Friday, March 15, 2019

Viral About MLA Imtiyaz jaleel

Aurangabad loksabha seat congress 2014 me hari, 2009 me hari, 2004 me hari, 1999 me hari, 1996 me hari, 1991 me hari 1984 me hari. Aur 39 years before 1980 me kazi saleem congress se jite the. Wo jis formula aur statistics 3M equation se jeete the usi formula se imtiaz jaleel 2019 me inshaallah jeet sakte hain.........Ager mera dawa sahi nahi hai toh waise bhi hum pichele 35 saalon se harne ke liye vote kar hee rahe hain aur iss baar Imtiaz Jaleel ko vote karenge toh.....kya hoga....ye message unke liye hai jo ye soch rahe hain imtiaz jaleel ko ticket diye toh congress har jati.

क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा,
हर वक़्त क्यों सोचे की बुरा होगा !!
बढ़ते रहे बस मंजिल की और
हमें कुछ मिले या न मिले,
तज़ुर्बा तो नया होगा!!

Thursday, March 14, 2019

दवाइयों के चूरे करके बेच रहा डॉक्टर : अस्पताल में छापा- IAS Deepak Rawat920K views17K

दवाइयों के चूरे करके बेच रहा डॉक्टर : अस्पताल में छापा- IAS Deepak Rawat920K views17K

दवाइयों के चूरे करके बेच रहा डॉक्टर : अस्पताल में छापा- IAS Deepak Rawat920K views17K



दवाइयों के चूरे करके बेच रहा डॉक्टर : अस्पताल में छापा- IAS Deepak Rawat920K views17K

Monday, March 11, 2019

जयभवानी नगरात भाजप वॉर्ड अध्यक्षाची आत्महत्या
पोलिस ठाण्यांसमोर आमदारासह कार्यकर्त्यांचा ठिय्या

औरंंगाबाद/प्रतिनिधी  :  काँग्रेस नगरसेविकेच्या पतीसह एका महिलेच्या त्रासाला कंटाळून भाजपा वॉर्ड अध्यक्षाने आत्महत्या केली. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. रविवारी रात्री ८.४० वाजता गल्ली क्र १४, जयभवानीनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, यात गुन्हा नोंदविण्यासाठी आ. अतुल सावे, नगरसवेक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी ठाण्यासमोर सोमवारी (दि. ११) सकाळी साडेअकरा वाजता तासभर ठिय्या दिल्याने ठाण्यात बराच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील प्रल्हाद पिंपळे ऊर्फ अहिरे (वय ४०, रा. गल्ली क्र. १४, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ, जयभवानीनगर) असे मृताचे नाव आहे. तर, छाया मनोहर लोखंडे (वय ३५, रा. राजनगर), जिजाबाई बाबुराव गव्हाणे (रा. शिवशक्तीनगर) आणि मोहन साळवे, अशी आरोपींची नावे आहेत. साळवे हे राजनगर-मुकुंदनगर (वॉर्ड क्र. ९०) च्या काँग्रेसच्या नगरसेविका अनिता साळवे यांचे पती आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छाया आणि जिजाबाई या माय-लेकी आहेत. मयत सुनील अहिरे हे वॉर्ड क्र. ९२ चे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष होते. त्यांची मागील सहा वर्षांपासून छाया लोखंडे हिच्यासोबत ओळख होती.

काही दिवसांपासून त्यांचे बिनसले होते. पैशांच्या देवाण-घेवाणीवरून त्यांच्यात वादही झाला होता. छाया ही त्यांना नेहमी त्रास द्यायची. त्यांच्या घरी येऊन भांडायची. तिच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच सुनील अहिरे यांनी गळफास घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे. तर, जिजाबाई बाबूराव गव्हाणे, मोहन (नाना) यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करीत आहे. मी सुनील अहिरे, अशी सुसाईड नोट मुकुंदवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी मीरा अहिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक उद्धव जाधव करीत आहेत.

पोलिस व कार्यकर्त्यांत खडाजंगी

गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यात आलेले आमदार अतुल सावे, नगरसेवक प्रमोद राठोड आणि पदाधिकारी यांची पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांच्याशी खडाजंगी झाली. गोंधळ करू नका, असे म्हणाल्यावरून आमदार आणि नगरसेवक तावातावाने जाब विचारत होते. अखेर, पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.



