Saturday, January 12, 2019

क्षुल्लक कारणावरून विद्याथ्र्यावर प्राणघातक हल्ला
चाटे कोचिंग क्लासमधील घटना

औरंंगाबाद युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क / प्रतिनिधी

शिकवणी सुरू असतांना पाणी पिण्यासाठी वर्गाबाहेर आलेल्या दहावीतील एका विद्याथ्र्यावर वर्गमित्राने धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.१२) सकाळी उल्कानगरी परिसरातील चाटे कोचिंग क्लासच्या परिसरात घडली. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

गणेश सुनिल काळे (वय १६, रा.उल्कानगरी, गारखेडा परिसर) असे हल्यात जखमी झालेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे. गणेश काळे हा क्लासमध्ये परीक्षेसाठी गेला होता. तो पाणी पिण्यासाठी पायरयावरून  जात असतांना पाठीमागून आलेल्या एका अल्पवयीन वर्गमित्राने धारदार शस्त्राने गणेश काळे याच्यावर हल्ला केला. या हल्यात गणेश रक्तबंबाळ होवून खाली कोसळला. गणेश काळे याच्यावर वर्गमित्राने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती मिळताच चाटे कोचिंग क्लासेसमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी  गणेशला उपचारासाठी तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, चाटे कोचिंग क्लासचे वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर तोंडे यांनी सांगितले की, गणेश हा आमच्या क्लासमध्ये शिकत आहे.त्याच्यावर क्लासमध्ये चाकु हल्ला  झाला नाही. हा सर्व प्रकार बाहेर रस्त्यावर घडला असून चाकुहल्ला झाल्याचे समजताच त्याला तात्काळ उपचारासाठी शहानुरमियाँ दर्गाह परिसरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...