अति महत्वाच्या बातम्या
*07:15 AM* राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे; टोकाचे पाऊल उचलू नका, कार्यकर्त्यांना आवाहन
*07:22 AM* आणखी चार व्यवहारात चिदम्बरम यांच्यावर संशयाची सुई
*07:40 AM* जीएसटी पोर्टल सतत होत आहे हॅँग, रिटर्न फाईल करण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढविण्याची मागणी
*08:04 AM* राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ
*08:07 AM* मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात.
*09:18 AM* मुंबई : सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचं 'EDiot Hitler' लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे.
*09:37 AM* ठाणे : मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
*09:41 AM* 'औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था' निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे 418 मतांनी विजयी.
*09:50 AM* P. Chidambaram Arrested Live : चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करणार
*10:08 AM* चिदंबरम कायद्याचे जाणकार आहेत, कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी असे वर्तन करायला नको होते - सत्यपाल सिंह
*10:23 AM* मुंबई : राज ठाकरे सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार
*10:32 AM* ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव याना देखील नौपाडा पोलिसांच्या ताब्यात
*10:32 AM* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि सुपुत्र अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात जाणार.
*10:37 AM* मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे रवाना
*10:47 AM* राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील - अविनाश जाधव
*11:02 AM* मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे ठप्प, कळवा येथे लेव्हल क्रॉसिंग गेट अधिक वेळ सुरू राहिल्याने ठाणे-कल्याण मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक बंद
*11:31 AM* मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहोचले
*11:38 AM* मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
*12:07 PM* भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण
*12:27 PM* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू
*12:33 PM* औरंगाबाद : सलीम अली तलावात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; सिटी चौक पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला.
*12:42 PM* Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प
*01:11 PM* खामगाव बसस्थानकावर पोलिसाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
*01:22 PM* नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मखमलाबाद गावात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे 31 लाख 75 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
*01:40 PM* गुन्हा केला नसेल तर चौकशीला बेडरपणे सामोरे जावे - संजय राऊत
*01:41 PM* नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नेत्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची जंतर मंतरवर निदर्शने
*02:12 PM* मुंबई - ईडीकडून राज ठाकरेंची आजची चौकशी सात वाजेपर्यंत चालणार :तिघा अधिकाऱ्यांकडून राज यांच्याकडे सविस्तर विचारणा, सूत्रांची माहिती
*02:24 PM* नवी दिल्ली - चिदंबरम यांना झालेली अटक हे सुडाचे राजकारण, डीएमकेचे नेते स्टॅलिन यांचा आरोप
*02:31 PM* अकोला - मूर्तिजापूर एमआयडीसी परिसरातील ऑईल मिलला भीषण आग, लाखोंचे नुकसान
*02:43 PM* नाशिक : एका नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास आणि 1 हजाराचा दंड, 2011 साली घडली होती घटना
*02:53 PM* सचिन तेंडुलकरचा एक विक्रम विराट कोहली कधीच मोडू शकत नाही, वीरूचा दावा
*02:56 PM* उरण - खळबळजनक घटना; पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या
*03:04 PM* उरण - पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या, उरणमध्ये खळबळ
*03:23 PM* मुंबई - बीसीसीआयच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल प्राप्त; एटीएसकडून तपास सुरु
*03:41 PM* कल्याण - राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी सुरू झाल्यानंतर कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील दुकाने बंद
*03:53 PM* महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाः अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण यांच्याविरोधात पाच दिवसांत गुन्हे दाखल कराः उच्च न्यायालयाचे आदेश
*05:25 PM* सोलापूर : रस्त्यावर थांबलेल्या वृद्धेस एसटी बसची धडक, 75 वर्षीय वृद्ध जागीच ठार, बार्शी तालुक्यातील वैराग येथील घटना
*05:44 PM* बुलडाणा: तालुक्यातील धाड येथे अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा बलात्कार; तीन आरोपी अटक, दोघे फरार
*05:59 PM* मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड
*06:01 PM* लंडन - नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ
*06:05 PM* यवतमाळ : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. यवतमाळ सत्र न्यायालयाचा निर्णय
*06:06 PM* विवाहबाह्य संबंधातून पत्नीने केली पतीची चाकू भोसकून हत्या
*06:09 PM* नवी दिल्ली - चिदंबरम यांची ईडीविरोधातील याचिकेवर 27 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर सीबीआयविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी होणार
*06:20 PM* सोलापूर : शहर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची नांदेड पोलीस अधीक्षकपदी बदली
*07:18 PM* West Indies v/s India Test Match: वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
*07:49 PM* गोव्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा अमित शहा यांनी घेतला आढावा
*07:53 PM* दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी विक्रम भावेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास पुणे सत्र न्यायालयाकडून सीबीआयला ९० दिवसांची मुदतवाढ
*07:54 PM* पुणे - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर