाद सिडको महेंद्र खानापूरकर, सिद्धी कॉलनी गुरुद्वारा अध्यक्ष कुलदीपसिंग निर ,गुरुद्वारा सचिव हरदेवसिंग मुच्छल,राजेंद्र सिंग छाबडा, मननिदर छाबडा,वररिदर कौर गुरुदत्ता सुभाष अत्री ,सय्यद नीम सर, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.



या सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी नवीन लग्न झालेल्या वधू वरांचे व नवीन जन्मलेल्या अशा मुलांचा या प्रसंगी सत्कार करण्यात येतो.त्याच बरोबर विविध गाणे, खेळ, भागडा अश्या विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात येते.या पैकी उत्कृष्ट भागडा सादर करणाऱ्या उमेदवारास भेट म्हणून ट्रॉफी दिली जाते.


प्रथमच क्रमांकासाठी कुलर तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारासाठी मिक्सर बक्षीस ठेवण्यात आले.तिसऱ्या क्रमांकासाठी घरगुती उपयोगी असलेल्या वस्तुंचे वाटप करण्यात आले.

Please Share like and Subscribe our You Tube Channel YUVA SAMNA MEDIA.
And Web Portal- www.yuvasamnamediagroup.blogspot.com
To more news send us in comment to contact us.
खुलताबाद प्रशासन जोमात.....प्रधानमंत्री आवास योजनेचे काम प्रगतीपथावर......

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात खुलताबादचे काम प्रगतीपथावर असून  खुलताबाद नगर परिषदेने 280 घरांसाठी डीपीआर तयार केला असून त्याचे प्रत्यक्ष काम देखील सुरु झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 167 लाभार्थ्यांची यादी नगर परिषदेकडून प्रसिद्ध झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 121 घरांचे काम प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे होणार असून याचादेखील डीपीआर तयार झालेला आहे. दोन्ही टप्प्यासाठी एकूण 984 अर्ज दाखल झाले होते. नगराध्यक्षांच्या तसेच मुख्याधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे खुलताबाद  नगरपरिषद हद्दीतील लाभार्त्यांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे.

 मंजूर झालेल्या घरांसंदर्भात काय योजना आहे. तसेच काम कसे चालणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 167 लाभार्थ्यांसाठी नगर परिषदे कडून (दि. 24 )रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत लाभार्थ्यांना विविध गोष्टी संदर्भात घरकुलच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये घराचा नकाशा कसा असावा, घराचे बांधकाम कसे करावे, बांधकाम करताना येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच घर बांधण्यासाठी कोणत्या विभागांची परवानगी घेणे अवश्यक आहे .त्याची प्रक्रिया काय आहे यावरही चर्चा करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्त्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. यावेळी  कार्यशाळेत नगराध्यक्ष एस.एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मुख्याधिकारी योगेश पाटील, घरकुलचे अधिकारी यांच्या सोबत तालुक्यांतील सर्व नगर सेवकांची उपस्थिती होती. तसेच यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे 150 लाभार्थी उपस्थित होते.


तालुक्यांसाठी दोन डीपीआर मंजूर झाले असून त्यांचे काम देखील सुरु झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 167 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या संदर्भातील  प्रत्यक्ष काम देखील सुरु झाले आहे. लाभार्थ्यांना नगर परिषदे कडून यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.

                     -योगेश पाटील,मुख्याधिकारी,खुलताबाद.




तालुक्यांत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम प्रगतीपथावर सुरु असून नगर परिषदे कडून लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.ही यादी प्रसिद्ध होताच आम्ही लाभार्थ्यांसाठी नगर परिषदे कडून कार्यशाळाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले यापुढेही नगरअध्यक्ष या नात्याने मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल.


                 -एस. एम. कमर, नगरअध्यक्ष,खुलताबाद.
साताऱ्यात प्रथमच *NSDL (National Security Deposit Ltd)* या CSR प्रोजेक्ट साठी प्रवेश सुरू.
🔴प्रशिक्षणाची वैशिष्ठे-
🔹 45 दिवस Classroom Traning.
🔹रोज 8 तास प्रशिक्षण.
🔹प्रशिक्षणानंतर नामांकित कंपन्यांमध्ये 100%  नोकरी ची

Saturday, January 19, 2019

खासदार खैरेंचे 20 वर्षाचे अपयश शिवसेनेला भोवणार : आ. सतीश चव्हाण


औरंगाबाद /प्रतिनिधी : लोकांनी ज्या अपेक्षेने खासदार चंद्रकांत खैरेंना मतदान केले त्याप्रमाणात 20 वर्षात एकही काम खैरेंनी केले नाही. शून्य कामे करूनही खासदार खैरे निवडणूक लढवण्याची हिम्मत करत आहेत. केंद्र सरकारची एकही योजना खैरेंनी आणली नसल्याचा आरोप आ. सतीश चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात परिवर्तन यात्रा सुरु आहे. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर, बजाजनगर येथे जाहीर सभा होणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण बोलत होते. यावेळी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मा. आ. किशोर पाटील, मा. जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, कार्याध्यक्ष खाजा शरफोद्दीन, अभिजित देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, यावेळी खा. खैरे पडणार हे सर्वांनाच वाटत आहे. 20 वर्षाचा कारभार काय असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. उरली सुरली कसर आ. हर्षवर्धन जाधव पूर्ण करत आऊन मोठ-मोठ्या जाहिरातीद्वारे खा. खैरेंचे कारनामे गावोगाव पोहोचत आहेत असा टोला लगावला. सेना- भाजपने धार्मिक भावना भडकवुन कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार केले असून ते फक्त कागदावर दाखवतात. यावेळी वंचित आघाडीचा फायदा कोणाला असे विचारले असता, एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे यामुळे त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचा पुनःरुच्चर करत काँग्रेस मधील सुस्तावलेले कामाला लागल्याचा टोला त्यांनी काँग्रेसमधील इच्छुकांना लगावला. आ. सत्तार आणि मी समजूतदार आहोत. जागा कोणालाही सुटू आम्ही समजून घेऊ. जागा कोणालाही सुटू दोघांनी प्रामाणिक पाठींबा द्यावा आहि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

