Saturday, January 19, 2019

खासदार खैरेंचे 20 वर्षाचे अपयश शिवसेनेला भोवणार : आ. सतीश चव्हाण


औरंगाबाद /प्रतिनिधी : लोकांनी ज्या अपेक्षेने खासदार चंद्रकांत खैरेंना मतदान केले त्याप्रमाणात 20 वर्षात एकही काम खैरेंनी केले नाही. शून्य कामे करूनही खासदार खैरे निवडणूक लढवण्याची हिम्मत करत आहेत. केंद्र सरकारची एकही योजना खैरेंनी आणली नसल्याचा आरोप आ. सतीश चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात परिवर्तन यात्रा सुरु आहे. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर, बजाजनगर येथे जाहीर सभा होणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण बोलत होते. यावेळी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मा. आ. किशोर पाटील, मा. जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, कार्याध्यक्ष खाजा शरफोद्दीन, अभिजित देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, यावेळी खा. खैरे पडणार हे सर्वांनाच वाटत आहे. 20 वर्षाचा कारभार काय असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. उरली सुरली कसर आ. हर्षवर्धन जाधव पूर्ण करत आऊन मोठ-मोठ्या जाहिरातीद्वारे खा. खैरेंचे कारनामे गावोगाव पोहोचत आहेत असा टोला लगावला. सेना- भाजपने धार्मिक भावना भडकवुन कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार केले असून ते फक्त कागदावर दाखवतात. यावेळी वंचित आघाडीचा फायदा कोणाला असे विचारले असता, एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे यामुळे त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचा पुनःरुच्चर करत काँग्रेस मधील सुस्तावलेले कामाला लागल्याचा टोला त्यांनी काँग्रेसमधील इच्छुकांना लगावला. आ. सत्तार आणि मी समजूतदार आहोत. जागा कोणालाही सुटू आम्ही समजून घेऊ. जागा कोणालाही सुटू दोघांनी प्रामाणिक पाठींबा द्यावा आहि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

........
कचरा प्रक्रिया केंद्रात मोठा घोटाळा - आ. चव्हाण

शहरात कचरा सेना- भाजपने आणला आणि कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात मोठा घोटाळा केला असून याची चौकशी करण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती आरोप आ. सतीश चव्हाण यांनी केला. व्हीआयपी जालना रोडवरून जातात म्हणून तेवढा सुंदर ठेवला आहे बाकी कचरा यांनी दाबून ठेवला आहे. परिस्थिती जैसे थे असल्याचेही चव्हाण म्हणाले. साध्य पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपात सेना-भाजपची सत्ता आहे मागील 25 वर्षात यांनी एक पाईपलाईन अजून शहरात टाकली नाही. समांतर योजनेला शरद पवारांनी निधी दिला आहे वाटले तर विजया रहाटकर यांना विचारा असेही चव्हाण म्हणाले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...