Friday, January 25, 2019

70 वा प्रजसत्ताक दिन आज आपण साजरा करीत आहोत.
आपल्या इतिहासातला हा सुवर्ण क्षण गेल्या 70 वर्षात आपण अनेक विक्रम केलेत वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत महत्व पूर्ण कामगिरी करत, देशाचे नाव उंच केले हा सत्तर वर्षाचा इतिहास आपली क्षमता, विद्वत्ता आणि कार्यक्षमता दर्शवितो. पण कुठे तरी काही तरी कमी राहिली असं सतत अपल्याला वाटत राहतं !
आजचा काळ पार बदलत आहे. लोकांची मानसिकता बदलली आहे. 26 जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झाला. आरामात उठायचं, खायचं ,प्यायचं आणि मजेत वेळ घालावायचा आणि या वेळेस तर शनिवार, रविवार दोन दिवस सतत सुट्टी मिळणार लॊकांचे आधिच सगळं प्लॅनिंग झालं असणार. मग 26 जानेवारी साजरा कोण करणार? शाळा, महाविद्यालये,  सरकारी ऑफिस, कर्मचारी ते ही येणं अनिवार्य केलेले आहे म्हणून स्वतःच्या इच्छेने प्रजासत्ताक साजरा करणारे किती असतील? 
हा एक प्रश्नच आहे बर जर कुणाला आपण विचारलं
'प्रजासत्ताक दिन का साजरा होतो?'
त्याच उत्तर एकच मिळेल,
'26 जानेवारी 1950 पासून देशात संविधान लागू झालं, म्हणून आपण हा दिवस साजरा करतो या याव्यातिरिक्त कुणाला जास्त काही सांगता येणार नाही.'
अगदी शाळेत जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं तरी तो हेच उत्तर देईल.
'India became republic on this day, so we celebrate Republic Day'
Republic हा शब्द लॅटिन भाषेतून घेतला आहे. Republica(Republic)- Res म्हणजे Thing-public -the public thing असा अर्थ निघतो. जेंव्हा भारत हा प्रजासत्ताक देश आहे असे म्हणतो, तेंव्हा याचा अर्थ हा होतो की,
'भारत हा घटना प्रधान देश आहे ,जिथे लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि अशा प्रतिनिधी द्वारे सरकार स्थापित होतो, जो पक्ष आपले बहुमत मिळवतो, त्याला सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळतो'
दर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु होते. खर पाहता या प्रजासत्ताक किंवा लोकतंत्रात आपण खरं तर खूप महत्त्वाचा धागा आहोत. या देशाचे भवितव्य आपण ठरवणार.
2019 निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, पुन्हा एकदा आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे, की चांगले लोक निवडून जावेत. जेणेकरून चांगल्या लोकांचे सरकार स्थापन होऊन ,आपला देश सुरक्षित लोकांच्या हाती जाईल. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये, आपण हेच बघतो की लोक पक्ष बघून मतदान करतात लोक बघून नव्हे.

जर पहिलेपासून आपण लोक बघून मतदान केले असते तर आज राजकारणात चांगले इमानदार मेहनत करणारे देशासाठी झटणारे अनेक लोक दिसले असते. आपण चुकलो, लोक बघून नव्हे तर पक्ष बघून मतदान करतो इथे. पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो त्यासाठी पक्ष जीवाचं रान करतात.इथे पक्षाचा विजय महत्वाचा असतो.त्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात या ना त्या मार्गाचा अवलंब केला जातो आणि हे पक्ष सत्ते पर्यंत जाऊन पोहोचत.
 नुकत्याच पाच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले उमेदवारांवर अनेक आरोप असतात, कधी कधी गुन्हा दाखल झालेला असतो, हा नेता काही करणार नाही हे माहीत असतं. तरीसुद्धा ती व्यक्ती निवडून येते आणि मग आपण ओरडत राहतो 'देशात भ्रष्टाचार वाढत आहे.'

 या सत्तर वर्षात आपली मानसिकताच राहील बदलली नाही आपण फक्त पक्ष, जात आणि धर्म यातच अडकून पडलो. त्यामुळे राजकारणात देशहितापेक्षा जात- धर्म आणि पक्षाला महत्त्व मिळत गेले. डोळे बंद करून, उमेदवार आपल्या जाती धर्माचा आहे म्हणून आपण मतदान करायला लागलो. या राजकारणातल्या लोकांनी याचा पुरेपूर फायदा उचलला, म्हणूनच आजही लोक आपल्यात त्यांच्याच नावावर दुफळी निर्माण करतात.एकविसाव्या शतकात असतानाही देशाला यातून आम्ही मुक्त करू शकलो नाही यासारखे दुर्दैव कोणते?
मी, माझा समाज, माझी जात, माझा धर्म ह्या पेक्षा श्रेष्ठ माझा देश आहे, ही भावना आमच्या अंतर्मनात झिरपली नाही रक्तात भिनली नाही आणि आता DNAमध्ये सापडण कठीण आहे मग खर्‍या अर्थाने आपण 'लोकतांत्र' आहोत का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा  आहे.
म्हणूनच आजही देश विचारत आहे
घोळक्या चा आवाज
झाला का बुलंद
'लोकतांत्र' का झाले
असे जिरेबंद ....
मूठभर लोकांनी
ताळेबंद केले आमचे नशीब
सोन्याचा घास त्यांना
बाकी राहिले गरीब...
जात धर्माने देशाला
असा विळखा घातला
आपल्याच हातांनी
राष्ट्रधर्माचा गळा कापला...
शत्रूंचा इथे काय
चालावा जोर?
हितशत्रू जागोजागी
लावला देशाला घोर...
असा प्रश्न वारंवार आपला देश विचारत आहे. या सगळ्या प्रश्नांना कोण व कसं उत्तर द्यावे?
-वर्षा परगट

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...