दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांचे मनपसमोर अन्नत्याग
औरंगाबाद दि.14 युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क- ब्युरो
मनपा प्रशासनात सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरिता दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांनी आज सोमवार दि.14 पासून मनपासमोर अन्नत्याग आंदोनाला सुरवात केली.
मनपा मध्ये गेल्या 27 वर्षापासून 204 कर्मचारी दैनिक वेतनावर काम करतात. त्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्याबद्दल 19 जुलै 1999 मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच एकत्रित नऊ प्रस्ताव करण्यात आले. मनपातील रिक्त जागांवर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव 11 जुलै 2018 रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परंतु त्याबाबत अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. मनपात वर्ग 3 व 4 चे किमान 700 पदे रिक्त आहेत. या पदावर त्यांना सामावून घेण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार असताना याबाबत कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमातून अन्नत्याग करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सोमवार पासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मागण्या मान्य होत नाही तोवर हे अन्नत्याग सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी सांगितले.