Sunday, December 30, 2018

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध हॉटेल्स व रेस्टॉरंट फुललेले - शेख वाजेद पाशा,संचालक, मिनी ताज रेस्टॉरंट,मकबरा रोड,बेगमपुरा, औरंगाबाद.

सर्वनाच नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता आहे त्यामुळे शहरातील लोकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे .सर्वानीच नवीन वर्षाच्या आगमनाची तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्याची जय्यत तयारी केली.यामध्ये शहरातील विविध हॉटेल्स व रेस्टॉरंट फुलली आहेत.नवीन वर्षाच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे काही ठिकाणी तर स्पेशल सेलिब्रेशन पार्ट्याची देखील तयारी झाली.चला तर मग जाणून घेऊयात शहरातील कोण कोणती हॉटेल्स व रेस्टॉरंट 31 डिसम्बर चे सेलिब्रेशन करण्यासाठी उत्तम जेवणाची तसेच उत्तुंग मेजवानी देण्यासाठी तयार आहेत.





घाटीची स्वछता आणि एकूण प्रशासन याविषयी जनतेच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. अभ्यागत मंडळ समितीचा अध्यक्ष या नात्याने आगामी 4 तारखेला मी स्वतः  अभ्यागत मंडळ समितीची बैठक बोलावलेली आहे. बैठकीत तांत्रिक तसेच एकूण अडचणीविषयी आढावा घेण्यात येईल. घाटिला भेडसावनाऱ्या प्रश्नांवर  चर्चा केली जाईल. मिटींगमध्ये ठोस निर्णय घेऊन घाटीचा कारभार प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल - अतुल सावे ,अध्यक्ष, अभ्यागत मंडळ समिती घाटी.
थंडी वाढल्याने " तिबेटीयन" बाजारात उबदार कपडे खरेदीसाठी गर्दीत वाढ

औरंगाबाद / प्रतिनिधी- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क
गेल्या पाच दिवसापासून तापमान कमी-कमी होत चालल्याने शहराला  थंडीने गारठून टाकले आहे. थंडीचा जोर वाढल्याने ग्राहकांची थंडीपासून बचाव करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाच्या लगत असलेल्या तिबेटीयन मार्केटमध्ये उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या जवळच उबदार कपड्यांसाठी  तिबेटीयन मार्केट प्रसिद्ध  आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा बाजार सुरु आहे.काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला  असल्याने  शहरवासी कुटूंबियांसाठी या तिबेटीयन मार्केटमध्ये  स्वेटर, कानटोपी, शाल असे विविध उबदार कपडे खरेदी करतांना  दिसून येते आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखे पासून हा तिबेटीयन बाजार सुरु असून, जानेवारीच्या 25 तारखे पर्यंत शहरात असणार आहे. जानेवारी महिन्यात थंडीचा जोर असाच कायम राहिल्यावर पुढील जनेवरीचा पूर्ण महिना तिबेटीयन बाजार शहरवासीयांना खुला असणार असल्याची अशा माहिती विक्रेत्यांनी " दै.मराठवाडा साथी "शी बोलतांना दिली.
शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच, विविध भागातून लाखोंचा ऐवज लुटला.
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
औरंंगाबाद/प्रतिनिधी  :  शहरभर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी विविध भागातून लाखो रूपये विंâमतीचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी थेट ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसखोरी करीत महिला सहाय्य कक्षाजवळून सहाय्यक फौजदाराचे पैसे लांबविले. तसेच चोरट्यांनी मध्यवर्ती बसस्थानकातून महिलेची पर्स लांबवली.  पैठण रोडवरील नाथपुरम हौसींग सोसायटी येथे घरफोडी केली. शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच असून चोरट्यांना रोखण्यात गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक फौजदार सुखदेव कडूबा पुरी (वय ५६) यांनी २९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता महिला तक्रार कक्षाजवळ आपले पैसे असलेली किट पेटी ठेवली होती. चोरट्याने ग्रामीण पोलिस मुख्यालयात घुसखोरी करीत सुखदेव पुरी यांच्या किट पेटीतून ४ हजार रूपये लंपास केले. याप्रकरणी सुखदेव पुरी यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार पाटील करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, तक्रारदार महिलेचा कपडे खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या मुलासह बुलढाणा येथे कपडे व दुकानाचा माल खरेदी करण्यासाठी जात होती. बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने तक्रारदार महिलेच्या पर्सची चैन उघडत पर्समधुन ८५ हजार रूपये चोरून नेले. प्रकार महिलेच्या लक्षात आल्यावर तिने दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

