जिद्दीच्या व मेहनतीच्या आधारावर तुम्ही काहीही करू शकता - डॉ. सतीश ढगे
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद / प्रतिनिधी
जिद्दीच्या व मेहनतीच्या आधारावर तुम्ही काहीही करू शकता, तुमच्या एवढी डोळस व सक्षम व्यक्ती कोणीच नाही. त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका आपली मेहनत करत रहा. असे डॉ सतीश ढगे अशादीप दिव्यांग प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, हीच वेळ आहे मेहनत करण्याची. डोळे असणारे लोकही असे काम करत नाहीत जे डोळे नसणारे लोक करतात. तसेच दीपा करमरकर यांची यशस्वी कथा सांगून दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
अशादीप दिव्यांग प्रतिष्ठान ही दृष्टीबाधित दिव्यांगासाठी काम करणारी संस्था असून, या संस्थेद्वारे आज सकाळी ११ वा. एमजीएम येथील आर्यभट्ट सभागृहात दृष्टीबाधित दिव्यांगासाठी रोबो रायटर चे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. परीक्षेत रायटर ठेवण्यासाठीही अनेक अटी असतात. त्यामुळे बऱ्याचदा या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. परंतु हा रोबोट आता रायटरचे सर्व काम करणार असल्याचे रोबोच्या संशोधकांनी सांगितले.
इस्रो या राष्ट्रीय संस्थेने दिव्यांगासाठी वाचन लेखनासाठी रोबोची निर्मिती केली आहे. धनेश बोरे, जयनेश गाडा व वैभव जाधव यांनी या रोबोचे संशोधन केले असून, यांनी या रोबो विषयी आज कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षल धरोधर, प्रमुख पाहुणे डॉ. सतिश ढगे, रोबोचे संशोधक, अशादीप दिव्यांग प्रतिष्ठानचे भीमराव भुईगड, व राज्यांच्या कानाकोपऱ्यातील दिव्यांग उपस्थित होते.
रोबोचे वैशिष्ट्य
- स्वतः प्रश्न वाचून दिलेली उत्तरे लिहून काढतो.
- वजनाला हलके
- आकाराने मोबाईलपेक्षाही छोटे
- वापरायला सोपे

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.