Sunday, December 30, 2018

शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच, विविध भागातून लाखोंचा ऐवज लुटला.
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
औरंंगाबाद/प्रतिनिधी  :  शहरभर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी विविध भागातून लाखो रूपये विंâमतीचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी थेट ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसखोरी करीत महिला सहाय्य कक्षाजवळून सहाय्यक फौजदाराचे पैसे लांबविले. तसेच चोरट्यांनी मध्यवर्ती बसस्थानकातून महिलेची पर्स लांबवली.  पैठण रोडवरील नाथपुरम हौसींग सोसायटी येथे घरफोडी केली. शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच असून चोरट्यांना रोखण्यात गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक फौजदार सुखदेव कडूबा पुरी (वय ५६) यांनी २९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता महिला तक्रार कक्षाजवळ आपले पैसे असलेली किट पेटी ठेवली होती. चोरट्याने ग्रामीण पोलिस मुख्यालयात घुसखोरी करीत सुखदेव पुरी यांच्या किट पेटीतून ४ हजार रूपये लंपास केले. याप्रकरणी सुखदेव पुरी यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार पाटील करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, तक्रारदार महिलेचा कपडे खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या मुलासह बुलढाणा येथे कपडे व दुकानाचा माल खरेदी करण्यासाठी जात होती. बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने तक्रारदार महिलेच्या पर्सची चैन उघडत पर्समधुन ८५ हजार रूपये चोरून नेले. प्रकार महिलेच्या लक्षात आल्यावर तिने दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

तिसNया घटनेत, विनय लक्ष्मीकांत रत्नपारखी (वय ४६,रा. वैभव नाथपुरम हौसींग सोसायटी, पैठणरोड) हे घराला कुलूप लावून २८ ते २९ डिसेंबरदरम्यान एका कार्यक्रमासाठी गुजरात येथील अहमदाबाद येथे गेले होते. चोरट्यांनी विनय रत्नपारखी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून एलईडी टिव्ही, मोबाईल असा एकूण २३ हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विनय रत्नपारखी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...