Friday, January 25, 2019

सिंख समाजांचा लोहरी फेस्टिव्हल उत्साहात साजरा

औरंगाबाद।प्रतिनिधी
 बेग एम.एन.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पंजाबी समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  पंजाबी कल्चरल असोसिएशन व लॉयन्स क्लब औरंगाबाद सिडको यांच्या वतीने, शुक्रवार दि. 25 रोजी गुरुद्वारा येथे पंजाबी समाजातील 1 जानेवारीच्या नंतर नवीन लग्न झालेले तसेच नवीन जन्मलेल्या अशासाठी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता.त्याच बरोबर याठिकाणी विविध पंजाबी गीते देखील सादर करण्यात आली.

चलती जवानी किधर जा रही है ,ये दुनिया मतलब खुरादी, नवी नवीन कर्जा अश्या विविध प्रकारची पंजाबी गाणी गायली गेली. त्याच प्रमाणे पंजाबी सांस्कृतितील "लोडी" जाळून या अग्नीची पूजा करण्यात आली. पुढे या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे विभागीय प्रमुख संदीप मारुजी, लायन्स क्लब औरंगाबाद सिडको महेंद्र खानापूरकर, सिद्धी कॉलनी गुरुद्वारा अध्यक्ष कुलदीपसिंग निर ,गुरुद्वारा सचिव हरदेवसिंग मुच्छल,राजेंद्र सिंग छाबडा, मननिदर छाबडा,वररिदर कौर गुरुदत्ता सुभाष अत्री ,सय्यद नीम सर, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.



या सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी नवीन लग्न झालेल्या वधू वरांचे व नवीन जन्मलेल्या अशा मुलांचा या प्रसंगी सत्कार करण्यात येतो.त्याच बरोबर विविध गाणे, खेळ, भागडा अश्या विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात येते.या पैकी उत्कृष्ट भागडा सादर करणाऱ्या उमेदवारास भेट म्हणून ट्रॉफी दिली जाते.


प्रथमच क्रमांकासाठी कुलर तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारासाठी मिक्सर बक्षीस ठेवण्यात आले.तिसऱ्या क्रमांकासाठी घरगुती उपयोगी असलेल्या वस्तुंचे वाटप करण्यात आले.

Please Share like and Subscribe our You Tube Channel YUVA SAMNA MEDIA.
And Web Portal- www.yuvasamnamediagroup.blogspot.com
To more news send us in comment to contact us.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...