Sunday, December 30, 2018

*विकास खारगे ( सचिव - महसूल व वनविभाग ) महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते समाजसेवक सुमित पंडीत यांचा   सत्कार*

औरंगाबाद- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
    आजच्या या भावशून्य जगात ,  माणसातले माणुसपण जपणारा व्यक्ती असा लौकिक असणारे समाजसेवक सुमित पंडीत यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विभागिय आयुक्त  पुरूषोत्तम भापकर साहेब तसेच वन वा महसूल विभाग सचिव  विकास खारगे साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब व वनविभागाचे सर्व अधिकारी व शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.
      विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या सुलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेचे श्री सुमित पंडीत हे संस्थापक आहेत.
   *जेका रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा*
     तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाने माणसातच देव शोधणा-या सुमित पंडीत यांचे नाव सामाजिक क्षेत्रात आदराने घेतले जाते.निराधारांना मदत करित आधार देण्याचे काम असो अथवा शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा असो , बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम आणि सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन अशा  प्रत्येक ठिकाणी सुमित पंडीत तन मन धनाने कार्य करतांना आढळतात.
    कार्यक्रम प्रसंगी बोलतांना सुमित पंडीत म्हणाले की , समाजातील गोरगरीब , अनाथ आणि वंचितांच्या सेवेसाठी आपण देह झिजवायला हवा. यांच्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार करायला पाहीजे. यासाठी नियोजन महत्वाचे आहे. उद्योगपती , राजकारणी , समाजसेवक  आणि शासन यांची मदत व सकारात्मक भुमिका महत्वाची आहे . असे प्रतिपादन सुमित पंडीत यांनी केले.
       खारगे साहेबांनी माणुसकी समुहाला धन्यवाद देत कौतुकाची थाप दिली. आपले मनोगत व्यक्त करतांना खारगे साहेब म्हणाले की निराधारांसाठी शासकीय योजना तर भरपूर असतात , पण नियोजनाचा अभाव असतो.सुमित पंडीत सारख्या समाजसेवकांनी ख-या अर्थांने वंचितांना न्याय मिळवून दिला आहे.प्रसंगी सुमित पंडीत यांनी पदरमोड करून माणुसकी जपली आहे . 31 डिसेंबरला साजरे होणाऱ्या माणुसकी समुह व सुलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या.
       श्री सुमित पंडीत यांना आतापर्यंत विविध 42 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लोकांसाठी जगणाऱ्या या व्यक्तीची NDTV , Zee 24 तास आणि ब-याच प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दखल घेतली आहे.सर्वांत महत्वाचे म्हणजे हा माणूस माणसांना जोडत चालतो.
        सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था व माणुसकीला जगणारी माणसे या समुहामार्फत काम करणाऱ्या सुमित पंडीत नावाच्या या  अवलियाचे व त्यांच्या संस्थेच्या कामाचे सर्वत् औरंगाबादकरांतर्फे कौतूक होत आहे.
पीएचडी'च्या विद्यार्थ्यांना दिलासा

औरंगाबाद/ प्रतिनिधी
पीएच.डी. प्रवेशापासून पदवी बहाल होईपर्यंतची सर्व प्रक्रिया यापुढे ऑनलाईन होणार असल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने पीएचडी च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 पीएच.डी. प्रवेशापासून पदवी बहाल होईपर्यंतची सर्व प्रक्रिया यापुढे ऑनलाईन होणार आहे, यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रो-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.

या पोर्टलवर विषयनिहाय मार्गदर्शकांची नावे, त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती असेल. विद्यार्थी पेटचा अर्ज पोर्टलवर भरू शकतील. प्रशासनाने परवानगी दिली तर पोर्टलद्वारे ऑनलाईन परीक्षा घेऊन निकालही लावता येईल. सारांश पत्रिका लोड करणे, आरआरसीनंतरची अंतिम गुणवत्ता यादी आणि आरक्षणनिहाय जागांच्या स्थितीचा आलेख पोर्टलवर ठेवता येईल. विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास ती देखील नोंदविण्याची सोय असेल. प्री पीएच.डी. कोर्ससह विविध प्रक्रियांची वेळापत्रके पोर्टलवर असतील. प्रोव्हिजनल सर्टीफिकेटची प्रक्रिया, त्यानंतरचा संशोधनाचा प्रगती अहवाल, शोधप्रबंध पाठविणे यासारख्या सर्व प्रक्रियांची ऑनलाईन निगरानी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात चकरा मारण्याची गरज राहणार नाही. सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्या लागणार आहेत. ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही सबबी चालणार नाहीत.

