Friday, January 25, 2019

खुलताबाद प्रशासन जोमात.....प्रधानमंत्री आवास योजनेचे काम प्रगतीपथावर......

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात खुलताबादचे काम प्रगतीपथावर असून  खुलताबाद नगर परिषदेने 280 घरांसाठी डीपीआर तयार केला असून त्याचे प्रत्यक्ष काम देखील सुरु झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 167 लाभार्थ्यांची यादी नगर परिषदेकडून प्रसिद्ध झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 121 घरांचे काम प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे होणार असून याचादेखील डीपीआर तयार झालेला आहे. दोन्ही टप्प्यासाठी एकूण 984 अर्ज दाखल झाले होते. नगराध्यक्षांच्या तसेच मुख्याधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे खुलताबाद  नगरपरिषद हद्दीतील लाभार्त्यांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे.

 मंजूर झालेल्या घरांसंदर्भात काय योजना आहे. तसेच काम कसे चालणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 167 लाभार्थ्यांसाठी नगर परिषदे कडून (दि. 24 )रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत लाभार्थ्यांना विविध गोष्टी संदर्भात घरकुलच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये घराचा नकाशा कसा असावा, घराचे बांधकाम कसे करावे, बांधकाम करताना येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच घर बांधण्यासाठी कोणत्या विभागांची परवानगी घेणे अवश्यक आहे .त्याची प्रक्रिया काय आहे यावरही चर्चा करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्त्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. यावेळी  कार्यशाळेत नगराध्यक्ष एस.एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मुख्याधिकारी योगेश पाटील, घरकुलचे अधिकारी यांच्या सोबत तालुक्यांतील सर्व नगर सेवकांची उपस्थिती होती. तसेच यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे 150 लाभार्थी उपस्थित होते.


तालुक्यांसाठी दोन डीपीआर मंजूर झाले असून त्यांचे काम देखील सुरु झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 167 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या संदर्भातील  प्रत्यक्ष काम देखील सुरु झाले आहे. लाभार्थ्यांना नगर परिषदे कडून यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.

                     -योगेश पाटील,मुख्याधिकारी,खुलताबाद.




तालुक्यांत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम प्रगतीपथावर सुरु असून नगर परिषदे कडून लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.ही यादी प्रसिद्ध होताच आम्ही लाभार्थ्यांसाठी नगर परिषदे कडून कार्यशाळाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले यापुढेही नगरअध्यक्ष या नात्याने मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल.


                 -एस. एम. कमर, नगरअध्यक्ष,खुलताबाद.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...