जांभाळा येथील अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी
माळीवाडा प्रतिनिधीः औरंगाबाद नाशिक रोडवर जांभळा या गावानजिक आज सकाळी 10:30 वाजेदरम्यान ट्रक आणि स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे सदर ट्रक औरंगाबादच्या दिशेने येत होता तर फोर स्विफ्ट औरंगाबादहुन जांभळा गावाकडे चालली होती या दरम्यान स्विफ्ट गाडी क्रमांक mh20 -0295 ही अतिशय भरधाव होती व ट्रक क्रमांक पी बी 13 ए एल 74 71 यांच्यात समोरासमोर अपघात झाला अपघात इतका भयानक होता की स्विफ्ट गाडीचे इंजिन दोनशे फूट दूर फेकले गेले यात मिसबा कॉलनी ,मिटमिटा येथील शेख वाजिद शेख अजगर वय 35 मिसबाह कॉलनी, मिटमिटा व शेख गणी शेख समद वय 32 राहणार मिसबाह कॉलनी ,मिटमिटा यांचा जागीच मृत्यू झाला तर तर नसिर खान बाबु खान वय 32 राहणार, मिटमिटा व अजीम खान हसन खान वय 32 राहणार मिसबहा कॉलनी , मिटमिटा हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे घाटी दवाखान्यात हलवण्यात आले आहे यावेळी जांभाळ्या येथील दिपक चोपडे जांभाळ्यातील गावकरानी जखमीला काढून घाटी मध्ये नेण्यासाठी मदत केली घटनेची माहिती मिळताच मिटमिटा येथील रहिवाशांनी घाटी येथे गर्दी केली होती. घटनास्थळी छावणी विभागाचे सह पोलिस आयुक्त डी एन मुंडे यांनी पाहणी केली व पुढील तपासाचे आदेश दिले घाटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेख नासेर शेख आरिफ ,अब्दुल करीम, भाजपा शाखाप्रमुख बाबा मुळे, एमआयएम चे ,शेख हरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एडवोकेट हबीब कुरेशी पठाण, शिवसेनाचे नवनाथ मुळे, मगबोल कादरी मनसेचे जिल्हा सचिव रियाज पटेल आदींनी जखमी ची चौकशी करण्यासाठी धाव घेतली तसेच मृत्यू पावलेल्या युवकां च्या घरच्यांची सांत्वना केली मृत्यू पावलेले युवक यांचे नुकतेच दोन वर्षांपूर्वी लग्न झालेले होते त्यामुळे त्यांना लहान लहान बालके असून घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे .ट्रक चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास दौलताबाद पोलीस स्टेशन करीत आहे दौलताबाद पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अशोक शेळके ज्ञानेश्वर साबळे यांनी जखमींना घाटीत हलवण्यास वेळीच मदत केली. सदर अपघात झालेल्या ठिकाणी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे वाहतूक एकाच बाजूने चालू आहे त्यामुुळे हा एकेरी मार्ग चालू आहे त्यामुळे अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे अपघात ज्या ठिकाणी झाला ती जागा अपघाताचा ब्लॅक पॉईंट असल्याचे म्हटले जाते त्या ठिकाणी अद्याप आठ ते दहा लोकांचा अपघातांमध्ये जीव गेलेला आहे त्यामध्ये भारतीय जवानांचा ही समावेश आहे ती जागा अपघात स्थळ म्हणून जाहीर आहे तरीहीी त्या अद्याप कुठला ही दिशादर्शक फलक लावलेला नाही.