Sunday, December 30, 2018

तोतया पोलिसाने लुटले,नागरीकांनी सतर्क राहावे.
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
औरंंगाबाद/प्रतिनिधी  : मुकुंदवाडी परिसरात असलेले दुकान उघडण्यासाठी जात असलेल्या कृष्णा अर्जुन सोन्नीस (वय ६८, रा.प्लॉट नंबर ३४, एस.टी.कॉलनी, एन-२) यांना दोन तोतया पोलिसांने लुटले. ही घटना २९ डिसेंबर रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सोन्नीस यांचे मुवुंâदवाडी परिसरात दुकान असून ते उघडण्यासाठी शनिवारी दुपारी साडेचार वाजता ते पायी जात होते. त्यावेळी कासलीवाल अपार्टमेंन्टच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ एक अनोळखी इसमाने त्यांना थांबविले. मी पोलिस कर्मचारी असून तुम्ही हातात सोन्याच्या अंगठ्या घालून फिरू नका, चोरटे तुमच्यावर लक्ष ठेवून असल्याची थाप मारली. कृष्णा सोन्नीस यांच्या हातातील एक तोळा वजनाच्या सोन्याच्या ३५ हजार रूपये विंâमतीच्या दोन अंगठ्या काढुन  रूमालात ठेवा असे सांगितले. सोन्नीस अंगठ्या काढत असतांना तोतया पोलिसाने रूमालात बांधुन देत असल्याची बतावणी करीत हातचलाखीने अंगठ्या काढुन घेत पोबारा केला.
दरम्यान, कृष्णा सोन्नीस हे दुकानावर गेल्यावर त्यांनी आपल्या जवळील रूमाल काढुन बघीतला असता, त्यात अंगठ्या नसल्याचे लक्षात आले. कृष्णा सोन्नीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोतया पोलिसाविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आर.टी.भदरगे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...