Tuesday, February 12, 2019

*मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची तीन वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ द्या*

*विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषीवर कारवाई करा – समितीची मागणी*
             
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहेली ते दहावी पर्यंत च्या शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती तसेच अकरावी पासून ते संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचीपर्यंत राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिल्या जाते परंतु मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे आदेश गेल्या तीन वर्षापासून प्राप्त नसल्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा प्रचंड गंभीर प्रश्न निर्माण झाला होता या बाबत या विषयाची गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र मुस्लिम महासंघची कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी याबाबत विचार विनिमय केला आणि कृती समितीचे अध्यक्ष वाजेद जागीरदार, उपाध्यक्ष शाहेद खान, महासचिव मोहम्मद शोएब, सल्लागार मुजाहेद हुसैनी व मसरुर खान आदींनी विभागीय आयुक्तांकडे मागणी केली की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीचे आदेश तात्काळ निर्गमित करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.
          पुढे निवेदना मध्ये महासंघाच्या वतीने असे नमूद करण्यात आले की, मागील तीन वर्षापासून सदर विद्यार्थी आपले शिष्यवृत्ती मिळण्यासाठी चे अर्ज ऑनलाईन पध्दतीने आप आपल्या शाळा तथा महाविद्यालयाच्या मार्फत शासकीय नियमाप्रमाणे शासनाकडे सादर करतात. यातील महत्वाचा भाग असा आहे की, ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेला अर्ज जेव्हा परिपूर्ण आणि शासनाने निर्देशित केलेल्या क्रमवारीनुसार आणि शासनाच्या अपेक्षित तक्त्याप्रमाणे भरल्या जातो त्याच वेळेस ऑनलाईन पध्दतीचे फॉर्म सदर संगणक स्विकार करते. याचाच अर्थ असा होतो की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत योग्य – सुटसुटीत शासनाला अपेक्षित असलेल्या सर्व नियमांचे पालन झाल्यामुळे सदरच्या शिष्यवृत्ती मिळणेसाठीचा अर्ज संगणक स्विकारते नंतर सदरच्या संगणकीय अर्जाच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या वतीने त्या त्या विद्याथ्र्यांना त्या त्या शाळेमध्ये आणि त्या त्या महाविद्यालयामध्ये निश्चित केलेल्या बँक खात्यावर जमा होण्याची तथा जमा करण्याची प्रथा आहे असे निवेदनामध्ये नमूद केल्यामुळे नव्यानेच रुजु झालेले विभागीय आयुक्त डॉ. सुनिल केंद्रेकर यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेत मराठवाडा विभागातील संबंधित अधिकाऱ्याना पाचारण करुन त्यांना शिष्यवृत्ती निर्गमित करण्याबाबत योग्य ते निर्देश दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी सदर शिष्टमंडळास देवून सदर बाब हि राज्यभरात लागू होत असल्यामुळे शिष्टमंडळाच्या लेखी निवेदनाच्या मागणी प्रमाणे सदरचे निवेदन त्यांनी तात्काळ प्रधान सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पुढील तात्काळ प्रशासकीय कार्यवाही साठी अग्रेसित करण्याचे मान्य केले असून शिष्टमंडळाने निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शासनाने अपेक्षित केलेल्या नियमाप्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्यांचे संगणकीय म्हणजेच ऑनलाईन अर्ज स्विकारल्या नंतर ते तात्काळ अमलबजावणीत का आले नाहीत हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्यामुळे या संपुर्ण प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विभागीय आयुक्त औरंगाबाद या नात्याने त्यांनी सदरच्या निवेदनातील मागणी प्रमाणे शासनाकडे योग्य ती शिफारस करण्याची विनंती करण्यात येवून मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांच्या प्रलंबित असलेल्या तथा मागील तीन ते चार वर्षापासून अदायगी न केलेली शिष्यवृत्ती तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश संबंधित विभागास तात्काळ व्हावेत अशी मागणी करुन निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले की, मागील तीन ते चार वर्षापासून मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती जाणून बुजून तथा समजून उमजून देण्यात आलेली नाही किंवा कसे ? आणि सदर शिष्यवृत्ती न मिळल्यामुळे विद्याथ्र्यांचे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. यासाठी उपरोक्त प्रमाणे तात्काळ उच्च स्तरीय चौकशी होणे कामी उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आणि त्या अनुषंगाने अल्पसंख्याक मुस्लिम विद्याथ्र्यांना न्याय देण्याचे काम शासनाच्या वतीने तात्काळ हाती घेण्यात यावे अशी शिफारस प्रधान सचिव, शिक्षण विभाग यांच्याकडे करावी अशी मागणी सुध्दा याप्रसंगी शिष्टमंडळाने केली असता विभागीय आयुक्त डॉ. सुनिल केंद्रेकर यांनी तात्काळ योग्य अशी कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थी वर्गाला शिष्यवृत्तीच्या प्रश्नामुळे शिक्षणापासुन वंचित होऊ दिले जाणार नाही असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.
          सदरच्या शिष्टमंडळामध्ये कमिटीचे जिशान देशमुख, फारुक पटेल, अफरोज खान, समीर कुरेशी, तौफीक काझी, रियाझ काझी, आणि शहेबा़ज अंसारी यांची उपस्थित होते.



         युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद टिम
Plz Like comments and share to others to more updates.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...