मोटारसायकल चोरटे सिडको पोलिसांकडून जेरबंद
औरंगाबाद/प्रतिनिधी : सिडको भागात मोटारसायकल चोरणाऱ्या भामट्याना पोलिसांनी गजाआड केले. कारवाईत आरोपींकडून पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मंगेश गिरी, धानोरा ता.गंगापुर जि.औरंगाबाद, सुमीत रामचंद्र राजपुत रा-एन-6, सिंहगड कॉलनी औरंगाबाद आणि एक विधीसंघर्ष बालकाला सिडको पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको भागात मोटारसायकल चोरीतील फरार आरोपी मंगेश गिरी बिव धानोरा ता. गंगापूर येथे शेतात लपून बसला आहे, अशी माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोउनि सी.व्ही ठुबे, पोहेका, दिनेश बन पोना संतोष
मुदीराज, पोशि ईरफान खान यांनी बिव धानोरा ता.गंगापुर जि.औरंगाबाद मंगेश गिरीला त्याच्या शेतातुन सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार सुमीत रामचंद्र राजपुत रा. एन-6, सिंहगड कॉलनी औरंगाबाद याला घरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांनी सिडको हद्दीतुन चार मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सिडको पोलीस स्टेशन हद्दीत पोउपनी बी.के.पाचोळे , पोहेका नरसिंग पवार, राजेश बनकर, पोना प्रकाश
डोगंरे, पोशि सरेश भिसे किशोर गाडे, स्वप्निल रत्नपारखे, विजय भानुसे गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिगं करीत असताना त्यांना एक विधीसंघर्ष बालक मोटारसायकल वर जाताना आढळला. त्याला मोटरसायकल व कागदपत्रे
याविषयी विचारपुस केली असता त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर त्याने मोटर सायकल ही चोरी केलेली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तीन आरोपीकडुन २ लाख ५० हजारांचा गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपीकडुन आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे व त्याचे
ईतर साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उप- आयुक्त राहुल खाडे, सहा पोलीस आयुक्त गुणाजी सांवत, वरीष्ट पोलीस निरीक्षक अशोक गिरी याचे मार्गदर्शनाखाली पो. उपनि. सी.व्ही.ठुबे, बी.के.पाचोळे, पोहेका, दिनेश बन, नरसिंग पवार ,राजेश बनकर ,पोना संतोष मुदीराज, प्रकाश डोंगरे, प्रकाश भालेराव, पोशि ईरफान खान, राजु सुरे, सरेश भिसे, किशोर गाडे, स्वप्निल रत्नपारखे, विजय भानुसे यांनी केली.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.