सातार्यात तीन दुकाने फोडून ४० हजाराचा मुद्देमाल लंपास
औरंंगाबाद/प्रतिनिधी
बीडबायपास लगत सातारा परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. एकाच रात्री तीन दुकाने फोडून जवळपास ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड बायपास रोडवरील हुसैननगरातील रहिवासी शेख अबुलखैर सलिम अहेमद उर्फ अखिल (वय ३८) यांचे हुसैननगर परिसरात किराणा सामानाचे दुकान आहे. ९ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्यांनी शेख अबुलखैर अहेमद यांचया दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील किराणा सामान, इतर जिवनावश्यक वस्तू, रोख रक्कम असा एकूण २३ हजार २३० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. तसेच त्यांच्या दुकानाजवळील सय्यद मंसुरी बापूजी यांच्या दुकानातून ७ हजार ४२० रूपये किंमतीचा तर मोहम्म्द दानीश एकबाल अंन्सारी यांच्या दुकानाचे शटर उचकटून ८ हजार ४०० रूपये किंमतीचा असा एकूण ३९ हजार ५० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी एकाच रात्रीत एक किराणा दुकान, पानटपरी आणि डेली निड्स शॉप अशी तीन दुकाने फोडल्यामुळे सातारा परिसरातील रहिवाश्यांत खळबळ उडाली आहे. शेख अबुलखैर सलिम अहेमद उर्फ अखिल यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सानप करीत आहेत.