*बेगमपुरा येथे अडव्होकेट गोपाल पांडे यांच्या तर्फे श्री. अन्वर खान यांचा जंगी सत्कार*
औरंगाबाद. दिनांक १६ सप्टेंबर २०१९. येणारया विधानसभा निवडणुकीमध्ये शहराचे जेष्ठ समाजसेवक एल्लोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक श्री. सलीम अहमद खान उर्फ अन्वर खान यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (ए. आई. एम. आई. एम.) या राजनैतिक पक्षाकडून औरंगाबाद मध्य विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविण्याची आपली इच्छा प्रकट केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे समजतील सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे. शहराचे नामवंत व जेष्ठ वकील अड. गोपाल पांडे रा. बेगमपुरा औरंगाबाद यांच्या तर्फे श्री. सलीम अहमद खान उर्फ अन्वर खान यांचा बेगमपूरा चौक औरंगाबाद येथे मकई गेट, जयसिंगपूरा, घाटी परिसर, बेगमपूरा परिसरातील रहिवासीयांतर्फे भव्य व जंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी या सर्व परिसरातील जेष्ठ नागरिकांची व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. अड. गोपाल पांडे यांनी या प्रसंगी लोकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की अन्वर खान हे सद्ग्रस्थ समाजसेवे मध्ये मागील ४० वर्षा पासून आहेत. समाजातील सर्व स्तराच्या लोकांमध्ये त्यांचे चांगले संबंध आहे. सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आज पर्यंत गरीब व गरजू लोकांची निस्वार्थ सेवा केली असून सक्रिय राजनीती मध्ये सहभागी होऊन ते एक आदर्श घडवू शकता याची मला खात्री आहे. सत्कार मूर्ती श्री. अन्वर खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ए. आई. एम. आई. एम. या पक्षाकडून मला निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास निश्चित मी निवडून येऊ शकतो. जनते मध्ये मी शहराच्या विकासाचे मुद्धे घेऊन जाणार आहे. या ऐतिहासिक शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मी, मा. ना. खासदार इम्तियाझ जलील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस काम कारेन. मकई गेट, जयसिंगपूरा, घाटी परिसर, बेगमपूरा परिसरातील रहिवासीयांना त्यांनी आश्वासन दिले की आंतरराष्ट्रीय ख्याती चे 'बीबी का मकबरा' ला जाण्याकरिता रस्त्याचे काम ते प्राथमिकतेने करणार तसेच नहर ए अंबारी विशेषतः बेगमपुरा येथील थत्ते हौद च्या पुनर्वसनाचे काम देखील ते लौकरात लौकर करतील. निवडून आल्यावर एका वर्षाच्या आत शहरातील युवकांसाठी उद्योग धंदे निर्माण करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरविणे, प्रत्येक वॉर्डात महिलांकरिता जिम बनविणे, वॉकिंग ट्रॅक बनविणे व शहरात दोन मोफत जलतरण तलाव (स्विमिंग पूल) बनविणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहे. उपस्थित लोकांनी विशेषतः जेष्ठ नागरीकांनी अन्वर खान त्यांनाच ए. आई. एम. आई. एम. पक्ष कडून निवडणूक लढविण्याची संधी मिळो या करिता त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्राचे सूत्रसंचालन सोहेल झकीऊद्दीन यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद झियाउद्दीन यांनी केले. जोरदार आतिशबाज़ी व जंगी सत्कार ने बेगमपुरा परिसर दुमदुमून गेले होते.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.