शहरात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
औरंंगाबाद/प्रतिनिधी : नवीन वर्ष २०१९ चे स्वागत करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून नवीन वर्षाचे स्वागत करा पण त्याचवेळी संयमही ठेवा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्साहाच्या भरात बेभानपणे वाहन चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी तसेच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी रविवारी (दि.३१) दिली.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात येते. यावेळी काही उत्साही तरूण मद्यप्राशन करून बेफामपणे वाहने चालवून अपघातास निमंत्रण देत असतात. मद्यपी वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त ३, सहाय्यक आयुक्त ८, पोलिस निरीक्षक ३४, पोलिस अधिकारी २००, तसेच २ हजार ५०० कर्मचारी विशेष पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार आहे. शहरात ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट लावण्यात आले असून शहरातील हर्सुल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड, दौलताबाद टी पॉईन्ट, वाळूज नाका आदी ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असल्याचे कोडे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.