Friday, December 21, 2018

निवडणूक खर्च सादर न केल्या मुळे विविध ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांचे पद धोक्यात:
पोटनिवडणुकीची शक्यता

गंगापुर- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वेळेत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीतील १८७ उमेदवारांना पुढील पाच वर्षांकरता निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.त्यात विद्यमान आठ ग्रामपंचायत सदस्य आहेत.
 विहित मुदतीत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या नोटीसवर सुनावणीदरम्यान उमेदवारांना लेखी तसेच समक्ष मत मांडण्याची मुभा देण्यात आली होती.परंतु निवडणूक लढवलेले उमेदवार यांनी वेळेत खर्च सादर न केल्याचे सिध्द झाले आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना निकालानंतर महिन्याभरात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते मात्र खर्चच सादर केला नसल्यामुळे त्यांना ३१ मे २०१८ रोजी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या नंतरही संबंधितांनी हिशोब सादर केला नसल्यामुळे संबधितांना जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय दिलेल्या तारखेपासून म्हणजे १ डिसेंबर २०१८ पासुन पुढे पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी आहे. यामुळे संबधितांना किमान दोन निवडणूका लढवता येणार नाहीत. निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांत सर्वाधिक १७९ उमेदवार हे पराभूत किंवा उमेदवारी अर्ज परत घेणारे आहेत.तर आठ उमेदवार हे विजयी झालेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.
----------------------------------------
विद्यमान ग्रामपंचायत सदस्यात मुद्देशवाडगाव कुसुम निवृत्ती खरूसे,धामोरी बु. येथील हरी रामनाथ बुटे,सोनाली रामेश्वर शेळके,यशोदा रमेश शेळके,गौरी बाळु वाघ,कुसुम विक्रम किर्तीशाही,माहोली ग्रामपंचायत काकासाहेब नाथराव सिंघाडे व नंद्राबाद येथील नंदा जनार्दन सिन्नसकर हे सदस्य आहेत.यामुळे येथे पोटनिवडणुका होण्याचे संकेत आहेत.
---------------------------------
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निकालानंतर ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक असते. विहित मुदतीमध्ये खर्च सादर न केल्यास उमेदवाराला आदेशाच्या दिनाकांपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...