Thursday, February 14, 2019

*एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त/ देशभक्त मा जावेद अहमद* 
         
          Hon'bless IPS Javed Ahemad Sir

       ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्याच्या पायाला हात लावायला लाज वाटू नये असे माझे Idol असणारे, नव्या मुंबईचे पोलीस आयुक्त व सध्याचे सौदी अरेबियाचे राजदूत मा. जावेद अहमद.
            डॉ अब्दुल कलाम यांचेनंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळविले असे अधिकारी म्हणजे मा जावेद अहमद.  जावेदसाहेब १९८० च्या बॅचचे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत. आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत.अब्जावधीच्या  संपत्तीचे ते मालक आहेत. अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.                   
           १९८० मध्ये I P S होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली. ३६ वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले.                            .           मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. खाजगी गाडी वापरत.     
.            मा जावेदसाहेब यांचा गणवेश जाड्याभरड्या खाकीचा असे. टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायीभाव होता. म.गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता.                             .          नवी मुंबईत पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वत:चा मोबाईल सार्वजनीक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे. समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते. माणूसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे.                            .           नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून  मा.जावेदसाहेब यांना ओळखलं जाते.         
.          दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजातून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर, २०१५ ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर मा प्रधानमंत्री यांनी त्याची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलीस खात्यातून निवृत्ती नंतर राजदूत होण्याचा बहुमान मा रिबेरोसरांचे नंतर  मिळविणारे केवळ दुसरेच मा. जावेदसाहेब आहेत.                           .           पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो . समाजाचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. वेदना, व्याकुळता, करूणा पाहून त्यांच मन कधी व्याकूळ होत नाही. आपल्याचं मस्तीत /धुंदीत ते वावरत असतात. लाज,लज्जा काही नसते. केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्त्वज्ञान ओकत असतात. जनाची नाही तरी मनाचीही लाज वाटत नाही. अशावेळी मा.जावेदसाहेब यांच्यासारखा माणूस आपला वाटायला लागतो. खराखुरा राष्ट्रभक्त म्हणून मनात स्थान निर्माण करतो. आजही सर्वच खात्यात काही अधिकारी मनापासून जीव तोडून काम करत आहेत.
               *या निमित्ताने सर्वांना एक विनंती पगारातील पैसे समाजासाठी खर्च करू नका पण समाजाला ओरबडू नका.*
        मा जावेद अहमदसाहेब आपणा सारख्या देशसेवा करणाऱ्या  खऱ्या राष्ट्रभक्तास साष्टांग नमस्कार. आपणाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
          *(संपत गायकवाड)*
      माजी सहाय्यक शिक्षण संचालक.

         Special Report By-Mushtak Baig
              8668620106,8793666376

For more details and Updates plz Subscribe to Yuva Samna Media Group.
आैरंगाबाद से प्रकाशीत सापताहीक शाहकार टाइम्स (उदू) की जनिब से शाम~ए ~गझल व excelence work award का  आयोजन 24/2/2019  बरेाज इतवार  शाम 6.30 बजे यशवंत राव चौहान नाट्य गृह  पैठण गेट आैरंगाबाद में रखा गया है.
जीस मे डॉ. दाेसत माेहमद खान व  कविता  वतनी अपनी गजल  पेश करेंगे  इस अॉवाड फंगशन मे बेसट टीचर के अलावा  मशहूर उदू शायर गिरीश मगरे ,सदचेदाऩंद भागवत इतयादी काे विशेष अॉवाड दिया जायगा. आप से अनुराेध है के इस महेफील का अानंद लेने के लिए जरूर पधारे.

Wednesday, February 13, 2019

मशिप्र संचलित देवगिरी महाविद्यालय व कॕम्पस कट्टा डाॕट काॕम (www.campuskatta.com) या पहिल्या महाविद्यालयीन बातमी पोर्टलच्या संयुक्त विद्यमानाने व हेल्थ पार्टनर  जेजे प्लस हाॕस्पिटल व काॕन्टाकेअर आय हाॕस्पिटल यांच्या  सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविले गेले. या शिबिरात जवळपास तीनशे विद्यार्थांची आरोग्य तपासणी करत चांगला प्रतिसाद मिळाला.



शिबिराचे  प्रसंगी देवगिरी महाविदयालचे मंडळाचे पंडितराव हर्षे, प्राचार्य डाॕ.शिवाजी थोरे, उपप्राचार्या .सि.एस.पाटिल यांनी कॕम्पस कटृटा राबावित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

तसेच डाॕ.जिवन राजपुत यांनी विद्यार्थांना हेल्मेट वापरण्याविषयी मार्गदर्शन केले.
कॕन्सरतज्ञ डाॕ.बन्सवाल यांनी व्यसनाधिनतेपासुन लांब राहत आरोग्यदायी खाण्याचा सल्ला दिला.


