Thursday, August 22, 2019

सलीम अली सरोवरात महिलेचा मृतदेह आढळला

औरंंगाबाद/प्रतिनिधी
टीव्ही सेंटर रोडवरील सलीम अली सरोवरात एका ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गुरूवारी (दि.२२) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मयत महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविला. मयत महिलेच्या अंगावर केशरी रंगाची साडी असून हातात बेन्टेक्सची बांगडी आहे. गळ्यात काळ्या मण्याची पोत आणि तुळशीमाळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत मयत महिलेची ओळख पटली नसल्याचे सिटीचौक पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला याचा तपासही पोलिस करीत आहेत.
सिल्लोड येथे आनंदोत्सव साजरा, अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले आणि दानवे विजय झाले.


औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अंबादास दानवे  विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सिल्लोड येथील अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थकांनी सिल्लोड शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यलयासमोर व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अंबादास दानवे यांच्या विजयाचे फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी युवा नेते अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे,नगरसेवक विठ्ठल सपकाळ,सलीम हुसेन,शंकरराव खांडवे,सत्तार हुसेन,सुधाकर पाटील,मनोज झंवर,राजेंद्र गौर,प्रशांत क्षीरसागर,जितेंद्र आरके,सतीश ताठे,सुशील गोसावी,फहिम पठाण,राजरत्न निकम,शेख वसीम व इतर

Wednesday, August 21, 2019

*अंबादास दाणवे 524 मते घेऊन पहिल्या फेरीतच विजयी*

शिवसेना-भाजपा युतीचे अंबादास दानवे यांना ५२४ मते पहील्या फेरीत मिळाली. तर कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. अपक्ष शहानवाज खान यांना ३ मतांवर समाधान मानावे लागले. युतीकडे ३३० मते होती दानवेंना यापैकी १०७ मते जास्त मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. एमआयएमची २८ मते घेण्याची किमया अंबादास दानवे यांनी या निवडणुकीत करून दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आघाडीकडे २५० मते होती तरी कुलकर्णी यांना यापैकी १०६ मते मिळाली आहे. यावरून कॉंग्रेसने बळजबरी उमेदवार लादल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. एमआयएम, आरपीआय, बसपा, अपक्ष मिळून ७७ मते होती. एकूण ६५७ मते होती ६४७ मतदान झाले होते त्यापैकी ६३३ मते वैध ठरली. कोटा ३१७ मतांचा होता. १० वाजून १७ मिनटांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी ५२४ मते घेतलेले अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून जल्लोष केला. महीला कार्यकर्त्यांनी सुध्दा जल्लोषात सहभाग घेवून आनंद व्यक्त केला. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यावर आता शिवसेनेचे अंबादास दानवे यांचे वर्चस्व राहणार असून आगामी निवडणुकीत दानवे यांना आपली किमया दाखवणे आता सहज शक्य होणार आहे. 

*Ambadas Danve Won the election in first round by getting 525 votes*
-OVM
: Ambadas danve 524
Kulkarni 106
Shahnavaz 3
Invalid Votes 14
-OVM




युवा सामना मिडियाचा दावा ठरला खरा.

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज संस्थेतअंबादास दानवे यांचा विजय निश्चित होणार. युवा सामना मिडियाचा दावा.निकाल-२२ आगसट २०१९ रोजी निश्चिती.
महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील

थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे



औरंगाबाद / प्रतिनिधी
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने बुधवार (दि.21) पासून दहा दिवसांची विशेष कर वसुली मोहीम सुरु केली आहे. मोहीमेच्या पहिल्याच दिवशी एक शाळा, महाविद्यालय व मंगल कार्यालयासह पाच मालमत्तांना थकीत कर न भरल्याने मनपाच्या प्रभाग पथकांनी टाळे ठोकले आहे. पहिल्या दिवशीच्या कारवाईत तीन लाख रूपयांपेक्षा अधिक कर देखील वसुल करण्यात आला आहे.

थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने वारंवार विशेष कर वसुली मोहीम राबवित व्याज व दंडात 75 टक्क्यापर्यंत सुट दिली. मात्र, यानंतरही मालमत्ताधारक थकबाकी भरत नसल्याने पालिकेने आता कडक पाऊल उचलले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी बुधवारपासून विशेष कर वसुली मोहीम राबवित असल्याची घोषणा केली होती. या मोहीमेत आता बड्या व्यावसायिक थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत त्याप्रमाणे अधिकार्‍यांना आदेशित केले होते. त्यानुसार बुधवारी दि.21 पालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी मोहीमेला सुरूवात केली. प्रभाग-1 मध्ये प्रमुख अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या नेतृत्वात शारिरीक शिक्षण महाविद्यालय पीएस कॉलेज परिसरातील प्राचार्यांचा हॉल सिल करण्यात आला. तर डायमंड हॉल येथे दोन दुकाने सिल केली. पथक कारवाईसाठी गेले असता शिवेश्वर मंडप यांनी लगेच दोन लाख रूपयांच्या कराचा भरणार केला. याप्रमाणे प्रभाग-1 मध्ये सहा मालमत्तांवर कारवाई करत 3 लाख 15 हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला. प्रभाग-7 मध्ये प्रमुख अधिकारी महावीर पाटणी यांच्या नेतृत्वात डॉ. आर.पी. नाथ हायस्कूल शाळेकडे 3 लाख 30 हजार 763 थकबाकी असल्याने शाळेच्या अनुक्रमे कॉम्पुटर रूम, हेडमास्तर यांची रूम व हजेरी रूम अशा 3 खोल्यांना टाळे ठोकण्यात आले. प्रमोद किशोरीलाल जैस्वाल यांनी 50 हजार रुपयांचे दोन धनादेश पुढील 2 दिवसांचे दिले. तर जय भवानीनगर येथील खालसा मंगल कार्यालय यांच्या कडे 1 लाख 85 हजार 207 रुपये थकबाकी होती. पथक कारवाईला गेल्यानंतरही ती भरली नसल्याने मंगल कार्यालय सिल करण्यात आले.
परप्रांतीय भामट्याने ठेकेदाराला ५६ लाखाला गंडविले, यंत्रसामुग्री केली गायब

औरंंगाबाद/प्रतिनिधी 
शासकीय ठेकेदाराला राजस्थानी भामट्याने गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. राजस्थानी भामट्याने पुलाच्या बांधकामासाठी नेलेली ५६ लाख रूपये किंमतीची यंत्रसामुग्री गायब केली आहे. शरद दादीज कैलास दादीज (वय ४०, रा. नलका नाल्याजवळ, प्लॉट नंबर ७/८, शिवाजीनगर, बागन, राजस्थान) अशी फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे.

अहिंसानगर येथील रहिवासी विश्वनाथ शामराव घुगे (वय ६५) हे शासकीय ठेकेदार असून ते महाराष्ट्र, राजस्थान आणि गोवा राज्यात पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारी कामे करतात. २०१५ साली त्यांना राजस्थान येथील बेनगंगा नदीवर पुल उभारण्याचे काम मिळाले होते. त्या कामावर देखरेख करण्यासाठी विश्वनाथ घुगे यांनी शरद दादीज कैलासचंद्र दादीज याला सुपरवायझर म्हणून नेमले होते. तसेच बांधकामासाठी ट्रक क्रमांक (एमएच-२०-एटी-२३९७), जीप क्रमांक (एमएच-२०-डीव्ही-६५९७), स्वीसींगसीटर प्लॉट, जनरेटर, २ क्राँक्रीट मिक्सर, सेंट्रीग प्लेट, जॅक असा एकूण ५६ लाख रूपये किंमतीची यंत्रसामुग्री १ फेब्रुवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान शरद दादीज यांच्या ताब्यात दिली होती.
दरम्यान, शरद दादीज याने काम पुर्ण झाल्यावर स्थानिक गुंडाच्या मदतीने विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा महेश घुगे यांना यंत्रसामुग्री परत नेण्यास विरोध केला. त्यानंतर दादीज याने घुगे यांच्या मालकीची यंत्रसामुग्री इतरत्र भाड्याने देवून भाड्यापोटी मिळालेल्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी महेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद दादीज याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते करीत आहेत.
एटीएम कार्डाची अदलाबदली करून ६० हजार लांबविले