पोर्टल तयार करण्याची जबाबदारी युनिकवर सोपविण्यात आली आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. पेटपासून पीएच. डी. पदवी मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया या पोर्टलद्वारे संचलित करण्यात येणार आहे. पोर्टलचे ४० टक्के काम पूर्ण  झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.


अडीच वर्षे उलटूनही पेट-४ चे कामकाज सुरू असले तरी अंतिम याद्या लागल्यानंतर आता सुधारित अंतिम याद्या लागणार आहेत. वर्षातून दोनवेळा पेट परीक्षा घेण्याचा नियम असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तीन वर्षांमध्ये एकच पेट घेऊ शकले. पेट-४ च्या घोळाचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाला संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्याशिवाय ही कोंडी फुटणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पीएच.डी.साठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. अशोक तेजनकर ( प्र- कुलगुरू)
जिद्दीच्या व मेहनतीच्या आधारावर तुम्ही काहीही करू शकता -  डॉ. सतीश ढगे

युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क  औरंगाबाद / प्रतिनिधी
जिद्दीच्या व मेहनतीच्या आधारावर तुम्ही काहीही करू शकता, तुमच्या एवढी डोळस व सक्षम व्यक्ती कोणीच नाही. त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका आपली मेहनत करत रहा. असे डॉ सतीश ढगे अशादीप दिव्यांग प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, हीच वेळ आहे मेहनत करण्याची. डोळे असणारे लोकही असे काम करत नाहीत जे डोळे नसणारे लोक करतात. तसेच दीपा करमरकर यांची यशस्वी कथा सांगून दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

अशादीप दिव्यांग प्रतिष्ठान ही दृष्टीबाधित दिव्यांगासाठी काम करणारी संस्था असून, या संस्थेद्वारे आज सकाळी ११ वा. एमजीएम येथील  आर्यभट्ट सभागृहात दृष्टीबाधित दिव्यांगासाठी रोबो रायटर चे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. परीक्षेत रायटर ठेवण्यासाठीही अनेक अटी असतात. त्यामुळे बऱ्याचदा या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. परंतु हा रोबोट आता रायटरचे सर्व काम करणार असल्याचे रोबोच्या संशोधकांनी सांगितले.

इस्रो या राष्ट्रीय संस्थेने दिव्यांगासाठी वाचन लेखनासाठी रोबोची निर्मिती केली आहे. धनेश बोरे, जयनेश गाडा व वैभव जाधव यांनी या रोबोचे संशोधन केले असून, यांनी या रोबो विषयी  आज कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षल धरोधर, प्रमुख पाहुणे डॉ. सतिश ढगे, रोबोचे संशोधक, अशादीप दिव्यांग प्रतिष्ठानचे भीमराव भुईगड, व राज्यांच्या कानाकोपऱ्यातील दिव्यांग उपस्थित होते.

रोबोचे वैशिष्ट्य
- स्वतः प्रश्न वाचून दिलेली उत्तरे लिहून काढतो.
- वजनाला हलके
- आकाराने मोबाईलपेक्षाही छोटे
- वापरायला सोपे

