Sunday, December 30, 2018

*विकास खारगे ( सचिव - महसूल व वनविभाग ) महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते समाजसेवक सुमित पंडीत यांचा   सत्कार*

औरंगाबाद- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
    आजच्या या भावशून्य जगात ,  माणसातले माणुसपण जपणारा व्यक्ती असा लौकिक असणारे समाजसेवक सुमित पंडीत यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विभागिय आयुक्त  पुरूषोत्तम भापकर साहेब तसेच वन वा महसूल विभाग सचिव  विकास खारगे साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब व वनविभागाचे सर्व अधिकारी व शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.
      विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या सुलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेचे श्री सुमित पंडीत हे संस्थापक आहेत.
   *जेका रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा*
     तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाने माणसातच देव शोधणा-या सुमित पंडीत यांचे नाव सामाजिक क्षेत्रात आदराने घेतले जाते.निराधारांना मदत करित आधार देण्याचे काम असो अथवा शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा असो , बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम आणि सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन अशा  प्रत्येक ठिकाणी सुमित पंडीत तन मन धनाने कार्य करतांना आढळतात.
    कार्यक्रम प्रसंगी बोलतांना सुमित पंडीत म्हणाले की , समाजातील गोरगरीब , अनाथ आणि वंचितांच्या सेवेसाठी आपण देह झिजवायला हवा. यांच्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार करायला पाहीजे. यासाठी नियोजन महत्वाचे आहे. उद्योगपती , राजकारणी , समाजसेवक  आणि शासन यांची मदत व सकारात्मक भुमिका महत्वाची आहे . असे प्रतिपादन सुमित पंडीत यांनी केले.
       खारगे साहेबांनी माणुसकी समुहाला धन्यवाद देत कौतुकाची थाप दिली. आपले मनोगत व्यक्त करतांना खारगे साहेब म्हणाले की निराधारांसाठी शासकीय योजना तर भरपूर असतात , पण नियोजनाचा अभाव असतो.सुमित पंडीत सारख्या समाजसेवकांनी ख-या अर्थांने वंचितांना न्याय मिळवून दिला आहे.प्रसंगी सुमित पंडीत यांनी पदरमोड करून माणुसकी जपली आहे . 31 डिसेंबरला साजरे होणाऱ्या माणुसकी समुह व सुलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या.
       श्री सुमित पंडीत यांना आतापर्यंत विविध 42 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लोकांसाठी जगणाऱ्या या व्यक्तीची NDTV , Zee 24 तास आणि ब-याच प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दखल घेतली आहे.सर्वांत महत्वाचे म्हणजे हा माणूस माणसांना जोडत चालतो.
        सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था व माणुसकीला जगणारी माणसे या समुहामार्फत काम करणाऱ्या सुमित पंडीत नावाच्या या  अवलियाचे व त्यांच्या संस्थेच्या कामाचे सर्वत् औरंगाबादकरांतर्फे कौतूक होत आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...