औरंंगाबाद/प्रतिनिधी
नवीन मिळालेले एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी एटीएम सेंटर येथे गेलेल्या महिलेच्या एटीएम कार्डासोबत अदलाबदली करून दोन भामट्यांनी तिच्या बँक खात्यावरून ६० हजार रूपये लंपास केले. ही घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
गारखेडा परिसरातील सारंग हौसींग सोसायटी येथे राहणाऱ्या रेणुका सचिन राजे (वय ४२) यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांना नुकतेच बँकेने एटीएम कार्ड दिले होते. नवीन कार्ड सुरू करण्यासाठी रेणुका राजे या २० ऑगस्ट रोजी पटीयाला कॉर्नर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर येथे गेल्या होत्या. राजे या एटीएमचा पासवर्ड लॉग इन करीत असतांना एटीएममध्ये आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन जणांनी तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकत असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड घेवून त्याच्या बदलीत दुसरेच कार्ड राजे यांच्या हातात देवून निघुन गेले.
दरम्यान, भामट्यांनी रेणूका राजे यांच्या एटीएम कार्डाच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून एकदा २० हजार तर एकदा ४० असे एकूण ६० हजार रूपये काढले. याप्रकरणी रेणूका राजे यांच्या तक्रारीवरून एटीएम कार्डाची अदलाबदली करून ६० हजार रूपये लांबविणाऱ्या दोघाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.
आजपर्यंतच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्ट्राचाराचा मलिदा चाखला : नगरसेविका वाडकर खणखणीत आरोप

मनपात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका प्रशासनातील अधिकारी एकाच विभागात ठाण मांडून वर्षानुवर्षे बसलेले आहेत. त्यामुळे विकास कामे ठप्प झाली असून आता पर्यंत आलेल्या जवळपास सर्व आयुक्तांनी भ्रष्टाचारात सामील होत अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे, असा घणाघाती आरोप नगरसेविका शिल्पराणी वाडकर यांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार नियतकालिक बदल्या करण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे.

नगरसेविका वाडकर यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मनपातील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले आहेत. यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत वेळोवेळी प्रशासनाला विचारणा केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शासकीय बदल्यांचे विनियम केले आहे.  त्यात अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणणे, पारदर्शकता जपणे, कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन गतिमान करणे यासाठी बदल्या करणे आवश्यक आहे. मात्र, आत्तापर्यंत महापालिकेत आलेले जवळपास आयुक्त यांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांनी अनेक वर्षांपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांना महत्वाच्या व भ्रष्टाचारास पोषक असलेल्या विभागातून बदल्या केलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनाही भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक संकटात सापडली आहे. मनपातील गैरकारभाराची सीआयडी मार्फत चौकशी केल्यास बहुताउंश अधिकारी- कर्मचारी जेल मध्ये दिसतील असा घणाघाती आरोप वाडकर यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, नगररचना विभागाला आर्थिक वर्षात 220 कोटी वसुलीचे उद्दिष्ठ असताना केवळ 55 कोटी वसुली झाली आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही परिश्रम घेतलेले नाहीत. मालमत्ता कर वसुलीचे 450 कोटींचे उद्दिष्ठ असताना केवळ 115 कोटी वसुली झाली. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. मनपाच्या मालमत्ताच्या भाडेपट्टा व भाड्याच्या रकमा थकीत असून करारनामे कालबाह्य आहेत. यासह अनेक आरोप करत त्यांनी अधिकारी केवळ मौजमजा करायला येतात त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नसून त्यांच्या बदल्या कराव्या अशी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. सोबत मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रत पाठविण्यात आली आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...