कैलासनगर भागात ठेकेदाराचा भरदिवसा भोसकून खून
दोघे जण पोलिसांच्या ताब्यात
औरंंगाबाद/प्रतिनिधी
व्यावसायीक आर्थिक देवाण-घेवणीच्या वादातून ३२ वर्षीय ठेकेदार युवकाचा तीन जणांनी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे खून केला. ही घटना सोमवारी (दि.१९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कैलासनगर भागातील गल्ली नंबर १ येथे घडली. फेरोज खान अनिस खान (वय ३२, रा.दादा कॉलनी, कैलासनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हुसेन खान इब्राहीम खान उर्फ बाली (वय ३८, रा.दादा कॉलनी) आणि उस्मान खान या दोघांना ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरोज खान अनिस खान हा युवक ठेकेदारीचा आणि वाळुचा व्यवसाय करीत होता. गेल्या काही दिवसापासून दादा कॉलनीत राहणाऱ्या हुसेन खान उर्फ बाली याच्यासोबत फेरोज खान याचा आर्थिक देवाण-घेवणीच्या कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री फेरोज खान व हुसेन बाली यांच्यात देवाण-घेवाणीच्या कारणावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फेरोज खान हा आपल्या घरी असतांना हुसेन बाली याने त्याला बोलावून घेत गल्ली नंबर १ येथील सामाजिक सभागृहाजवळ नेले. त्या ठिकाणी हुसेन खान उर्फ बाली याने आपला पुतण्या उस्मान खान, मुलगा इम्रान खान हुसेन खान यांनी फेरोज खान याच्यासोबत वाद घातला. आम्हाला वाळुचा हप्ता का देत नाही असे म्हणत हुसेन खान उर्फ बाली याने धारदार शस्त्राने फेरोज खान याच्यावर हल्ला केला. त्यानंतर उस्मान खान, इम्रान खान यांनी देखील फेरोज खान याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे फेरोज खान हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, हुसेन बाली याने फेरोज खान याला बोलावून त्याचा घात केला असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर फेरोज खान याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फेरोज खान यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना दुपारी दिड वाजेच्या सुमारास फेरोज खान यांचा मृत्यू झाला. फेरोज खान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नातेवाईकांनी घाटी रूग्णालयात धाव घेतली. त्यामुळे अपघात विभागासह शवविच्छेदनगृहा समोर मोठा जमाव जमला होता. घाटीत जमाव जमला असल्याची माहिती मिळाल्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक्की आदींच्या पथकाने घाटी रूग्णालयात धाव घेवून संतप्त नातेवाईकांची समजूत काढली.
नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर गोंधळ
फेरोज खान याच्या मारेकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करीत फेरोज खान याच्या संतप्त नातेवाईकांनी जिन्सी पोलिस ठाण्यासमोर गोंधळ घातला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संतप्त जमावाची समजूत काढुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.
फेरोज खान याच्यावर १४ वार
हुसेन खान उर्फ बाली, उस्मान खान, इम्रान खान यांनी फेरोज खान यांच्यावर धारदार शस्त्राने १४ वार केले होते. त्यातील काही वार शरीराच्या अंतरभागात खोलपर्यंत लागल्याने फेरोज खान हे गंभीर जखमी झाले होते.
फेरोज खान यांची हत्या, वय 35, राहणार दादा कॉलनी, कैलास नगर याच्या वर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली, आर्थिक देवाणघेवाण मधून खून झाला ची माहिती पोलिसांकडून कळाली आहे.
हत्या करणारा हाच तो आरोपी नाव हुसेन बाली
सदरील घटनेची चौकशी करताना पोलीस विभाग औरंगाबाद दिसत आहे ही घटना कशी घडली व का घडली या मागचे कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण आर्थिक.
देवाण-घेवाण करताना शहरात प्रत्येकाने सजग राहणे फार गरजेचे आहे कारण कोण तुम्हाला कधी धोका देणार यासंदर्भात सांगणे कठीण आहे त्याकरिता आपण कोणाशी व्यवहार करताना जाणीवपूर्वक विचार करूनच व्यवहार करावा.