*एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त/ देशभक्त मा जावेद अहमद*
Hon'bless IPS Javed Ahemad Sir
ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्याच्या पायाला हात लावायला लाज वाटू नये असे माझे Idol असणारे, नव्या मुंबईचे पोलीस आयुक्त व सध्याचे सौदी अरेबियाचे राजदूत मा. जावेद अहमद.
डॉ अब्दुल कलाम यांचेनंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळविले असे अधिकारी म्हणजे मा जावेद अहमद. जावेदसाहेब १९८० च्या बॅचचे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत. आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत.अब्जावधीच्या संपत्तीचे ते मालक आहेत. अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.
१९८० मध्ये I P S होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली. ३६ वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले. . मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. खाजगी गाडी वापरत.
. मा जावेदसाहेब यांचा गणवेश जाड्याभरड्या खाकीचा असे. टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायीभाव होता. म.गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. . नवी मुंबईत पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वत:चा मोबाईल सार्वजनीक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे. समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते. माणूसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे. . नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून मा.जावेदसाहेब यांना ओळखलं जाते.
. दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजातून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर, २०१५ ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर मा प्रधानमंत्री यांनी त्याची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलीस खात्यातून निवृत्ती नंतर राजदूत होण्याचा बहुमान मा रिबेरोसरांचे नंतर मिळविणारे केवळ दुसरेच मा. जावेदसाहेब आहेत. . पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो . समाजाचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. वेदना, व्याकुळता, करूणा पाहून त्यांच मन कधी व्याकूळ होत नाही. आपल्याचं मस्तीत /धुंदीत ते वावरत असतात. लाज,लज्जा काही नसते. केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्त्वज्ञान ओकत असतात. जनाची नाही तरी मनाचीही लाज वाटत नाही. अशावेळी मा.जावेदसाहेब यांच्यासारखा माणूस आपला वाटायला लागतो. खराखुरा राष्ट्रभक्त म्हणून मनात स्थान निर्माण करतो. आजही सर्वच खात्यात काही अधिकारी मनापासून जीव तोडून काम करत आहेत.
*या निमित्ताने सर्वांना एक विनंती पगारातील पैसे समाजासाठी खर्च करू नका पण समाजाला ओरबडू नका.*
मा जावेद अहमदसाहेब आपणा सारख्या देशसेवा करणाऱ्या खऱ्या राष्ट्रभक्तास साष्टांग नमस्कार. आपणाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
*(संपत गायकवाड)*
माजी सहाय्यक शिक्षण संचालक.
Special Report By-Mushtak Baig
8668620106,8793666376
For more details and Updates plz Subscribe to Yuva Samna Media Group.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.