खा.खैरे अजूनही नगसेवकाच्याच भूमिकेत - ना. हरिभाऊ बागडे
कामाचे श्रेय घेण्यावरून मंचावर प्रत्येकाचीच धडपड
औरंगाबाद/प्रतिनिधी: आठ दिवसांपासून खा. चंद्रकांत खैरे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध सुरू आहे. खा. खैरे यांनी बागडेंवर बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर ना. बागडे यांनी रविवारी झालेल्या शहर बस सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात त्याचा वचपा बागडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या समोर काढला. यावेळी खा. खैरेंवर जोरदार हल्ला चढविला. खा. खैरेंच्या आरोपांचे खंडन करून पुरावे असतील तर बिनधास्त कोर्टात जा माझी तुम्हाला परवानगी आहे असे प्रतिउत्तर ना. बागडेंनी खैरेंना दिले. ना. बागडे खैरेंच्या आरोपामुळे चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळाले.
मनपाच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बस सेवेचा शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर मंचावर खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. संजय सिरसाट, आ. इम्तियाज जलील, वै. वि.मं अध्यक्ष डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आयुक्त निपुण विनायक, उपमहापौर विजय औताडे, मा. आ. किशनचंद तनवाणी, शिवसेना शहरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य, सभागृह नेता विकास जैन, विरोधी पक्षनेते जमीर कादरी पक्षाचे गटनेते उपस्थित होते. पुढे बोलताना बागडे म्हणाले की,
अर्धवट माहितीच्या आधारावर साधा नगरसेवकही तुमच्या सारखे बोलणार नाही, जरा खासदारासारखे वागा असा सल्ला ना. बागडेंची खा. खैरेंना दिला.
ययावेळी सर्वजण कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. यात ना. बागडे ही मागे नव्हते, ते म्हणाले की, मनपाला राज्य आणि केंद्र सरकारने मिळून तीनशे कोटीचा निधी दिला तो ही यांनी अजून खर्च केला नाही. शहराचा विकास आराखडा तयार नाही. यामुळे शहराचा विकास थांबला असून आदित्यजी आता या शहराकडे तुम्ही जरा लक्ष द्या, असे सांगत बागडे यांनी शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला. आयुक्तांच्या संकल्पनेतूनच शहर बस सुरु झाल्याचा दावा ना. बागडेंनी केला. यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता.
.......
या योजना माझ्याच- खा. खैरे
सर्वाना दोन मिनिटं बोलण्याची वेळ दिली होती. योजना माझ्या आहेत त्यामुळे मी पाच मिनिटे बोलणार. शहर बस, भूमिगत गटार योजनेचा मी यजमान आहे. या योजनेमध्ये कुणाचेच श्रेय नाही. ते फक्त माझेच आहे, मनपाचेही यात काहीच नाही, असा दावा खा. खैरेनी केला. केंद्रात मी स्थायी समितीच्या अध्यक्ष आहे यामुळे अनेक वेळा आमदारांना बैठकीला बोलावत असतो. मात्र, काही जणांना वेळ नसल्याने ते येत नसतील अशी कोपरखळी भाजपाला मारली. टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 5 जानेवारीपर्यंत 100 बस देण्यासाठी तंबी देत ठाकरेंना शब्द दिल्याचे खा. खैरे म्हणाले.
.......
योजनांचे श्रेय भाजपचे- आ. अतुल सावे
खैरे यांच्या प्रयत्नांमुळे या योजना आल्याचे वक्तव्य महापौर घोडेले यांनी केले याला प्रतिउत्तर देताना आ.सावे म्हणाले की, या योजना खा. खैरेंमुळे नाहीत तर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाठपुरावा केला, पत्र दिले म्हणून आज या योजना आपल्याला दिसत आहेत. असे भाजपचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.
सरकारच्या विरुद्ध असलेला देशाच्या विरुद्ध नसतो - आदित्य ठाकरे.
केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे. असे असताना सेना कायम विरोधकांच्या भूमिकेत राहिली. सेना-भाजपमध्ये कायम शीतयुद्ध सुरु आहे. याचा प्रत्यय याठिकानीही पाहायला मिळाला. सरकार विरुद्ध बोलणारा देशाविरुद्ध नसतो असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपाला लगावला. योजनांचे श्रेय कोणाचे यापेक्षा नागरिकांसाठी योजना आली हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांनी काय यात भूमिका घेतली माहित नाही. मात्र, शहराला एवढा चांगला आयुक्त दिला हे महत्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
खूप दिवसांनी युतीचा असा एकत्र कार्यक्रम होत आहे. मी नमाज साठी थांबलोय आणि आ. जलील भगवा फेटा बांधून बसले आहेत असे चांगले चित्र कमी वेळा पाहायला मिळते. नमाज वेळी थांबायचे हे मी बाळासाहेबांकडून शिकलो असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. मुंबई, नागपूर आणि पुण्यात इलेक्ट्रॉनिक बस चा पर्याय वापरला जात आहे. याठिकानीही मनपाने सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारावा आणि त्यातून निर्माण होणारी वीज बसेस साठी वापरावी यामुळे प्रदूषणही होणार नाही असा सल्ला ठाकरेंनी महापौरांना दिला. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेषकरून तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
......
आणि आदित्य ठाकरेंनी महापौरांना थांबवले
महापौर नंदकुमार घोडेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत होते. यावेळी क्रांती चौक जवळच्या मशिदीत नमाज सुरु झाली. आवाज कानावर पडताक्षणी आदित्य ठाकरेंनी महापौरांना बोलणे थांबवण्यास सांगितले. अचानक बोलताना थांबवल्याने काही वेळ महापौर ही गोंधळले होते. आदित्य ठाकरेंच्या या समयसुचकतेमुळे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर याचीच चर्चा जास्त होती.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.