Saturday, December 22, 2018

सोयगाव:वनविभागाचा छापा,ट्रकभर लाकडे रंगेहात पकडले.सोनसवाडी शिवारात लाकडे भरलेली ट्रक वनविभागाच्या ताब्यात.

सोयगाव,दि.२२ अवैध लाकूड तोडी विरोधात वनविभागाने कंबर कसली असून सलग तिसऱ्या दिवशी वनविभागाच्या पथकाने सोनसवाडी शिवारात वाहतुकीदरम्यान तयारीत उभ्या असलेल्या ट्रक मधील जळतनच्या लाकडांची वाहतूक करतांना रंगेहात पकडून यामध्ये आठ लाख रु किमतीचा ट्रक व बेहेड्याची सात टन तोड केलेली लाकडे व जळतन असा ६३,५८८ रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोयगाव शिवारातील सोनसवाडी शिवारात एका शेतात बेहेड्याची सात टन लाकडे व जळतन असा अवैध लाकुड्तोडी करून माल ट्रक क्र-एम-एच-झेड-०४९४ यामध्ये भरतांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडून,मालकी क्षेत्रातील विनापरवाना झाडे तोड केल्याप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९२७ कलम ३ व ४ नुसार भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत ४१ व ४२ अन्वये सय्यद अजीम सय्यद अकबर(वय ३० रा.ठाणा ता.सोयगाव)खलीलखा बशीरखा पठान(रा.वेताळवाडी)या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भिका पाटील,गणेश परदेशी,आदींच्या पथकाने हि धडक कारवाई केली आहे. ............ वनविभाग सतर्क-दरम्यान सोयगाव तालुक्यात अनेक दिवसापासून दुर्लक्षित असलेली अवैध लाकूडतोड याकडे नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ रुजू होताच वनविभागाच्या लाकूडतोड विरोधातील कारवाया हाती घेण्यात आल्याने सोयगाव तालुक्यातील अवैध लाकुड्तोडी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.तर काही भागात अवैध लाकुड्तोडी करणारे भूमिगत झाले आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...