महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू ;
दिवाळी अगोदर फटाके फोडण्याची तयारी.
२१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल लागनार
दिवाळी अगोदर फटाके फोडण्याची तयारी.
२१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल लागनार
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आज मुख्य निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली असून महाराष्ट आणि हरियाणात आज दुपारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला एकाच टप्यात मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदारांची नोदणी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबरपर्यंत असून २८८ जागेसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत घोडेबाजार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असून यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारीची सर्व माहिती देणं गरजेचं असल्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा प्लास्टिक वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर विधानसभा उमेदवारांना २८ लाखापेक्षा अधिक खर्च करता येणार नाही. याबाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.