........
कचरा प्रक्रिया केंद्रात मोठा घोटाळा - आ. चव्हाण

शहरात कचरा सेना- भाजपने आणला आणि कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात मोठा घोटाळा केला असून याची चौकशी करण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती आरोप आ. सतीश चव्हाण यांनी केला. व्हीआयपी जालना रोडवरून जातात म्हणून तेवढा सुंदर ठेवला आहे बाकी कचरा यांनी दाबून ठेवला आहे. परिस्थिती जैसे थे असल्याचेही चव्हाण म्हणाले. साध्य पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपात सेना-भाजपची सत्ता आहे मागील 25 वर्षात यांनी एक पाईपलाईन अजून शहरात टाकली नाही. समांतर योजनेला शरद पवारांनी निधी दिला आहे वाटले तर विजया रहाटकर यांना विचारा असेही चव्हाण म्हणाले.
रॉयल स्टँग बँरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड सीझन ८ च्या नागपूरातील परफेक्ट सांगतिक प्रवासाला सुरूवात

नागपूर;- दि.१९.०१.१९ ।  रॉयल स्टँग बँरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड या बहुशहरी सांगीतिक दूरच्या आठव्या सत्रात प्रसिद्ध  पारश्वगायिका निती मोहन  यांचा सहभाग होणार  आहे. व त्यांच्या आठव्या सीझनला आता सुरूवात होत आहे.देशाला आजकल सरवोत्कृष्ट संगीतानुभव दिलेल्या रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड चा नवा सीझन  आगल्यावेगल्या, आत्मिक आणि रसिकांच्या मनाला स्पर्श  करणा-या सांगीतिक रचना घेऊन निती मोहन येणार  आहे.सात सुरेल सीझन्सनी देशाला  मंत्रमुग्ध केलेल्या रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीवी अनप्लग्ड ही सांगीतिक दूर परफेक्ट सांगीतिक प्रवास घेऊन पुन्हा एकदा रसिकांसाठी सिध्द झाली आहे. वाराणसी येथे या  आठ शहरी टूरची यशस्वी सुरुवात झाली असून आता हा शो कोलकाता येथे गेला. रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट हा सांगीतिक शो नागपूरच्या  प्रेक्षकांना मंत्रमुंग्ध करण्यासाठी  येत असून यात निती मोहन ही प्रसिद्ध पारश्वगायिका सहभागी होणार आहे. आपल्या आवडत्या गाण्यांच्या आधुनिक  व्हर्जन्सनी  ली रसिक श्रोत्यांची मने जिंकून घेणार आहे."रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड हे आता परफेक्शनचे प्रतिक बनले  असून प्रत्येक सीझनमध्ये याचा दर्जा वाढत चालला असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या सीझनमध्येसुध्दा संगीतकारांमधली कला अधिकाअधिक शुध्द पध्दतीने  फुलवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. एमटीव्हीसोबतची  आमची दीर्घ कालीन भागीदारी पुढेही सुरू ठेवतांना आम्हाला  आनंद होत असून " मेक इट परफेक्ट " या आमच्या ब्रँन्ड तत्वाधानासह भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करता येईल,याची आम्हाला खात्री आहे." असे निती मोहन हिने पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड या शोमुले कलाकरांना आपल्या पूर्ण क्षमतानिशी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्गासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिलते. निती मोहन म्हणाली की  ए.आर.रहमान  हे माझे गुरु आहेत.त्यांच्या सोबत मी एम.टी.वी. मध्ये तीन सिझन काम केले.नागपूर ला येऊन मी खूष आहे. मी तिस-यांदा नागपूरला आली आहे. येथील थंडी मला खूप आवडते. मी भातखंडे संगीत विद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन साजरा
युवा नील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत ग्लोरिया सिटी
 औरंगाबाद येथे १३/०१/२०१८ रोजी  स्वरसंगम नितीन गायकवाड व राहुल सुरवसे प्रस्तुत  भीम गीताचे जंगी मैफिल आयोजित करण्यात आली होती ग्लोरीयातील रहिवाशी याचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता  तसेच तसेच १४/०१/२०१८ रोजी संस्थे अतर्गत भारतीय संविधानाच्या  एकूण १५०० हजार उद्दिशिकेचे वाटप करण्यात आले होते तसेच ग्रामीण भागातून आलेल्या भीम सैनिकाना  केळी वाटप करण्यात आल्या होत्या
संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी मनोगत व्यक्त करताना सागितले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे प्रत्येक घरा घरा मध्ये त्या सविधानाचा अभ्यास करून लोकशाही टिकविणे हे आजची काळाची गरज आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थितीत दयानंद भालेराव,राहुल ठोबरे ,कमलाकर नरवाडे सुनील भाग्यवंत, प्रमोद कांबळे ,राहुल सुरवसे ,सुनील गायकवाड, प्रशन्जीत वाकले नितीन रमेश धनेश्वर यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

हया वेळी मार्गदर्शक वकील सुधीर घोगडे कार्यक्रमास उपस्थित होते.
Like And comments on news Also Plz Subscribe to updates videos news on channel YUVA SAMNA MEDIA.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...