Friday, December 21, 2018

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेचा रविवारी शुभारंभ
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद शहर
राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या नामांकित संस्थेच्या अंबड शाखेचा शुभारंभ येत्या रविवार दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी थाटामाटात होत आहे. श्रीक्षेत्र मच्छोदरी देवी च्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेचा शुभारंभ भागवताचार्य श्री.शेष महाराज गोदीकर यांच्या शुभहस्ते होत आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजाही संपन्न होणार असून, दुपारी 12 वाजता सर्वांनी पानसुपारीस आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांच्या प्रचंड विश्वासाच्या बळावर राजस्थानी मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीने अल्पावधीतच मोठी गरुडझेप घेतली आहे. संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांना स्वच्छ आणि पारदर्शक सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या या संस्थेच्या परळी येथील मुख्य शाखेसह बीड, अंबाजोगाई, सिरसाळा, सोनपेठ येथील अनेक शाखांसाह औरंगाबाद येथे कॉर्पोरेट ऑफिस आणि राजबाजार, बजाज नगर वाळूज, माळीवाडा आशा अनेक शाखा कार्यरत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड येथेही संस्थेची शाखा नव्याने सुरू होत असून, येत्या रविवारी शानदार शुभारंभ भागवताचार्य श्री.शेष महाराज गोदीकर यांच्या शुभहस्ते होत आहे. यानिमित्त पानसुपारीच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायन बाहेती, सहसचिव पी.डी. अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, अजय पुजारी, नामदेवराव रोडे, सौ.प्रेमलता बाहेती, सौ.मधुमती पोकर्णा, कचरूलाल उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी.कुलकर्णी, सर व्यवस्थापक अर्चना मुंदडा, मुख्य कार्यालय व्यवस्थापक कु.वाय. बी.ओपळे, कॉर्पोरेट शाखेचे व्यवस्थापक एम.डी. चव्हाण, शाखा व्यवस्थापक वसंत नळगे यांच्यासह स्थानिक सल्लागार मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...