चिकलठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुणपणे हत्या
परिसरात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल
औरंंगाबाद/प्रतिनिधी : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सिडको एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविले. दिनकर भिकाजी बोर्डे (वय ५०), कमलबाई दिनकर बोर्डे (वय ५०), भगवान दिनकर बोर्डे (वय २६) सर्व राहणार दत्त नगर, चौधरी कॉलनी अशी मयतांची नावे आहेत. मारेकरी अमोल भगीरथ बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.
चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या बोर्डे कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेद्र माळाळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घर उघडून बघीतले असता, घरात सर्वत्र रक्त पसरले होते. तर तीन जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत तीन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविले. हे हत्याकांड कोणत्या कारणाने घडले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. तरी मारकरी अमोल बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.