निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- पोलीस महासंचालक जयस्वाल
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा
औरंंगाबाद/प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि त्याच्या चौकटीबाहेर काही जात असेल तर त्यावर पोलीस विभागाचे लक्ष राहणार आहे. समाजमाध्यमावर टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि प्रचारकी मजकुरही बारकाईने तपासला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी अतिरीक्त मनुष्यबळ पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरूवारी (दि.१४) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. मराठवाड्यातील पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची जयस्वाल यांनी येथील पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जयस्वाल म्हणाले, जातीय तेढ निर्माण होणार नाही, यादृष्टीने बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीस विभागाकडे असल्याचे सांगताना मात्र त्यांनी कुठलीही आकडेवारी, उपलब्ध साधन-सामग्रीची माहिती थेट सांगितली नाही. रिक्त पदे आहेत, असे सांगताना मात्र ते पद भरण्याविषयीचेही स्पष्टीकरण त्यांनी थेट दिले नाही.
चौकट...
वाढता दहशतवाद हे देशासमोर मोठे आव्हान
देशाला वाढत्या दहशतवादासोबतच देशातील कट्टरतावादाचेही मोठे आव्हान पोलिसासमोर आहे. इसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण फारसे नाही. पण त्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी आणि स्थानिक कट्टरतावाद, नक्षली चळवळीशी जोडले जाणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या-त्या चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
उपनिरीक्षपदी पदोन्नतीबाबत माहिती घेतो
पोलीस विभागातील सरळसेवेअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना उपनिरीक्षपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली आहे. अनेक जण निवृत्त झाले आहेत तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत विचारले असता जयस्वाल यांनी, याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. या प्रश्नावर महासंचालक काय बोलतात, याकडे औरंगाबादेतील ८० पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावर महासंचालकांनी थेट भाष्य केले नसल्यामुळे उत्तीर्ण पोलिसांचा हिरमोड झाला.
पुरावे असल्यावरच कारवाई होणार
लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास त्याची पुराव्यासह माहिती द्या, त्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महासंचालक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.