*वाळू माफियांकडून संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा वर जीवघेणा हल्ला-*
*विविध संघटनांकडून हल्ल्याचा निषेध*
गंगापूर / प्रतिनिधी- तालुक्यातील धामोरी येथील अवैध वाळू उत्खननाची तक्रार दिल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी 11 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यामध्ये शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटनेची माहिती श्री शेळके यांनी गंगापुर पोलिस स्टेशनला कळविले असून गंगापुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे . दिनांक 12 फेब्रुवारी रोजी विविध संघटनांनी सदरील घटनेचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींवर करण्यात यावी याकरिता मा. तहसीलदार गंगापूर यांना निवेदन दिले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की धामोरी बु. ता. गंगापूर येथील गट नं. ५ मध्ये चालू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत योगेश शेळके यांनी ग्रामस्थांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे २७ डिसेंबर रोजी निवेदन देउन सदरील वाळू उपशाप्रकरणी कारवाई करण्याची विनंती व आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी विभागीय पथकाद्वारे सदरील जागेवर छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडून सदरील जागेची पथकाद्वारे तपासणी करून वाळू उपशाची मोजणी केली असता जवळपास २६ हजार ब्रास वाळू अवैधपणे चोरून विक्री केल्याचे निदर्शनास आले असल्याचा अहवाल नेमलेल्या पथकाने सादर केल्यानंतर मा. तहसीलदार गंगापूर यांनी सदरील जमीनमालक हेमेंद्र दिनकर पारीख व कुलमुखत्यारधारक शिवप्रसाद रामप्रसाद अग्रवाल यांच्या धामोरी बु. गट नं. ५ येथील जमिनीवर साडेनऊ कोटीचा शासकीय गौणखनिज चोरल्याप्रकरणी बोजा चढवून कलम ३७९, ४२० या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू होती.
त्याअनुषंगाने योगेश शेळके, ग्रामस्थ यांच्या तक्रारीमुळे सदरील अवैधउपसा प्रकरण समोर आल्याने शेळके यांना समक्ष व मोबाईल फोनद्वारे धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल संध्याकाळी धामोरी येथून शेतातील काम आटोपून काल किती तारीख होती गंगापूरकडे येत असताना भेंडाळा फाटा ते गंगापूर रोडवर ईश्वर राजपूत यांच्या वस्तीजवळ विना नंबरच्या दोन मोटारसायकलवर आलेल्या आरोपींनी योगेश शेळके यांच्या समोर गाडी आडवी लावून त्यांना थांबवून शिवीगाळ करीत आमच्या वाळूच्या तक्रारी करतो का, तुझे हातपायच तोडतो असे म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यामध्ये त्यांच्या शर्टच्या खिशातील पैसे, काढून त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी शेळके यांनी जोराचा प्रतिकार करत असताना पाठिमागून येणाऱ्या कारच्या दिव्याच्या प्रकाशामुळे आरोपी मोटारसायकलवर बसून सुसाट वेगाने भेंडाळा फाट्याच्या दिशेने पळून गेल्यामुळे योगेश शेळके यांचा जीव वाचला.
घटनास्थळावरून शेळके यांनी पीएसआय गजेंद्र इंगळे व हवालदार कराळे व पोलिस स्टेशन गंगापूर यांना फोनद्वारे सदरील घटनेची माहिती दिली असता पोलिस स्टेशनला येउन तक्रार देण्यासाठी त्यांनी बोलावले. त्यानुसार सायंकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलिस स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष तक्रार दिलेली आहे.
वरील हल्ल्यांमध्ये ते सुदैवाने बचावले असले तरी शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व वाळू माफियांविरोधात योगेश शेळके यांनी घेतलेल्या विरोधातील भुमिकेमुळेच त्यांच्यावर साडेनऊ कोटी रूपयांचा बोजा पडला असल्याचा आरोपींचा समझ असल्यामुळे पुढील काळात योगेश शेळके व त्यांच्या कुटुंबियांवर या पेक्षा मोठा जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता आहे. योगेश शेळके हे सकल मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष असून ते सर्वच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यामुळे योगेश शेळके व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे. व हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून पुढील आठ दिवसांच्या आत शेळके व त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण व आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चा, शिवबा संघटना,स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, एकलव्य भिल्ल संघटना, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटनांच्या वतीने या प्रकरणी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.