Tuesday, December 25, 2018

मनपा पद भरती,औरंगाबाद-
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार पूर्वी 5%  त्यानंतर 10% पदे एकूण रिक्त पदाच्या अनुकंपा
 द्वारे भरण्याबाबत शासन आदेश होते त्यामुळे अर्जांची संख्या जास्त असली तरी रिक्त पदाच्या संख्येच्या प्रमाणात अनुकंपा द्वारे कमी उमेदवार भरले जायचे तथापि 15 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार रिक्त पदाच्या 20 टक्के पदे अनुकंपा द्वारे भरण्याबाबत सुधारित शासन निर्णय प्राप्त झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत एकूण रिक्त झालेल्या वर्ग 3 वर्ग 4 या पदांच्या 20% पदे अनुकंपा द्वारे भरण्याबाबत सुधारित शासन निर्णय नीर्णय प्राप्त झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत एकूण रिक्त झालेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदांच्या 20 टक्के म्हणजेच 40 पदे अनुकंपा द्वारे भरता येतील त्यानुसार माननीय आयुक्त निपून विनायक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राप्त सर्व अर्ज ज्येष्ठताक्रमानुसार लावून सर्व प्रकरणांची तपासणी करून पंचवीस उमेदवारांना वर्ग 3 व वर्ग 4 चे अनुकंपा नियुक्ती आदेश देण्यात आले
        उर्वरित 15 प्रकरणात अपत्याबाबत पुरावा व इतर नातेवाईकांचे संमती पत्र इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून निवड समिती समोर ठेवून निर्णय घेण्यात येईल
         या वेळेस प्रथमच स्पीड पोस्टद्वारे उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठविण्यात आली त्यापैकी आठ ते दहा उमेदवार दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी रुजू होण्यास आले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की शासन सेवेत नियुक्तीचे पत्र विनासायास एक रुपयाही खर्च न करता घरी प्राप्त झाले बहुतांश उमेदवारांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रशासनाच्या पारदर्शी कामाबाबत मनपा प्रशासनाचे आभार मानले
       यापूर्वी 2016 मध्ये अनुकंपा भरती करण्यात आली होती त्यानंतर आता अनुकंपा भरती ने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पार पडली अशी माहिती उपायुक्त मंजुषा मुथा यांनी दिली

Sunday, December 23, 2018

खा.खैरे अजूनही नगसेवकाच्याच भूमिकेत - ना. हरिभाऊ बागडे
कामाचे श्रेय घेण्यावरून मंचावर प्रत्येकाचीच धडपड


औरंगाबाद/प्रतिनिधी: आठ दिवसांपासून खा. चंद्रकांत खैरे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध सुरू आहे. खा. खैरे यांनी बागडेंवर बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर ना. बागडे यांनी रविवारी झालेल्या शहर बस सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात त्याचा वचपा बागडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या समोर काढला. यावेळी खा. खैरेंवर जोरदार हल्ला चढविला. खा. खैरेंच्या आरोपांचे खंडन करून पुरावे असतील तर बिनधास्त कोर्टात जा माझी तुम्हाला परवानगी आहे असे प्रतिउत्तर ना. बागडेंनी खैरेंना दिले. ना. बागडे खैरेंच्या आरोपामुळे चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळाले.
मनपाच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बस सेवेचा शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर मंचावर खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. संजय सिरसाट, आ. इम्तियाज जलील, वै. वि.मं अध्यक्ष डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आयुक्त निपुण विनायक, उपमहापौर विजय औताडे,  मा. आ. किशनचंद तनवाणी, शिवसेना शहरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य, सभागृह नेता विकास जैन,  विरोधी पक्षनेते जमीर कादरी पक्षाचे गटनेते उपस्थित होते. पुढे बोलताना बागडे म्हणाले की,
अर्धवट माहितीच्या आधारावर साधा नगरसेवकही तुमच्या सारखे बोलणार नाही, जरा खासदारासारखे वागा असा सल्ला ना. बागडेंची खा. खैरेंना दिला.
ययावेळी सर्वजण कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. यात ना. बागडे ही मागे नव्हते, ते म्हणाले की, मनपाला राज्य आणि केंद्र सरकारने मिळून तीनशे कोटीचा निधी दिला तो ही यांनी अजून खर्च केला नाही. शहराचा विकास आराखडा तयार नाही. यामुळे शहराचा विकास थांबला असून आदित्यजी आता या शहराकडे तुम्ही जरा लक्ष द्या, असे सांगत बागडे यांनी शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला. आयुक्तांच्या संकल्पनेतूनच शहर बस सुरु झाल्याचा दावा ना. बागडेंनी केला. यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

.......
या योजना माझ्याच- खा. खैरे

सर्वाना दोन मिनिटं बोलण्याची वेळ दिली होती. योजना माझ्या आहेत त्यामुळे मी पाच मिनिटे बोलणार. शहर बस, भूमिगत गटार योजनेचा मी यजमान आहे. या योजनेमध्ये कुणाचेच श्रेय नाही. ते फक्त माझेच आहे, मनपाचेही यात काहीच नाही, असा दावा खा. खैरेनी केला. केंद्रात मी स्थायी समितीच्या अध्यक्ष आहे यामुळे अनेक वेळा आमदारांना बैठकीला बोलावत असतो. मात्र, काही जणांना वेळ नसल्याने ते येत नसतील अशी कोपरखळी भाजपाला मारली. टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 5 जानेवारीपर्यंत 100 बस देण्यासाठी तंबी देत ठाकरेंना शब्द दिल्याचे खा. खैरे म्हणाले.
.......
योजनांचे श्रेय भाजपचे- आ. अतुल सावे