तिसNया घटनेत, विनय लक्ष्मीकांत रत्नपारखी (वय ४६,रा. वैभव नाथपुरम हौसींग सोसायटी, पैठणरोड) हे घराला कुलूप लावून २८ ते २९ डिसेंबरदरम्यान एका कार्यक्रमासाठी गुजरात येथील अहमदाबाद येथे गेले होते. चोरट्यांनी विनय रत्नपारखी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून एलईडी टिव्ही, मोबाईल असा एकूण २३ हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विनय रत्नपारखी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.
तोतया पोलिसाने लुटले,नागरीकांनी सतर्क राहावे.
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
औरंंगाबाद/प्रतिनिधी  : मुकुंदवाडी परिसरात असलेले दुकान उघडण्यासाठी जात असलेल्या कृष्णा अर्जुन सोन्नीस (वय ६८, रा.प्लॉट नंबर ३४, एस.टी.कॉलनी, एन-२) यांना दोन तोतया पोलिसांने लुटले. ही घटना २९ डिसेंबर रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सोन्नीस यांचे मुवुंâदवाडी परिसरात दुकान असून ते उघडण्यासाठी शनिवारी दुपारी साडेचार वाजता ते पायी जात होते. त्यावेळी कासलीवाल अपार्टमेंन्टच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ एक अनोळखी इसमाने त्यांना थांबविले. मी पोलिस कर्मचारी असून तुम्ही हातात सोन्याच्या अंगठ्या घालून फिरू नका, चोरटे तुमच्यावर लक्ष ठेवून असल्याची थाप मारली. कृष्णा सोन्नीस यांच्या हातातील एक तोळा वजनाच्या सोन्याच्या ३५ हजार रूपये विंâमतीच्या दोन अंगठ्या काढुन  रूमालात ठेवा असे सांगितले. सोन्नीस अंगठ्या काढत असतांना तोतया पोलिसाने रूमालात बांधुन देत असल्याची बतावणी करीत हातचलाखीने अंगठ्या काढुन घेत पोबारा केला.
दरम्यान, कृष्णा सोन्नीस हे दुकानावर गेल्यावर त्यांनी आपल्या जवळील रूमाल काढुन बघीतला असता, त्यात अंगठ्या नसल्याचे लक्षात आले. कृष्णा सोन्नीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोतया पोलिसाविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आर.टी.भदरगे करीत आहेत.
शहरात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

औरंंगाबाद/प्रतिनिधी : नवीन वर्ष २०१९ चे स्वागत करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून नवीन वर्षाचे स्वागत करा पण त्याचवेळी संयमही ठेवा  असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्साहाच्या भरात बेभानपणे वाहन चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी तसेच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी रविवारी (दि.३१) दिली.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात येते. यावेळी काही उत्साही तरूण मद्यप्राशन करून बेफामपणे वाहने चालवून अपघातास निमंत्रण देत असतात. मद्यपी वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  पोलिस उपायुक्त ३, सहाय्यक आयुक्त ८, पोलिस निरीक्षक ३४, पोलिस अधिकारी २००, तसेच २ हजार ५०० कर्मचारी विशेष पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार आहे. शहरात ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट लावण्यात आले असून शहरातील हर्सुल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड, दौलताबाद टी पॉईन्ट, वाळूज नाका आदी ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असल्याचे कोडे यांनी सांगितले. 
औरंगाबाद शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी MH20 हे एक देखणे आणि शानदार रेस्टोरंट आपल्या सेवेत 2013 पासून सुरु झाले आहे.
अत्यंत उच्च दर्जा आणि विलोभनीय अंतर्गत रचना असणारे हे रेस्टोरंट स्वादिष्ट पदार्थांचे माहेरघर आहे.                           
याठिकाणी  विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी उत्तम सोय करण्यात आली करण्यात आली. या ठिकाणी फाईन डाईन रेस्टॉरंट आहे, येथे सर्व प्रकारचे फुड उपलब्ध होते. तसेच येथे स्पोर्ट्स बार, ओपन पूल रेस्टॉरंट देखील आहे.याला लोकांची विशेष पसंती आहे. येथे विविध कार्यक्रम करण्यासाठी बँकेट हॉल देखील आहे. या बँकेट  हॉलमध्ये कॉर्पोरेट पार्टी, बर्थडे, इंगेजमेंट, वेडिंग, बेबी शॉवर व सेमिनार साठी विशेष सोय करण्यात आली आहे. या हॉल ची कॅपिसिटी ही जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची आहे त्यामुळे येथे कार्यक्रम करणे सर्व सोयीयुक्त आहे.


31 डिसेंबर चे सेलिब्रेशन करण्यासाठी येथे रात्री 7 ते 12 या वेळेत न्यू ईअर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डीजे नाईट व  उस्ताद नवीन भाई यांच्या गजलची मैफिल ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. तरी 31 डिसेंबर चे स्पेशल सेलिब्रेशन करण्यासाठी बीड बायपास रोडवरील  ' MH-20'  रेस्टॉरंट स्पेशल ठिकाण ठरणार आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...