निष्पक्षपणे चौकशी करा - कल्याण काळे

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात काँग्रेस महिला नगरसेविकेच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी या सर्व प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी डॉ. कल्याण काळे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सर्वोतोपरी सज्ज- जिल्हाधिकारी उदय चौधरी
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
औरंगाबाद। प्रतिनिधी ✒बेग मुश्ताक
 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी सर्व यंत्रणा संपूर्णपणे कार्यान्वित झालेल्या आहेत. निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रशासन,मतदारांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. चौधरी म्हणाले, निवडणूक कार्यक्रमाची 10 मार्च रोजी घोषणा झाली आहे. 28 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र चार एप्रिलपर्यंत सादर करता येतील. पाच एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्रांची छानणी होईल. आठ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. 23 एप्रिल रोजी मतदान आणि 23 मे रोजी मतमोजणी होईल, 27 मेपर्यंत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपेल.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी  एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. जालना लोकसभा क्षेत्रात सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या एकूण नऊ विधानसभा क्षेत्रात 27 लक्ष 79 हजार 670 मतदार आहेत. त्यामध्ये 14 लक्ष 69 हजार 477 पुरुष, 13 लक्ष 10 हजार 169 महिला, तृतीय पंथी 24 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 30 ते 39 वयोगटातील सर्वाधिक मतदार म्हणजेच सहा लक्ष 71 हजार 924 मतदार असल्याचेही श्री. चौधरी यांनी सांगितले.
औरंगाबाद लोकसभेसाठी एकूण 18 लाख 57 हजार 645 मतदार आहेत. त्यामध्ये नऊ लक्ष 78 हजार 800 पुरूष, आठ लक्ष 78 हजार 827 महिला आणि 18 तृतीय पंथी  मतदार आहेत.
मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागृती व्हावी. मतदानाचा हक्क कसा बजावावा यासाठी बॅलट, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत मतदान पूर्व जागृती करण्यात आलेली आहे. निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रमाणात बॅलट, गुणक आणि व्हीव्हीपॅट यंत्र, मनुष्यबळ उपलब्ध आहे. अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्र कोल्हापूरहून लवकरच येणार असल्याचेही श्री. चौधरी म्हणाले. 
मतदारांना निर्भय, नि:पक्ष आणि  पारदर्शक वातावरणात मतदान करण्यासाठी जागृती मोहीम राबविण्यात आलेली आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक पाणी, वीज, मोबाईल कव्हरेज सेवा आदींची व्यवस्था केलेली आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येक ठिकाणी फ्लाईंग स्क्वाड, FST, व्हीडिओ चमू, दारू, रोकड, प्रतिबंधित औषधांची  तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आलेली आहेत, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.
नवतंत्रज्ञानाचा वापर
जिल्ह्यात 250 केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचे स्ट्रिमिंगही करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांकरिता मतदानासाठी आवश्यक सुविधेकरिता PWD ॲप, राजकीय पक्षांना आवश्यक परवानगीसाठी Suvidha, आचारसंहितेचा भंग होत असल्यास सामान्य नागरिकां साठी CVigil  आणि तक्रार निवारणासाठी  Samadhan ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांच्या गाऱ्हाणी ऐकून त्यांच्या सोडवणुकीसाठी 1950 हा टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यंत्रणांची नजर
 आदर्श निवडणूक आचारसंहितचे  पालन व्हावे, या दृष्टीकोनातून सर्व यंत्रणांबरोबरच सामाजिक माध्यमांतून होणाऱ्या राजकीय जाहिरातींवर पोलिस विभागाची नजर असेल. संपत्ती विद्रूपीकरणावरही कार्यवाही सुरूच आहे. राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणिकरणासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणिकरण  व सनियंत्रण समिती स्थापन आहे. आयोगाच्या सूचनांनुसार काटेकोरपणे या समितींमार्फत पालन करण्यात येणार असल्याचेही श्री. चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी उपस्थित होते.

👀 *जाणून घ्या 'व्हीव्हीपॅट' म्हणजे काय? नेमकं कसं काम करतं?*
यंदा राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मतदारयंत्रांचा वापर होणार आहे. मात्र व्हीव्हीपॅट म्हणजे काय? नेमकं कसं काम करतं? निवडणुकीत हे का वापरायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज पाहुयात...

🧐 *व्हीव्हीपॅट म्हणजे काय?* :
▪ मतदाराने उमेदवाराला दिलेले मत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली दुसरी पर्यायी यंत्रणा म्हणजे व्हीव्हीपॅट.
▪ मतदारांना आपल्या मतदानाबद्दल अधिक विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो.
▪ मतदाराने व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मत दिले आहे. ते मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची शहानिशा करता येते.

💁‍♂ *व्हीव्हीपॅट नेमकं कसं काम करतं?* :
▪ एखाद्या उमेदवाराला मतदार ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करतो. ईव्हीएमच्या शेजारी असलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून त्यावेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि पक्षाचे चिन्ह यांचा उल्लेख असलेली चिठ्ठी 7 सेकंद मतदाराला दिसते.
ती चिठ्ठी त्यानंतर एका सीलबंद पेटीत जमा होते. एका काचेच्या पेटीत व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्यामुळे ती चिठ्ठी मतदार बघू शकतो. व्हीव्हीपॅटला किंवा त्या चिठ्ठीला फक्त निवडणूक अधिकारी सोडून कोणालाही हात लावता येत नाही.
⚡ *देशात आचारसंहिता लागू, सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर*
👉 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील 90 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
📅 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान चालणार मतदान प्रक्रिया, 23 मे रोजी होणार मतमोजणी

📍 *लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात होणार मतदान*
▪ पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्य
▪ दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्य
▪ तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्य
▪ चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्य
▪ पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्य
▪ सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्य
▪ सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्य
▪ मतमोजणी : 23 मे 2019

📍 *महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार*
▪ पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान.
▪ दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान.
▪ तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान.
▪ चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान.


लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रीलला ७ मतदार संघात, १८ एप्रिलला १०, २३ एप्रिलला १४ आणि २९ एप्रिलला १७ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  महाराष्ट्रात ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक :-

मतदानाच्या ताऱखा आणि त्यापुढील कंसात मतदारसंघाची नावे पुढील प्रमाणे आहेत.

पहिला टप्पा- ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम)

दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर)

तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान होणार आहे. (जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग, कोल्हापूर, हातकणंगले)

चौथा टप्पा – २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी)



🛑 मोठी बातमी 🛑
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई होणार.
🅾 लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने आजपासूनचं आचारसंहिता लागली असल्याने कोणतीही राजकिय पोस्ट, खोट्या व्हायरल पोस्ट,धार्मिक भावना दुखावणार्‍या पोस्ट, कोणत्याही ग्रूपवर पोस्ट करण्यापूर्वी काळजी घ्या. कायदेशीर कारवाई होणार नाही याचीही काळजी घ्या.
मतदान यंत्रावर नाव चिन्हासह उमेदवाराचा फोटो असणार. मतदान केंद्रावर सुरक्षेची काळजी घेण्यात येणार. एव्हीएम वर जिपिएसच्या मदतीने नजर राहणार.
आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी ॲन्ड्रॉइड ॲप उपलब्ध. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार.
निवडणूक काळात सोशल मिडिया, वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठी नियमावली लागू.
🅾 निवडणूक काळात सोशल मीडियावर असतील ‘हे’ निर्बंध!
मुबंई : (कोकणचा तडाखा सोशल मिडिया ग्रुप सौजन्य) : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता या कालावधीमध्ये सोशल मीडियावर देखील कशा पद्धतीने वचक ठेवला जाणार आहे, याचे नियम त्यांनी जाहीर केले.
लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीतल्या विज्ञान भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. त्यामध्ये आचारसंहिता, उमेदवारांसाठीची नियमावली, कठोर कारवाईची तरतूद, निवडणुकांचा ७ टप्प्यांचा कार्यक्रम अशा सर्व बाबींसोबतच सोशल मीडियावर काय निर्बंध असतील? निवडणूक काळात सोशल मीडियावर कसा वचक ठेवला जाणार आहे? याविषयी देखील निवडणूक आयोगाने योजलेल्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, युट्यूब किंवा इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून चुकीचा प्रचार करणाऱ्या उमेदवार मंडळींवर चांगलाच वचक बसणार आहे.

🛑 काय आहेत सोशल मीडियासाठीच्या तरतुदी?
१) निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटीमध्ये (एमसीएमसी) राज्य आणि जिल्हा स्तरावर विशेष सदस्याची नियुक्ती.
२) उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती देखील द्यावी लागणार.
३) सोशल मीडियावरच्या राजकीय जाहिरातींना बी सर्टिफिकेटची आवश्यकता असणार.
४) सोशल मीडियावरील जाहिरातींवर केलेला खर्च उमेदवाराला सादर करावा लागणार.
५) इतर प्रचार साहित्यावर असलेल्या आचार संहितेच्या नियमांचं बंधन सोशल मीडियावर राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून टाकल्या जाणाऱ्या कोणत्याही स्वरूपातल्या मजकुरावरदेखील असणार.
६) फेसबुक, ट्विटर, गुगल आणि युट्यूबने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती एमसीएमसीकडून प्रमाणित केलेल्या असणार. यासाठी काही अॅप्लिकेशन्सची देखील मदत घेतली जाणार आहे. हे मोबाईल अॅप्लिकेशन काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर वापरले जाणार.
७) गुगल आणि फेसबुकने अशा जाहिराती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर टाकण्याआधी त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार असल्याचं देखील मान्य केलं आहे.
८) निवडणूक कालावधीदरम्यान भडकाऊ भाषणं किंवा आचारसंहितेचा भंग करणाऱ्या गोष्टींवर वचक ठेवण्यासाठी एका विशेष तक्रार निवारक अधिकाऱ्याची नेमणूक केली असल्यांचं देखील या सोशल मीडिया साईट्सने सांगितलं आहे.
९) निवडणूक अधिकाऱ्यांनी जर अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडिया कंपन्यांच्या लक्षात आणून दिला, तर त्यावरही कारवाई करण्याचं आश्वासन या कंपन्यांकडून देण्यात आलं आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...