Sunday, December 30, 2018

पीएचडी'च्या विद्यार्थ्यांना दिलासा

औरंगाबाद/ प्रतिनिधी
पीएच.डी. प्रवेशापासून पदवी बहाल होईपर्यंतची सर्व प्रक्रिया यापुढे ऑनलाईन होणार असल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने पीएचडी च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 पीएच.डी. प्रवेशापासून पदवी बहाल होईपर्यंतची सर्व प्रक्रिया यापुढे ऑनलाईन होणार आहे, यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रो-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.

या पोर्टलवर विषयनिहाय मार्गदर्शकांची नावे, त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती असेल. विद्यार्थी पेटचा अर्ज पोर्टलवर भरू शकतील. प्रशासनाने परवानगी दिली तर पोर्टलद्वारे ऑनलाईन परीक्षा घेऊन निकालही लावता येईल. सारांश पत्रिका लोड करणे, आरआरसीनंतरची अंतिम गुणवत्ता यादी आणि आरक्षणनिहाय जागांच्या स्थितीचा आलेख पोर्टलवर ठेवता येईल. विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास ती देखील नोंदविण्याची सोय असेल. प्री पीएच.डी. कोर्ससह विविध प्रक्रियांची वेळापत्रके पोर्टलवर असतील. प्रोव्हिजनल सर्टीफिकेटची प्रक्रिया, त्यानंतरचा संशोधनाचा प्रगती अहवाल, शोधप्रबंध पाठविणे यासारख्या सर्व प्रक्रियांची ऑनलाईन निगरानी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात चकरा मारण्याची गरज राहणार नाही. सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्या लागणार आहेत. ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही सबबी चालणार नाहीत.

पोर्टल तयार करण्याची जबाबदारी युनिकवर सोपविण्यात आली आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. पेटपासून पीएच. डी. पदवी मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया या पोर्टलद्वारे संचलित करण्यात येणार आहे. पोर्टलचे ४० टक्के काम पूर्ण  झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.


अडीच वर्षे उलटूनही पेट-४ चे कामकाज सुरू असले तरी अंतिम याद्या लागल्यानंतर आता सुधारित अंतिम याद्या लागणार आहेत. वर्षातून दोनवेळा पेट परीक्षा घेण्याचा नियम असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तीन वर्षांमध्ये एकच पेट घेऊ शकले. पेट-४ च्या घोळाचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाला संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्याशिवाय ही कोंडी फुटणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पीएच.डी.साठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. अशोक तेजनकर ( प्र- कुलगुरू)

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...