या प्रसंगी कॕम्पस कटृटा डाॕट काॕम या बातमी पोर्टलचे संपादक डाॕ.सुनिल राजपुत, कॕन्सरतज्ञ डाॕ.बन्सवाल ,फिजिशिअन डाॕ.प्रशांत घाडगे ,देवगिरी आरोग्य समितीचे डाॕ.उबाळे, डाॕ,बनकर,प्रा.राजुरकर मॕडम,प्रा,जाधव मॕडम , जेजे प्लस हाॕस्पिटल चे पांडुरंग नागपुरे , डाॕ.नागरे, काॕन्टोकेअरचे गिरिश घोटणकर व स्टाफ यांनी विषेश परिश्रम घेतले.

Tuesday, February 12, 2019

आरोग्यम फौंउडेशन की ओरसे रक्तदान 14 फरवरी 2019 को घाटी हॉस्पिटल  में भव्य रक्तदान शिबिर  का आयोजन किया जा रहा है.
#घाटी ब्लड बँक में ये शिबिर सुबह दस से शाम चार  बजे तक रहेगा.
#गरीब_मरीजों की जान बचाने के लिए इस सराहनीय उपक्रम का आयोजन किया जा रहा है.
अधिक से अधिक नागरिकों से रक्तदान शिविर में हिस्सा ले अधिक जानकारी के लिए सम्पर्क करे
डॉ.आमेर पठाण
(अध्यक्ष आरोग्यम फौंउडेशन )
मोबाईल नं.8999352843

We team Yuva Samna Media news network Salute Dr. Amer pathan work and efforts by him to serve to humanity and think to develop nation.Best of luck for his future.


*मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची तीन वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ द्या*

*विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषीवर कारवाई करा – समितीची मागणी*
             
