Saturday, December 22, 2018

औरंगाबाद शहराची विकासाच्या दिशेने वाटचाल-महापौर नंदकुमार घोडेले.


युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद
औरंगाबाद/प्रतिनिधी : मनपाच्या वतीने शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. ज्या शहरात दळणवळणाची सुविधा चांगली आहे ते शहर विकसनशील शहर समजले जाते. यामुळे नागरिकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या सोयीसाठी औरंगाबाद शहरात आजपासून शहर बस सेवेचा प्रारंभ होत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्रांती चौकात सकाळी 10 वाजता शुभारंभाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, वै. वि. महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, महिला आयोग्याच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खा. राजकुमार धूत, शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आ. अतुल सावे, आ. संजय सिरसाट, आ. इम्तियाज जलील, आ. सुभाष झाम्बड, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर,शिवसेना महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल,  भाजपा शहर जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य, सभागृह नेता विकास जैन, विरोधी पक्ष नेता जमीर कादरी, महिला व बालकल्याण सभापती माधुरी अदवंत, गटनेते गजानन बारवाल, मकरंद कुलकर्णी, प्रमोद राठोड, नासेर सिद्दीकी, भाऊसाहेब जगताप, सभापती सुरेखा सानप, मीना गायके, शोभा वळसे, मनोज बल्लाळ, विमल केंद्रे, नगरसेविका शिल्पराणी वाडकर, सरिता बोर्डे, रेश्मा कुरेशी, विमल कांबळे, आशा भालेराव, आप्पासाहेब हिवाळे यासह सर्व नगरसेवक यांची उपस्थिती राहणार आहे.  पुढे बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, शहरातील महिला, विद्यार्थी, नौकरदार वर्ग, व्यापारी, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्वानाच या शहर बस सेवेचा फायदा होणार आहे. यासोबतच सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाचेही उदघाटन होणार असून देशातील पहिला प्रकल्प आहे. शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या विकासाच्या वाटचालीत सर्वांचे सहकार्य मिळत आहे. आजच्या शहर बस लोकार्पणाचा कार्यक्रमास सर्व शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...