Monday, March 11, 2019

⚡ *देशात आचारसंहिता लागू, सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर*
👉 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील 90 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
📅 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान चालणार मतदान प्रक्रिया, 23 मे रोजी होणार मतमोजणी

📍 *लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात होणार मतदान*
▪ पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्य
▪ दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्य
▪ तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्य
▪ चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्य
▪ पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्य
▪ सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्य
▪ सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्य
▪ मतमोजणी : 23 मे 2019

📍 *महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार*
▪ पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान.
▪ दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान.
▪ तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान.
▪ चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान.


लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रीलला ७ मतदार संघात, १८ एप्रिलला १०, २३ एप्रिलला १४ आणि २९ एप्रिलला १७ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  महाराष्ट्रात ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक :-

मतदानाच्या ताऱखा आणि त्यापुढील कंसात मतदारसंघाची नावे पुढील प्रमाणे आहेत.

पहिला टप्पा- ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम)

दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर)

तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान होणार आहे. (जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग, कोल्हापूर, हातकणंगले)

चौथा टप्पा – २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी)



No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...