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहेली ते दहावी पर्यंत च्या शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती तसेच अकरावी पासून ते संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचीपर्यंत राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिल्या जाते परंतु मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे आदेश गेल्या तीन वर्षापासून प्राप्त नसल्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा प्रचंड गंभीर प्रश्न निर्माण झाला होता या बाबत या विषयाची गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र मुस्लिम महासंघची कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी याबाबत विचार विनिमय केला आणि कृती समितीचे अध्यक्ष वाजेद जागीरदार, उपाध्यक्ष शाहेद खान, महासचिव मोहम्मद शोएब, सल्लागार मुजाहेद हुसैनी व मसरुर खान आदींनी विभागीय आयुक्तांकडे मागणी केली की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीचे आदेश तात्काळ निर्गमित करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.
          पुढे निवेदना मध्ये महासंघाच्या वतीने असे नमूद करण्यात आले की, मागील तीन वर्षापासून सदर विद्यार्थी आपले शिष्यवृत्ती मिळण्यासाठी चे अर्ज ऑनलाईन पध्दतीने आप आपल्या शाळा तथा महाविद्यालयाच्या मार्फत शासकीय नियमाप्रमाणे शासनाकडे सादर करतात. यातील महत्वाचा भाग असा आहे की, ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेला अर्ज जेव्हा परिपूर्ण आणि शासनाने निर्देशित केलेल्या क्रमवारीनुसार आणि शासनाच्या अपेक्षित तक्त्याप्रमाणे भरल्या जातो त्याच वेळेस ऑनलाईन पध्दतीचे फॉर्म सदर संगणक स्विकार करते. याचाच अर्थ असा होतो की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत योग्य – सुटसुटीत शासनाला अपेक्षित असलेल्या सर्व नियमांचे पालन झाल्यामुळे सदरच्या शिष्यवृत्ती मिळणेसाठीचा अर्ज संगणक स्विकारते नंतर सदरच्या संगणकीय अर्जाच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या वतीने त्या त्या विद्याथ्र्यांना त्या त्या शाळेमध्ये आणि त्या त्या महाविद्यालयामध्ये निश्चित केलेल्या बँक खात्यावर जमा होण्याची तथा जमा करण्याची प्रथा आहे असे निवेदनामध्ये नमूद केल्यामुळे नव्यानेच रुजु झालेले विभागीय आयुक्त डॉ. सुनिल केंद्रेकर यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेत मराठवाडा विभागातील संबंधित अधिकाऱ्याना पाचारण करुन त्यांना शिष्यवृत्ती निर्गमित करण्याबाबत योग्य ते निर्देश दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी सदर शिष्टमंडळास देवून सदर बाब हि राज्यभरात लागू होत असल्यामुळे शिष्टमंडळाच्या लेखी निवेदनाच्या मागणी प्रमाणे सदरचे निवेदन त्यांनी तात्काळ प्रधान सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पुढील तात्काळ प्रशासकीय कार्यवाही साठी अग्रेसित करण्याचे मान्य केले असून शिष्टमंडळाने निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शासनाने अपेक्षित केलेल्या नियमाप्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्यांचे संगणकीय म्हणजेच ऑनलाईन अर्ज स्विकारल्या नंतर ते तात्काळ अमलबजावणीत का आले नाहीत हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्यामुळे या संपुर्ण प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विभागीय आयुक्त औरंगाबाद या नात्याने त्यांनी सदरच्या निवेदनातील मागणी प्रमाणे शासनाकडे योग्य ती शिफारस करण्याची विनंती करण्यात येवून मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांच्या प्रलंबित असलेल्या तथा मागील तीन ते चार वर्षापासून अदायगी न केलेली शिष्यवृत्ती तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश संबंधित विभागास तात्काळ व्हावेत अशी मागणी करुन निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले की, मागील तीन ते चार वर्षापासून मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती जाणून बुजून तथा समजून उमजून देण्यात आलेली नाही किंवा कसे ? आणि सदर शिष्यवृत्ती न मिळल्यामुळे विद्याथ्र्यांचे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. यासाठी उपरोक्त प्रमाणे तात्काळ उच्च स्तरीय चौकशी होणे कामी उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आणि त्या अनुषंगाने अल्पसंख्याक मुस्लिम विद्याथ्र्यांना न्याय देण्याचे काम शासनाच्या वतीने तात्काळ हाती घेण्यात यावे अशी शिफारस प्रधान सचिव, शिक्षण विभाग यांच्याकडे करावी अशी मागणी सुध्दा याप्रसंगी शिष्टमंडळाने केली असता विभागीय आयुक्त डॉ. सुनिल केंद्रेकर यांनी तात्काळ योग्य अशी कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थी वर्गाला शिष्यवृत्तीच्या प्रश्नामुळे शिक्षणापासुन वंचित होऊ दिले जाणार नाही असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.
          सदरच्या शिष्टमंडळामध्ये कमिटीचे जिशान देशमुख, फारुक पटेल, अफरोज खान, समीर कुरेशी, तौफीक काझी, रियाझ काझी, आणि शहेबा़ज अंसारी यांची उपस्थित होते.



         युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद टिम
Plz Like comments and share to others to more updates.
*वाळू  माफियांकडून संभाजी ब्रिगेडच्या  जिल्हा अध्यक्षा वर जीवघेणा हल्ला-*
 *विविध संघटनांकडून हल्ल्याचा निषेध*