खैरे यांच्या प्रयत्नांमुळे या योजना आल्याचे वक्तव्य महापौर घोडेले यांनी केले याला प्रतिउत्तर देताना आ.सावे म्हणाले की,  या योजना खा. खैरेंमुळे नाहीत तर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाठपुरावा केला, पत्र दिले म्हणून आज या योजना आपल्याला दिसत आहेत.  असे भाजपचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.
सरकारच्या विरुद्ध असलेला देशाच्या विरुद्ध नसतो - आदित्य ठाकरे.



केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे. असे असताना सेना कायम विरोधकांच्या भूमिकेत राहिली. सेना-भाजपमध्ये कायम शीतयुद्ध सुरु आहे. याचा प्रत्यय याठिकानीही पाहायला मिळाला. सरकार विरुद्ध बोलणारा देशाविरुद्ध नसतो असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपाला लगावला. योजनांचे श्रेय कोणाचे यापेक्षा नागरिकांसाठी योजना आली हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांनी काय यात भूमिका घेतली माहित नाही. मात्र, शहराला एवढा चांगला आयुक्त दिला हे महत्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
खूप दिवसांनी युतीचा असा एकत्र कार्यक्रम होत आहे. मी नमाज साठी थांबलोय आणि आ. जलील भगवा फेटा बांधून बसले आहेत असे चांगले चित्र कमी वेळा पाहायला मिळते. नमाज वेळी थांबायचे हे मी बाळासाहेबांकडून शिकलो असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. मुंबई, नागपूर आणि पुण्यात इलेक्ट्रॉनिक बस चा पर्याय वापरला जात आहे. याठिकानीही मनपाने सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारावा आणि त्यातून निर्माण होणारी वीज बसेस साठी वापरावी यामुळे प्रदूषणही होणार नाही असा सल्ला ठाकरेंनी महापौरांना दिला. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेषकरून तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


......
आणि आदित्य ठाकरेंनी महापौरांना थांबवले

महापौर नंदकुमार घोडेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत होते. यावेळी क्रांती चौक जवळच्या मशिदीत नमाज सुरु झाली. आवाज कानावर पडताक्षणी आदित्य ठाकरेंनी महापौरांना बोलणे थांबवण्यास सांगितले. अचानक बोलताना थांबवल्याने काही वेळ महापौर ही गोंधळले होते. आदित्य ठाकरेंच्या या समयसुचकतेमुळे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर याचीच चर्चा जास्त होती.

सोयगाव:काळ्याफिती लावून आंदोलन,सोयगाव तहसील कार्यालय.

 सोयगाव,दि.२३(प्रतिनिधि)-युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क
राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनाला शुक्रवार पासून महसूल व तलाठी संघटनांनी पाठींबा दिल्याने सोयगाव तहसील कार्यालयात दि.२१ काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले होते. विविध मागण्यांसाठी राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.२० पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.दरम्यान,दि.२१ पासून या आंदोलनाला महसूल,व तलाठी संघटनेच्या वतीने पाठींबा दर्शविण्यात आल्याने एक दिवस निषेध म्हणून काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले.आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार सोयगाव यांना मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसाठी निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर लक्ष्मण इंगळे,शिवाजी शेरे,संभाजी बोरसे,संजय नावकर,मनोज आगे,संजय साठे,सविता सोनावणे आदींच्या स्वाक्षर्या आहे.या आंदोलनाला पत्जीम्बा देण्यात आल्याने तलाठी व महसूल संघटनेच्या वतीने काळ्याफिती लावून कामकाज केले.
Govt. लिस्ट गवर्नमेंट रजिस्ट्रेशन कराने के लिए लगने वाले कागजात और मशीनरी

शासकीय गुत्तेदारचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कागदपत्रे.


List And Documents to become govt. Contractor of Road.
Registration,tender Fill of Govt. Road,building,Dam.




भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...