गंगापूर / प्रतिनिधी-  तालुक्यातील धामोरी  येथील   अवैध वाळू  उत्खननाची तक्रार दिल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी 11 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके यांच्यावर  जीवघेणा  हल्ला केला  यामध्ये शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत.  सदरील घटनेची  माहिती श्री शेळके यांनी गंगापुर पोलिस स्टेशनला कळविले असून गंगापुर पोलिस स्टेशनमध्ये  गुन्ह्याची नोंद झाली आहे . दिनांक 12 फेब्रुवारी रोजी विविध संघटनांनी सदरील घटनेचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींवर करण्यात यावी याकरिता मा. तहसीलदार गंगापूर यांना निवेदन दिले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की धामोरी बु. ता. गंगापूर येथील गट नं. ५ मध्ये चालू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत योगेश शेळके यांनी ग्रामस्थांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे २७ डिसेंबर रोजी निवेदन देउन सदरील वाळू उपशाप्रकरणी कारवाई करण्याची विनंती व आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी विभागीय पथकाद्वारे सदरील जागेवर छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडून सदरील जागेची पथकाद्वारे तपासणी करून वाळू उपशाची मोजणी केली असता जवळपास २६ हजार ब्रास वाळू अवैधपणे चोरून विक्री केल्याचे निदर्शनास आले असल्याचा अहवाल नेमलेल्या पथकाने सादर केल्यानंतर मा. तहसीलदार गंगापूर यांनी सदरील जमीनमालक हेमेंद्र दिनकर पारीख व कुलमुखत्यारधारक शिवप्रसाद रामप्रसाद अग्रवाल यांच्या धामोरी बु. गट नं. ५ येथील जमिनीवर साडेनऊ कोटीचा शासकीय गौणखनिज चोरल्याप्रकरणी बोजा चढवून कलम ३७९, ४२० या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू होती.
त्याअनुषंगाने योगेश शेळके, ग्रामस्थ यांच्या तक्रारीमुळे सदरील अवैधउपसा प्रकरण समोर आल्याने शेळके यांना समक्ष व मोबाईल फोनद्वारे धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल संध्याकाळी धामोरी येथून शेतातील काम आटोपून काल किती तारीख होती गंगापूरकडे येत असताना भेंडाळा फाटा ते गंगापूर रोडवर ईश्वर राजपूत यांच्या वस्तीजवळ विना नंबरच्या दोन मोटारसायकलवर आलेल्या आरोपींनी योगेश शेळके यांच्या समोर गाडी आडवी लावून त्यांना थांबवून शिवीगाळ करीत आमच्या वाळूच्या तक्रारी करतो का, तुझे हातपायच तोडतो असे म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यामध्ये त्यांच्या शर्टच्या खिशातील पैसे, काढून त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी शेळके यांनी जोराचा प्रतिकार करत असताना पाठिमागून येणाऱ्या कारच्या दिव्याच्या प्रकाशामुळे आरोपी मोटारसायकलवर बसून सुसाट वेगाने भेंडाळा फाट्याच्या दिशेने पळून गेल्यामुळे योगेश शेळके यांचा जीव वाचला. 
घटनास्थळावरून शेळके यांनी पीएसआय गजेंद्र इंगळे व हवालदार कराळे व पोलिस स्टेशन गंगापूर यांना  फोनद्वारे सदरील घटनेची माहिती दिली असता पोलिस स्टेशनला येउन तक्रार देण्यासाठी त्यांनी बोलावले. त्यानुसार सायंकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलिस स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष तक्रार दिलेली आहे.
वरील हल्ल्यांमध्ये ते सुदैवाने बचावले असले तरी शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व वाळू माफियांविरोधात योगेश शेळके यांनी घेतलेल्या विरोधातील भुमिकेमुळेच त्यांच्यावर साडेनऊ कोटी रूपयांचा बोजा पडला असल्याचा आरोपींचा समझ असल्यामुळे पुढील काळात योगेश शेळके व त्यांच्या कुटुंबियांवर या पेक्षा मोठा जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता आहे. योगेश शेळके हे सकल मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष असून ते सर्वच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यामुळे योगेश शेळके व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे. व हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून पुढील आठ दिवसांच्या आत शेळके व त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण व आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
     मराठा क्रांती मोर्चा, शिवबा संघटना,स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, एकलव्य भिल्ल संघटना, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटनांच्या वतीने या प्रकरणी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
*शहरातील काही भागाची वीज गुरुवारी बंद*

औरंगाबाद : महावितरणच्या बायजीपुरा उपकेंद्रातील रोहित्र बदलण्याच्या कामामुळे या उपकेंद्रातील वाहिन्यांवर असलेल्या वसाहतींचा वीजपुरवठा गुरुवारी (14 फेब्रुवारी) काही काळ बंद राहणार आहे.

११ केव्ही रोशनगेट, ११ केव्ही मोंढा, ११ केव्ही वॉटर वर्क फिडरवरील निझामुद्दीन,  दर्गा रोड, चंपा चौक, मोंढा, जिन्सी, गंजेशाही, शहागंजचा काही भागाचा वीजपुरवठा फिडर सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील. तर ३३ केव्ही सिडको फिडरवरील ३३/११ केव्ही रोशनगेट व ३३/११ केव्ही बायजीपुरा, वॉटर वर्क फिडरवरील संपूर्ण भाग सकाळी १० ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील. वीजपुरवठा कामाच्या वेळेनुसार दिलेल्या वेळेपूर्वी किवा नंतर पूर्ववत होऊ शकतो. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सध्या बायजीपुरा 33/11 केव्ही उपकेंद्रात 10 एमव्हीए क्षमतेचा जुना पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल गळती व तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यात अडथळे येत होते. त्यामुळे महावितरणने हा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागेवर याच क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम गुरुवारी करण्याचे नियोजन केले आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर बायजीपुरा, शहा बाजार, राजाबाजार, चाऊस कॉलनी, कैसर कॉलनी, शहागंज, जाधवमंडी, जिन्सी, खास गेट, मोंढा, अहिंसानगर, मीना बाजार, नागसेन कॉलनी, अंगुरीबाग या परिसरात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहण्यास मदत होणार आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...